देवघरात ठेवा या ३ वस्तू…घरात कधीच भासणार नाही पैशाची चणचण….धनसंपत्ती वाढेल…..!

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो खूपशा लोकांना असे प्रश्न पडत असतात की आपण कष्ट तर खूप करतो पण पैसे हातात उरतच नाहीत, याचे कारण काय असावे? तसेच काही लोकांच्या कष्टाला अगदी योग्य फळ मिळते, व त्यांना कधीच पैशाची चणचण भासत नाही. नेहमी घरात पैसे खेळते राहतात.

त्यामुळे घरातील वातावरण देखील आनंदी व समाधानी राहते. पण जर घराची आर्थिक स्थिती मजबूत नसेल तर खूप वाईट परिस्थिती आपल्यावर ओढवते. त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण देखील पसरते. जे आपल्या आरोग्यासाठी अपायकारक असते.

यासाठी आपण अनेकजण देवाची मनोभावे पूजा करतो, त्यांची आराधना करतो. आपल्या घरात एका विशिष्ट ठिकाणी मोठे देवाचे आपण मंदिर करतो, त्या मंदिरात आपण आपले कुलदैवत तसेच इतर देवांच्या मुर्त्या देखील स्थापन करतो.

पण मित्रहो या देवांच्या मूर्तीसह अशा काही ३ वस्तू आहेत ज्यांना देवघरात ठेवल्याने खूप जास्त फायदा होतो. या वस्तूंच्या प्रभावाने कधीच पैशाची कमतरता वाटत नाही. आपल्या या हिंदू धर्मात प्रत्येक देवाच्या पूजनाची वेगळी पद्धत सांगितली आहे.

त्यानुसारच आपण पूजा करावी त्यामुळे भगवंत आपल्यावर नेहमी प्रसन्न राहतील. दररोज सकाळी अंघोळ करून, स्वच्छ वस्त्रे परिधान करून मगच देवाची पूजा करावी. तसेच आपले हे देवघर घराच्या ईशान्य दिशेत असावे, या देवघरात एकाच देवी किंवा देवाची मूर्ती असावी.

जर दोन दोन मूर्ती असतील तर त्याचे परिणाम खूप अशुभ होतात. तसेच देवघरात फक्त देवीदेतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवावी, त्यांच्या शेजारी आपल्या पूर्वजांच्या मुर्त्या पूजायच्या नाहीत. त्यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते. मित्रहो आज काही अशा तीन वस्तू सांगणार आहोत आम्ही ज्यांचे देवघरात असणे आवश्यक असते.

१) त्यातील एक म्हणजे गंगेचे पाणी होय. आपल्या हिंदू धर्मात गंगेला खूपच पवित्र मानतात, त्यामुळे तिचे पाणी हे अमृतच आहे असे मानतात. म्हणून जर आपल्या देवघरात एका छोट्याशा तांब्याच्या तांब्यात गंगेचे पाणी ठेवले तर आपल्या देवघरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र होते.

२) शंख- देवघरात शंख असणे देखील खूप आवश्यक आहे, याच्या आवाजामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा लगेचच पळ काढते. घरातील वातावरण शुद्ध, प्रसन्न आणि सकारात्मक होते.

३) तसेच मित्रहो देवघरात कलश असणे देखील गरजेचे असते. पूजनामध्ये कलशाचे महत्व खूप जास्त असते, हिंदू धर्मात हा कलश आवर्जून पूजतात. याचे पूजन देवी देवतांना आवाहन करण्यासाठी केले जाते.

मंदिरात तांब्याच्या तांब्यात पाणी ओतून त्यावर कलश मनोभावे पूजावा. व त्याचे स्थान भगवंताच्या उजव्या बाजूला असावे. आपले पूजन झाल्यावर कलशातील शुद्ध पाणी घरातील कानाकोपऱ्यात शिंपडावे. त्यामुळे वाईट शक्ती पूर्णपणे निघून जाईल व सर्वत्र चांगले वातावरण निर्माण होईल.

तर मित्रहो या तिनही वस्तू तुमच्या देवघरात नक्की ठेवा, त्यामुळे घरात आनंद, समाधान पसरेल. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *