तुमच्या घरात या २ वस्तू आहेत तर देव घरात येतील.

Astrology

नमस्कार मित्रांनो

सर्वांना वाटते आपले घर सुंदर असावे. सुख सुविधांनी युक्त असावे. समृद्धी आणि समाधान असावे. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती आपल्या घराकडे बघितले तरी त्यांना प्रसन्न उत्साही वाटावे.

आपल्या घराकडे सर्वांनी आकर्षित व्हावे. आपल्या घरी इतरांपेक्षा काहीतरी वेगळे असावे. यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. लोकांनी आपल्या घराकडे आकर्षित व्हावे यासाठी आपण खूप काही करतो.

परंतु भगवंतांनी आपल्या घराकडे आकर्षित व्हावे. साक्षात भगवंतांनी आपल्या घरात येवून स्वतःचे घर मानावे. व आपल्या घराला नमस्कार करावा. घरामध्ये भगवंतांनी येऊन साक्षात वास्तव्य करावे. यासाठी आपण काय करायला हवे हे आपण जाणून घेणार आहोत.

भगवंतांना आपल्या घराकडे आकर्षित करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्रीमद् भागवत ग्रंथ. श्रीमद् भागवत ग्रंथ हा एक खूप महान ग्रंथ आहे. म्हणून हा ग्रंथ प्रत्येक हिंदूच्या घरात जरूर असावा. त्याशिवाय याच्या एका तरी श्लोकाचे मंत्राचे दररोज घरात पठण करावे. संपूर्ण अध्याय दररोज पठण करणे आपल्याला शक्य होणार नाही.

म्हणून दररोज किमान श्रीमद् भागवत ग्रंथातील फक्त एक श्लोक तरी पठण करावा. ज्या घरांमध्ये हा ग्रंथ ठेवलेला आहे. आणि दररोज यातील एका तरी श्लोकांचे पठण केले जाते. भगवंत अशा घराकडे आकर्षित होतात.

म्हणजे साक्षात भगवंत आहेत म्हणून हा ग्रंथ आपल्या घरात ठेवला तर साक्षात भगवंत आपल्या घरात वास्तव्य करतात. आणि जेथे प्रत्यक्ष रुपात राहतात. त्या घरांमध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. परंतु हा ग्रंथ नुसता घरात आणून ठेवू नये. याच्या एका तरी श्लोकाचे दररोज घरात पठण करावे.

नाहीतर हा ग्रंथ नुसता घरात ठेवून त्याचा कोणताही प्रभाव आपल्या घरावर पडणार नाही. दुसरी बाब म्हणजे आपण नवीन घर बांधले की त्या घरावर आपण आपल्या नावाची पाटी लावतो. किंवा आपल्या आई-वडिलांच्या नावाची पाटी लावतो. अमुक अमुक निवास तमुक तमुक निवास.

भगवंत जेव्हा निवास करण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यावेळी त्यांनी बघितले की त्या घरावर त्या व्यक्तीचे नाव आहे. मग भगवंत अशा घरात येत नाहीत. त्यांना त्या घरात आपलेपणा वाटत नाही. हे घर आपले नाही असे भगवंतांना वाटते.

आणि जर आपण आपल्या घरावर श्री रामनिवास श्रीकृष्ण निवास शिवधाम असे लिहिले. तर भगवंतांना त्याघराकडे पाहून असे वाटते की हे तर साक्षात आपलेच घर आहे. म्हणून अशा घरात भगवंत आनंदाने आणि उत्साहाने आगमन करतात.

आणि आपलेच घर आहे असे म्हणून भगवंत या घरात कायमचे वास्तव्य करतात. तर मित्रांनो श्रीमद् भागवत ग्रंथ आणि घरावर भगवंतांच्या नावाची पाटी या दोन गोष्टी आपल्या घरात आवर्जून करा. म्हणजे भगवंत आपल्या घरात प्रसन्न मनाने व आनंदाने आगमन करतील.

आणि कायमचे वास्तव्य करून आपल्याला सुख समृद्धी आणि संपन्नता प्रदान करते. मित्रांनो माहिती तर तुम्हाला नक्कीच आवडले असेल.

जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *