दुकान उघडण्यापूर्वी नक्की करावे हे काम..!

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपण आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काही ना काही उद्योग धंदे शेती नोकरी व्यवसाय करीत असतो. बहुतेक व्यक्ती शेती किंवा नोकरी न करता एखादा उद्योग धंदा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात.

त्यातच आपला जम बसवतात. आणि त्यातच ते खूप पैसा मिळवून श्रीमंतांच्या यादीत आपले नाव नोंदवतात. परंतु सर्वांच्या बाबतीत हे खरे होत नाही. बहुतेक व्यक्ती एखादा व्यवसाय टाकतात.

परंतु त्यात कितीही हात पाय मारले कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना यश मिळत नाही. आजकाल गल्ली बोळात प्रत्येक दुकान आहे. म्हणून ग्राहकही कुठे कुठे जाणार. त्याशिवाय एखाद्या व्यक्तीने कसले दुकान टाकले आणि ते जरा व्यवस्थित चालायला लागले.

की लगेच दुसऱ्या व्यक्ती तेच दुकान टाकतो. आणि पहिल्या व्यक्तीच्या धंद्यावर परिणाम होतो. अशा प्रकारे दुकानदारांचे रस्सीखेच चाललेली असते. त्याच शिवाय कोरोना काळामध्ये सर्वांच्याच व्यापार व्यवसायावर खूप परिणाम झालेला आहे. ते बहुतेक व्यक्तींचे व्यवसाय डबघाईला आले आहे.

जर तुम्ही ही व्यापारी असाल. दुकानदार असाल परंतु तुमच्या आहे दुकानात ग्राहक फिरकत नसतील. ग्राहक देऊन काहीही न घेता परत असतील. व्यापार व्यवसायात प्रगती होत नसेल. तरच या माहितीमध्ये मी काही तुमच्यासाठी खास उपाय घेऊन आले आहे.

हे उपाय करून तुम्ही नक्कीच आपल्या दुकानात ग्राहकांना आकर्षित करू शकता. व्यापार व्यवसायात भरपूर नफा करून प्रगती करू शकतो. चला तर जाणून घेऊया त्या उपायांबद्दल. हे उपाय ज्योतिषी उपाय लाल किताब मधील आहेत.

जर तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल. तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील कोणत्याही दिवसापासून आपल्या दुकानाच्या बाहेर दोन्ही बाजूला मूठभर गव्हाचे पीठ टाकावे.

हा उपाय आपल्याला महिनाभर तेरा दिवस करायचा आहे. या उपायामुळे आपल्या व्यवसायात प्रगती होईल. आणि विविध फायद्याच्या संधी देखील आपल्याला प्राप्त होतील. जर आपल्या डोक्यावर या कारणाने कर्ज वाढत असेल तर दररोज लवकर उठून स्नानानंतर कावळ्याला पोळी खायला द्यावी.

आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या डोक्याच्या बाजूला पलंगाखाली एका भांड्यात सातू ठेवावेत. नंतर दुसऱ्या दिवशी ते सातो गरीब व गरजूंना वाटून द्यावे. किंवा कोणत्याही प्राण्यांना खाऊ घातले तरीही चालतील. या उपायामुळे आपली आर्थिक स्थिती हळुहळू सुधारेल.

आणि आपण कर्जापासून मुक्त व्हाल. तसेच तुमचा व्यापार व्यवसाय जर तुमच्या व्यवसायात खूप दिवसांपासून काही अडचण येत असेल. तर शनिवारच्या दिवशी एखाद्या मोठ्या यशस्वी व्यापाऱ्याकडून एखादी छोटीशी लोखंडी वस्तू विकत आणावी.

जसेकी चूक खिळा असे काहीही चालेल. त्यानंतर आपल्या व्यवसायाच्या कोणत्याही ठिकाणी हळदीने स्वस्तिक बनवून त्यावर काळी उडदाची डाळ ठेवून त्यावर ती वस्तू ठेवावी. परंतु या गोष्टीकडे लक्ष द्यावे की तुम्ही जेव्हा उपाय करता त्यावेळी तुम्हाला कुणी पाहणार नाही.

हा उपाय केल्याने आपल्या व्यवसायातील अडचणी दूर होतात. आणि आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. जर तुमच्या व्यापार-व्यवसाय कोणाची नजर लागली असेल कोणी काही करणी केली काळी जादू असेल.

तर कोणत्याही रविवारी ५ लिंबू घेऊन ते मधोमध चिरून दोन दोन भाग करून आपल्या दुकानात व्यवसायाच्या ठिकाणी ठेवून त्यावर एक मुठ काळी मिरी आणि एक मूठ पिवळी मोहरी टाकावी. परंतु हा उपाय गुपचूप करावा.

कोणी आपल्याला पहाणार नाही. आणि कोणाला समजणार नाही अशा प्रकारे हा उपाय करावा. रात्रभर ती तसेच ठेवावे. व सोमवारी सकाळी लवकर उठून ती सर्व सामग्री उचलून एखाद्या निर्जल स्थानी न्हेवून टाकावी.

या उपायामुळे करणी काळी जादू निघून जाते. आणि व्यापारात तेजी येते. दुकानात पैसे देताना व घेताना मनातल्या मनात ७०८ हा आकडा म्हणत जावे. यामुळे आपल्या पैशांमध्ये वाढ होते. बरकत येते.

तसेच पैशांचा कोणताही व्यवहार करायचा असो आपण बँकेत पैसे भरत असलो. इतर ठिकाणी कोणत्याही ठिकाणी पैसे द्यायचे असतील कोणाकडून पैसे घ्यायचे असतील.

तर अशा वेळी ७०८ हा आकडा कायम मनातल्या मनात म्हणत रहावे. यामुळे आपल्या पैशांमध्ये वाढ होत राहते.
आपल्याला वाटत असेल की आपल्या दुकानाला कोणाची नजर लागली आहे.

आपल्या दुकानाला कोणाची नजर लागली असेल तर अमावस्या दिवशी शटर बंद करण्यापूर्वी एक लिंबू घेऊन दुकानाच्या आतील बाजूने सात वेळा ओवाळून शटरच्या आतील बाजूस ठेवून द्यावे. आणि सकाळी दुकान उघडल्यानंतर ते लिंबू जाळून द्यावे.

यामुळे आपल्या दुकानाला लावलेले नजर जळून जाते. जर तुमच्या दुकानात ग्राहकांचे कमतरता झाली असेल. दुकान बऱ्याच दिवसापासून चालत नसेल. किंवा विक्री होत नसेल. तर दुकानातील विक्री होण्यासाठी कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या शुक्रवारी ५ गोमती चक्र घेऊन ते अभिमंत्रित करून घ्यावेत.

त्यानंतर गोमती ५ ही चक्र एका लाल कापडात बांधून देवी लक्ष्मीचे ध्यान करता करता दुकानाच्या दाराशी बांधावेत. तसेच एक नारळ घेऊन दुकानात पूजेच्या ठिकाणी ठेवून त्याचे दररोज पूजन करावे. या उपायामुळे आपल्या दुकानाकडे ग्राहक आकर्षित होतील. आणि आपली विक्री वाढेल.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *