गुरुवार विशेष अंगावर काटा येईल जबरदस्त स्वामी अनुभव साक्षात स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्या.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

भक्तहो दादर येथे राहणाऱ्या सौभाग्यवती स्वाती संदीप मानकर या स्वामी सेवेकरी अनुभव आपल्या सर्वांसोबत मी शेअर करत आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. भक्तहो या ताईंचा अनुभव त्यांच्याच शब्दात मी इथे सांगायला सुरुवात करते.

खूप दिवसांपासूनची इच्छा होती. अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. पण कोरोनामुळे देऊळ बंद होते. नंतर कुठे सुरळीत होऊ लागले. आता जाऊन येऊ म्हटलं तर परत नवीन ओमिक्रोंचे संकट आले. असं करता करता इच्छा राहून गेली.

एकदा असेच माझी जाऊ मिस्टरांचे काका काकी अस सर्व मिळून जायचे ठरवले. तर महिनाभर रेल्वेची तिकिटे मिळत नव्हती. तिकीटच नाहीत. परत कॅन्सल झाली. थोड्या दिवसांनी म्हटलं फक्त आपणच मी मिस्टर आणि मुलगा जाऊ असे ठरविले. परत जायचे रिझर्वेशन होते पण यायचे तिकीट नव्हते. त्यात बस संप होता.

जायचे कसे प्रायव्हेट गाडी करावी तर पैसे जास्त लागणार होते. मग आता काय करायचे. रोजची स्वामी सेवा चालूच होती. मग स्वामींनाच साकडे घातले. मला एकदा तरी दर्शन घायच आहे. आता तुम्हीच काय ते करा. शेवटी माऊलीच ती मनीची इच्छा पूर्ण केली. ध्यानीमनी नसताना ही अशीच बाहेर गेली होती.

शनिवारचा दिवस होता माझ्या बहिणीची नणंद माझ्या घराजवळ राहते. त्यांच्या मला फोन आला. म्हणाल्या माझ्याकडे रात्री नऊ ते साडे नऊ पर्यंत स्वामींच्या पादुका येणार आहेत. तर तू ये. मला काय बोलावे सुचेना. फक्त येते म्हणाले.

आणि तशीच स्वामीं साठी प्रसाद म्हणून पुरणपोळी चाफ्याची फुले घेऊन घरी आले. परत त्यांचा फोन आला की पादुका यायला उशीर होईल. म्हटल हरकत नाही. आम्ही जेवण करून रात्री साडेनऊला बहिणीच्या नंदेकडे गेलो. त्यांच्या घरी गेल्यावर कळाले की दादर भागात पादुका आल्या आहेत.

त्यांचा प्रोग्रॅम खूप आधीच ठरलेला असतो. वेळ ठरलेली असते. नणंदेच्या मुलीने अचानक गुरुजींना विनंती केली. की माझ्या घरी याल का. तर ते हो म्हणाले. रात्री दहा वाजता पादुकांचे आगमन झाले. आणि गाडीतून गुरुजी उतरल्यावर प्रथम माझा मुलगा समोर उभा होता.

आणि गुरुजींनी त्याच्या डोक्यावरचे पादुकांची पेटी दिली. मी धन्य झाले. मग बहिणीच्या नणंदेने विधिवत पूजा करून घरात आणले. मग अभिषेक पूजा भजन शेवटी आरती सर्व यथासांग पार पडले. एकूण पाच गुरुजी होते. आणि त्यात एक किशोरवयीन गुरुजी होते. आणि ते म्हणजे चोळप्पा महाराजांची सहावी पिढीचे वंशज होते.

ते ऐकल्यानंतर तर आणखीनच धन्य वाटले. मला तर अत्यानंदाने रडू येत होते. आणि पुढच्या मुक्कामी निघताना आपण पादुका डोक्यावर घ्यायचा मान माझ्या मुलाला मिळाला. अशी आमची दर्शनाची इच्छा स्वामींनी पूर्ण केली.

त्या पादुका म्हणजे साक्षात स्वामीनी चोल्लाप्पा महाराज यांना दिलेल्या होत्या. साक्षात त्यांचे दर्शन आम्हाला मिळाले. आणि आम्हाला परत एकदा स्वामींचा अनुभव आला. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर फक्त हो या ताईंचा अनुभव खरच खूप छान होता.

त्यांना मनापासून वाटत होते की मला स्वामींचे दर्शन घ्यायचेच आहे. पण स्वामींनी त्यांची इच्छा कशा रीतीने पूर्ण केली ते पहा. कशी योजना आखली. त्यांच्या ध्यानीमनी नसतानाही स्वामिनी त्यांना अशा प्रकारे दर्शन घडवून दिले.

तर भक्त हो या ताईंचा अनुभव आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा.

काही प्रश्न असतील तर कमेंट मार्फत नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *