घरात या दिशेला लावा घड्याळ, विकास होईल, येईल धन दौलत पैसा…!

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपले स्वागत आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला कितीतरी वस्तूंची आवश्यकता असते. या वस्तूंचा वापर करताना कळत-नकळतपणे आपल्या यातून काही शिकवतात. वास्तुशास्त्रानुसार आपल्या आसपासच्या प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो.

प्रत्येक वस्तूंचा आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचे संबंध असतो. तसेच प्रत्येक वस्तूचा चांगला व वाईट प्रभाव पडत असतो. प्रत्येक वस्तूतून सकारात्मक व नकारात्मक ऊर्जेचा प्रसार होत असतो. आपण पाहणार आहोत घड्याळाचा आपल्या जीवनावर काय प्रभाव पडतो ते.

घड्याळ लावताना आपल्याला वास्तुशास्त्राची माहिती असणे आवश्यक आहे. जर घड्याळ योग्य दिशेला लागले असेल तर त्याचे शुभ व सकारात्मक परिणाम आपल्याला पहायला मिळतात. तर घड्याळ जर चुकीच्या दिशेला लावलेले असेल. तर त्याचे आपल्याला नकारात्मक परिणाम मिळतात.

चला तर जाणून घेऊयात घड्याळांविषयी घड्याळ कधीही भेट म्हणून अशा व्यक्तीला द्यावी ज्यांचा काळ चांगला चालला आहे. कारण कोणाला घड्याळ देतो त्यावेळी त्या बरोबर आपले भाग्य देत असतो. आणि अशावेळी जर त्या व्यक्तीची वेळ वाईट असेल तर ती वेळ आपल्यावर येते.

आपले चांगले भाग्य त्याला मिळते. म्हणून घड्याळ भेट म्हणून देताना किंवा घेताना ज्या व्यक्तीची वेळ चांगली असेल त्या व्यक्तीकडून घ्यावी. शक्यतो भेट म्हणून घड्याळ देणे व घेणे दोन्ही टाळावे. कारण आपण कितीही श्रीमंत व प्रतिष्ठित व्यक्तीला घड्याळ भेट म्हणून दिले.

किंवा घेतले परंतु ती व्यक्ती कर्जबाजारी असेल आजारी असेल किंवा इतर काही टेन्शन असतील ते आपल्याला माहीतच नसेल. तर ते आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणून घड्याळ देणे व घेणे टाळावे. घड्याळाचा थेट संबंध घरातील सदस्यांशी येतो.

कारण दिवसभरातून कितीतरी वेळा प्रत्येक व्यक्तीची नजर घड्याळावर जात असते. प्रत्येक वस्तूंचे महत्त्व वास्तूशास्त्रीय दृष्ट्या महत्त्व आहे. व प्रत्येकाला काही विशिष्ट स्थान आहे. घरात नेहमी सुख संपत्ती धन समृद्धी व आनंद रहावा यासाठी घड्याळ योग्य दिशेला असणे खूप आवश्यक आहे. दक्षिण भिंतीवर घड्याळ कधीही लावू नये.

दक्षिणेकडे टेबल असेल तर त्यावर ही घड्याळ ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. वाद-विवाद मानसिक टेन्शन नुकसान हे सर्व घड्याळ दक्षिण दिशेच्या भिंतीवर असल्याने आपल्या जीवनात घडते. दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. त्याबरोबरच पित्रांचे दिशा आहे. म्हणून जर या दिशेला घड्याळ लावले तर आपल्याला सतत त्या दिशेकडे बघावे लागते.

म्हणजे आपण साक्षात मृत्यू व अधोगतीकडे सारखे पाहत असतो. म्हणून तर तुमच्याही घरात दक्षिण दिशेला घड्याळ असेल तर तिची दिशा त्वरित बदला. मग घड्याळ कोणत्या दिशेला लावावे. घड्याळ लावण्यासाठी पूर्व दिशा खूप शुभ दिशा आहे.

पूर्व दिशेला घड्याळ लावल्याने आपल्या कुंडलीत शनी व मंगळ दोणीही मजबूत होतात. आणि जर मंगळ मजबूत झाला तर प्रगती होते. घरात लक्ष्मीचे आगमन होते. परंतु घड्याळावर धूळ कधीही जमा होऊ देऊ नये. घड्याळ वरचेवर नेहमी स्वच्छ करीत राहावे.

उत्तर दिशा ही घड्याळ लावण्यासाठी शुभ मानले जाते. उत्तर दिशेला घड्याळ लावल्यास आपल्याला यश व प्रसिद्धी मिळते. उत्तर दिशेला घड्याळ लावल्या आपल्या कुंडलीतील शनि सूर्य व राहू मजबूत होतात. आपल्या घरात जितके सदस्य असतील.

प्रत्येकाच्या कुंडलीत ग्रह मजबूत होतात. पश्चिम दिशेला घड्याळ लावल्यानेही आपली प्रगती होते. आपल्याला प्रगतीच्या वेगवेगळ्या संधी मिळतात. कमी कष्टात जास्त फळे मिळतात. परंतु घड्याळ ठेवताना कधीही कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूवर ठेवू नये.

कारण हा खूप मोठा वास्तुदोष समजला जातो. तसेच दरवाजाच्या अगदी वरती घड्याळ कधिही लावू नये. असे म्हणतात की घरातून आत बाहेर करताना घड्याळावरील नकारात्मक ऊर्जा आपल्यावर पडते.

आपले संपूर्ण जीवन नकारात्मकतेने भरून जाते. म्हणून कधीही चुकूनही घड्याळ दरवाज्याच्या अगदी वर लावू नये. हे तर झाले घड्याळ कुठे लावावे व कोठे लावू नये याविषयी. आता आपण पाहूयात घड्याळ संबंधी काही विशेष बाबी.

घड्याळ नेहमी वेळेवर असावे. घड्याळ कधीही मागे असू नये.२-५ मिनिटे थोडे असेल तर काही हरकत नाही. परंतु जर घड्याळ मागे असेल तर आपणही प्रत्येक गोष्टीत मागे पडतो. बंद पडलेले घड्याळही अरे घरात कधीच ठेवू नये. कारण जर घड्याळ बंद पडले तर आपली प्रगतीही बंध पडते.

व आपले नुकसान होण्यास सुरुवात होते. म्हणून एकतर ते घड्याळ दुरुस्त करावे. किंवा टाकून द्यावे. परंतु बंद पडलेले घड्याळ घरात कधीही ठेवू नये. घड्याळ घेताना शक्यतो गोल आकाराचे घड्याळ घ्यावे. कशातरी वाकड्यातिकड्या आकाराचे चित्रविचित्र प्राण्यांच्या आकारांचे घड्याळ घरात कधीही ठेवू नये.

त्याबरोबरच घड्याळाचा मधुर दूरध्वनी असावा. मोठ्याने व कर्कश आवाजात करणारे घड्याळ असेल तर घरातील वातावरण अशांत होते. व त्याचा वाईट परिणाम घरातील सदस्यांवर पडतो. घड्याळाकडे पाहून मनाला प्रसन्न वाटले पाहिजे. असे घड्याळ असावे.

आपली प्रगती व्हावी आपल्याला प्रसिद्धी मिळावी अशी इच्छा असेल. तर कोणत्याही मंदिरात गोल आकाराचे घड्याळ जे मध्ये पांढरे व बाजूचे पट्टी लाल असेल असे घड्याळ गुप्त दान म्हणून करावे.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

म्हणजे मंदिरात येणारे व्यक्तीच्या वेळ पाहतील. त्यामुळे आपला चांगला काळ येईल. मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *