घराच्या दरवाजावर आठवणीने लावा ही एक गोष्ट…मग पहा सुख तुमच्या दारात उभे राहील..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो आपल्या प्रत्येकाच्याच घरात काही ना काही अडचणी असतात, त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण खुपजण गणपती बाप्पांना प्रार्थना करत असतो. त्यांची मनोभावे पूजा अर्चा करत असतो. पुराणात गणपतीचे खूप महत्व सांगितले आहे, त्यांच्या चमत्काराच्या कथा आपण आजवर खूप ऐकत आलो आहोत.

या कथेतूनच आपल्यावर संस्कार होत असतात, गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केली तर आपली संकटे नक्कीच पळ काढतात.मात्र त्यांची पूजा करताना काही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

मित्रहो येणारी संकटे दारातूनच बाहेर जावी आणि सकारात्मक शक्ती घरात यावी यासाठी अनेकजण गणपती बाप्पांना घराच्या चौकटीच्या आतमध्ये किंवा बाहेर स्थापित करतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते व वाईट शक्ती घरात यायच्या आधीच बाहेर निघून जातात.

तसेच घरातील वातावरण चांगले राहिल्याने, मनस्ताप कमी होऊन सर्वांचे आरोग्य चांगले राहते. पण मंडळी गणपतीची स्थापना करताना काही खास गोष्टी आपणाला माहीत असणे गरजेचे असते. आज आपण या लेखातून या खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

जेव्हा आपण गणपती बाप्पांची मुर्ती स्थापन करतो त्यावेळी गणपती बाप्पांची नजर ही आत घरात असायला हवी. त्यांची नजर ही बाहेरच्या बाजूला नसावी. जर आपण गणपती बाप्पांची मुर्ती बाहेरील बाजूस लावली असेल तर ठीक त्याच ठिकाणी आतील बाजूस बाप्पांची मुर्ती स्थापित करावी.

जेणेकरून बाप्पांची आपल्या घराकडे पाठ होणार नाही, कारण मित्रहो बाप्पांच्या पाठीमागे दारिद्र्य, नकारात्मक यांचे स्थान असते. जर आपण त्यांची पाठमोरी मूर्ती घरात स्थापित केली तर आपल्या घरात सुद्धा अशांती राहील.

आपल्या घरात देखील दुःख आणि दारिद्र्य वास करेल. पण आपण त्याच ठिकाणी बाप्पांची दुसरी मूर्ती त्याच्या पाठीमागे लावली तर आपल्या घरात सुख, संपत्ती, समाधान पसरेल. तसेच जर तुमच्यापैकी कोणी घरामध्ये गणपती बाप्पांच्या दोन मुर्त्या एकत्र ठेवत असेल तर हे चुकीचे आहे.

वास्तुशास्त्रानुसार असे करणे आपल्या कुटुंबासाठी अयोग्य आहे. कारण जेव्हा गणपती बाप्पांच्या दोन मुर्त्या एकत्र येतात तेव्हा त्यातील ऊर्जेची जोरदार टक्कर होते, व त्यातून अशुभ शक्ती बाहेर पडते.

ती अशुभ शक्ती खूपच घातक असते, त्यामुळे जर घरात दोन मुर्त्या असतील तर त्या वेगवेगळ्या ठिकाणी पुजाव्या. तसेच जर घरातील बाप्पांची मूर्ती दुभंगली असेल किंवा, तिला तडा गेला असेल अन्यथा तिचा जर रंग फिका पडला असेल तर ती मूर्ती नदीच्या वाहत्या पाण्यात सोडून द्यावी.

कारण अशा मुर्ती मधून सकारात्मक ऊर्जा मिळत नाही, त्यामुळे त्या मूर्तीला विसर्जित करून त्या ठिकाणी नवी मूर्ती स्थापित करावी. तसेच घरात डाव्या सोंडेच्या गणपती बाप्पांची पूजा करणे अधिक लाभदायक ठरते. कारण ते लवकर प्रसन्न होतात.

जे उजव्या सोंडेचे बाप्पा असतात त्यांची पूजा करणे अवघड असते, जी सहज शक्य नसते. गणपती बाप्पांची स्थापना शक्यतो पुर्व दिशा अथवा ईशान्य दिशेला करावी. घरामध्ये त्यांची स्थापना ईशान्य दिशेला करावी व त्यांचे मुख पश्चिमेकडे असावे.

तसेच जर आपणाला सर्व लाभ हवे असतील तर सर्व प्रकारच्या देवी देवतांची मंदिरात स्थापना करून मनोभावे पूजा करणे आवश्यक आहे. तसेच एकाच मंदिरात दोन एकसारख्या मुर्त्या असणे अशुभ असते.

घरामध्ये गणपतीची मुर्ती बसलेली असावी व दुकानात त्यांची मुर्ती उभी असावी. तसेच यावेळी लक्षात असुदे की गणपती बाप्पांची मूर्ती जी असेल तिचे पाय जमिनीला टेकलेले असावे. त्यामुळे प्रत्येक कामात स्थिरता आणि सफलता प्राप्त होते.

तसेच जर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर शेंद्रिय रंगाच्या गणपती बाप्पांची पूजा करावी. जर घरामध्ये गणपती बाप्पांचा फोटो लावायचा असेल तर त्यामध्ये मोदक व उंदीर जरूर असावा त्यामुळे घरात समाधान आणि बरकत राहते.

तसेच बाप्पांची घरात स्थापना करताना सहज कोणत्याही दिवशी करू नये कारण याचा वाईट परिणाम आपल्या मनावर होऊ शकतो. त्यांची स्थापना मंगळवारी करू नये, चतुर्थी, चतुर्दशी तसेच नवमी देखील नसावी.

चैत्र, वैशाख, ज्येष्ठ व माघ महिन्यातील शुक्ल पक्षात बाप्पांची स्थापना करावी. त्यामुळे घरामध्ये शुभ वातावरण निर्माण होईल आणि सुख टिकून राहील. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *