तिच्या आयुष्यातील खडतर प्रवास…एक झाडूवाली ते बँक मॅनेजर.! नक्की वाचा..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो आपण कोणाला किती मदत करतो हे महत्वाचे नसते तर ती मदत योग्यवेळी करता आली पाहिजे. आयुष्यात सर्वात महत्त्वाचे काय असेल तर. भूक..! हो तीच माणसाला सुधारते सुद्धा आणि बिघडवते सुद्धा. तिच्याकडून नेहमीच खुप काही शिकण्यासारखे असते.

मित्रहो आज आपण अशाच एका आईची कथा जाणून घेणार आहोत जिने आपल्या लेकींसह आयुष्यात खडतर प्रवासाचा रस्ता पार केला आहे. या सुजल, नम्र स्त्रीचे नाव शंतांम्मा होय तिची ही कथा असून कथेचे नाव “देणाऱ्याचे हाथ” आहे आणि याच्या लेखिका प्रणिता खंडकर असे आहे.

आज शांताम्माच्या नोकरीचा अखेरचा दिवस होता, गेल्या ३३ वर्षांपासून ती या कार्यात कार्यरत होती. मात्र या शाखेत येऊन तिला फक्त एक वर्ष झाले होते, आधीच्या मॅनेजरचे कोव्हिडं मुळे निधन झाले आणि त्याठिकाणी तिची बदली झाली होती. त्यामुळे काम सुद्धा खूप पेंडिंग होते.

म्हणून ती आल्या दिवसापासूनच कामात व्यस्त होती. त्यामुळे तिच्याबद्दल जास्त कोणाला काहीच माहिती न्हवते किंवा जिव्हाळा देखील न्हवताच. त्यामुळे कार्यक्रमात दोन चार जणांची भाषणे उरकून तिला बोलण्याची संधी मिळाली आणि यावेळी सुद्धा तिने आपले बोलणे थोडक्यात आवरले.

सर्वांचे आभार मानले आणि दोन शब्द थांबवले, त्यानंतर कार्यक्रम संपला असे जाहीर करणार इतक्यात बँकेचा शिपाई सुरेश तिथे गडबडीने आला आणि त्याठिकाणी दोन शब्द बोलण्याची त्याने परवानगी मागितली. खरेतर मगापासून सर्वांचे भाषण ऐकून सभा कंटाळली होती.

त्यामुळे त्याचे शब्द ऐकण्यासाठी कोणीही फार काही उत्सुक न्हवते पण तरीही शिष्टाचार म्हणून सर्वजण थांबले. विशेष म्हणजे सुरेशने आल्या आल्या शांताम्माच्या पायावर लोळण घेतले होते आणि हे पाहून त्याचे बोलणे ऐकण्याची थोडी उत्सुकता निर्माण झाली होतीच.

सुरेश हळूहळू बोलू लागला “मंडळी या बाई खरच लय चांगल्या आहेत, कोव्हिडंच्या काळात माझ्या बायकोला पॉजेटीव्ह म्हणून दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. तसेच मलाही तेव्हा १४ दिवस होम क्वारनटाईन केले होते, त्यामुळे माझ्या दोन लेकरांची काळजी खूप लागली होती.

माझे आईवडील सुद्धा गावाकडे राहतात. अशा परिस्थितीत त्यांनी इथे येणे अशक्य होते. त्या नातेवाईक देखील लॉकडाऊनचा काळ असल्याने माझ्या लेकरांना कोणी घेऊन जात न्हवत. पण अशावेळी या बाई अगदी आईसारख्या मदतीला धावून आल्या.

त्यांनी माझ्या लेकरांना आसरा तर दिलाच शिवाय रोज ऑफिसला जाताना ड्राइव्हर हातून चपाती भाजीचा डबा देऊन जात होत्या. काही पैसे देखील दिले आणि परत काही गरज लागली तर कॉल कर म्हणून सांगितले. मॅडमने आपल्या अधिकाराचा योग्य वापर करून मला दवाखान्यात दाद मिळवून दिली होती.

माझी बायको निधन पावल्यावर तिचा फक्त चेहरा पाहायला मिळाला. मूनसिपार्टीवाल्यानीच तिला दहन दिले. १४ दिवसानंतर या माउलीने माझ्या लेकरांना माझ्याकडे आणून सोडले. तेव्हा माझ्या लेकरांनी जे सांगितले ते ऐकून मी थक्कच झालो. तिच्या पायात दंडवत घालण्याची इच्छा झाली.

असे म्हणताच श्रोत्यांची उत्सुकता आणखीन ताणली होती आता..तो पुढे म्हणाला “४० वर्षांपूर्वी शांताम्माचे लग्न शिवाप्पा सोबत झाले होते, तिचे गाव आंध्रप्रदेशातील एक छोटंसं खेड, नववी नापास झाल्यावर तिने शाळा बंद केली. शिवाप्पाची आठवी झाली होती पण कोणाच्या तरी ओळखीने मुंबई मध्ये बँकेत झाडूवाला म्हणून काम करू लागला होता.

लग्नानंतर ती शिवाप्पा सोबत मुंबईत आली व धारावी मधील एका झोपडपट्टी मध्ये त्यांचा संसार सुरु झाला, दरम्यान तिला दोन गोंडस मुली देखील झाल्या. मुलींचा सांभाळ करण्यातच तिचा दिवस जाऊ लागला, इकडे शिवाप्पा काम करत होता पण त्याला दारूचे व्यसन लागले व तो त्याच्या आहारी गेला.

त्याचा पगार घरी यायचा बंद झाल्याने दोन वेळच्या जेवणाची सुद्धा सोय होईना. याच दारूच्या नशेत शिवापा एकदा मोठ्या ट्रक खाली येऊन चिरडला गेला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी तिच्यावर संकटांचा डोंगर कोसळला होता, पदरातील दोन मुलींचा सांभाळ कसा करावा हा प्रश्न होताच.

हळूहळू ती तीन चार घरी धुणीभांडी करू लागली, त्यापैकी एका कुटुंबातील देशपांडे साहेब हे बँकेत कामाला होते. त्यांच्या मदतीने तिला शिवाप्पाच्या बँकेत त्याच्या जागी अनुकंप तत्वावर झाडूवाली ची नोकरी मिळाली. व ती तिथे काम करू लागली आता पैसे तर येत होते.

पण आपल्या सारख आयुष्य आपल्या लेकिनी जगावं अस तिला मुळीच वाटत न्हवत शिवाय एक झाडूवाली म्हणून लोक किती त्रास देतात हे सुद्धा तिला प्रकर्षाने जाणवत होते. दरम्यान तिची दादरच्या बँक शाखेत तिची बदली झाली, व तेथील बँक मॅनेजर सोनवणे मॅडम यांच्याशी तिची ओळख झाली.

त्यांचा स्वभाव खूपच छान होता, त्यांनी शांताम्माची परिस्थिती जाणून घेतली, व त्यांनी तिला पुढे शिकण्यास प्रवृत्त करून ssc ची बाहेरून परीक्षा देण्यास सांगितले. त्यासाठी फॉर्म सुद्धा उपलब्ध करून दिला शिवाय प्रौढ शिक्षण वर्ग चालवणाऱ्या जोशी मॅडम आणि माने सर यांच्याशी ओळख करून दिली व शांताम्माने आपल्या अभ्यासास पुन्हा सुरुवात केली.

ती ५५% गुण मिळवून पास झाली, पुढे तिने १२ वी पर्यंतचे शिक्षण देखील पूर्ण केले. तिला तिच्या मुलींनी सुद्धा साथ दिली व ती पुढे पदवीधर झाली. पुढे तिने बँकेच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली अन टप्पे गाठत ती मॅनेजरच्या पदापर्यंत पोहचली. जसा पगार वाढला तेव्हा तिने घाटकोपर येथे दोन खोल्या विकत घेतल्या.

आता सगळं काही सुरळीत चालू होतं. दरम्यान एके दिवशी तिला स्टेशनच्या परिसरात तीन मुले भुकेने व्याकुळ झालेली पाहायला मिळाली, जेव्हा तिने त्यांची चौकशी केली तेव्हा समजले की ती सफाई कामगाराची मुले असून बाप दारू पिऊन निधन पावला आहे, त्याच्या व्यसनाला कंटाळून आई आधीच घर सोडून निघून गेली होती.

आता त्यांच्या कडे लक्ष देणारे कोणी न्हवते, भाडे न दिल्यामुळे घरमालकाने बाहेर काढले होते. शांताम्माने त्यांना चार दिवस सलग वडापाव खायला दिला, पण पुढल्या दिवशी त्यातील एक मुलगा वडापाव चोरताना सापडला, व त्यांना जेव्हा मार देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत होते.

तेव्हा शांताम्माने मध्यस्थी करून त्यांना वाचवले व आपल्या घरी आणले, त्यांना खाऊ घातले. पुढे वडील कंत्राट कामगार म्हणून त्यांना काही सरकारी मदत मिळते का याचीही चौकशी केली, पण तशी काही सोय नाही हे कळताच तिने मूनसिपार्टी च्या शाळेत त्यांना भरती केले, व त्यांना कपडे आवश्यक गोष्टी आणून दिल्या.

आता ती मुले सुद्धा आनंदाने शाळेत जात होती, घरकामात मदत करत होती. अपार्टमेंट मधील लोकांनी सुरुवातीला तक्रार केली पण नंतर ते सुद्धा शांत झाले. आता शांताम्मा ची मोठी मुलगी सरकारी नोकरी करते, तिला चांगला पगार आहे. दुसरी मुलगी पॅथिओलॉजी करते.

शिवाय त्या तीन मुलांमध्ये सांभाळलेला मोठा मुलगा १२ झाल्यावर इलेक्ट्रिशन चा कोर्स करून एका कंपनीत कामाला लागला आहे, त्याचा धाकटा भाऊ आता १२ वी पूर्ण करत आहेत तर छोटी बहीण आता १० वी मध्ये आहे. अशा पाच मुलांसह तिने आपले कुटुंब सुंदर पध्दतीने सांभाळले आहे.

तिची ही कथा ऐकून तिथे असणारा प्रत्येक जण थक्क झाला होता, कारण तिची ही अबोल मदत अनेकांना चकित करून सोडत होती. सुरेशचे बोलणे थांबल्यावर तिथले वातावरण पूर्णपणे शांत झाले होते, सगळ्यांच्या चेहऱ्यावर चकित भाव होते.

खरच मित्रहो शांताम्माने केलेली मदत, त्या मुलांचे भविष्य घडवणे खूप मोलाचे होते. तिची ही शिकवण जर प्रत्येकाने थोडी जरी आत्मसात केली तरी गरजू माणसाला मदत मिळेल व त्याचा आशीर्वाद देखील आपणाला मिळेल!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *