आईवडिलांचा हा एकुलता एक मुलगा, नशेत वाया गेलेला.. आणि हे कृत्य करून केला कहर…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो माणूस नेहमीच आपल्या मुलांना जपत असतो, त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतो. मात्र मुले आपल्या आई वडिलांच्या भावना फार कमी समजतात. त्यांच्या अपेक्षांचा खूपदा भंग करत असतात. अशीच एक कथा आज या लेखाद्वारे आपण जाणून घेणार आहोत.

ही कथा आहे व्यसनमुक्ती केंद्रातून एक मुलगा जवळपास २३ वर्षाचा होता. ज्याला या केंद्रात दाखल केले होते. त्याचे डोळे खूपच राखट होते, त्यातून काहीसं सांगितलं जात होत जे अबोल होते. हा एकुलता एक आईचा आणि वडिलांचा खूप लाडका होता, अगदी लाडात वाढला होता.

आई बाबा दोघेही शिक्षक होते, इयत्ता दहावी पर्यंत त्याची लाईफ शिस्तबद्ध होती. मात्र जेव्हा तो पुढील शिक्षणासाठी कॉलेज मध्ये गेला तेव्हा त्याचे मित्र बदलले. त्यामुळे निरनिराळ्या सवयी लागू लागल्या. यामध्ये काही वाईट सवयी सुद्धा होत्या. त्याला वाईट वळण लागले, आणि त्यातच त्याचे इतर मित्र शिकून पुढे गेले. त्याचा खास मित्र सुद्धा स्कॉलरशिप मिळवून परदेशात गेला.

तो डिप्रेशन मध्ये येऊन आणखी प्यायला लागला, नंतर मग तो आई वडिलांना सांगून ऑस्ट्रेलियाला शिकायला गेला. तिथे त्याला २० लाख रुपये भरून शिकायला पाठवले. मात्र तिथेही त्याचे व्यसन वाढले, म्हणून त्याला तिथून हाकलले. मग त्याच्या वडिलांच्या मित्राने त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार मग त्यांनी आपल्या मुलाला तिथे दाखल केले, मात्र त्यांना त्याची खूप काळजी वाटत होती. जवळपास महिनाभर तो तिथे राहिला, त्याने मग आपल्या आई वडिलांना विश्वासात घेतले आणि पुन्हा अस न करण्याचे वचन दिले.

त्याला घरी आणले, आठवडा भर तो व्यवस्थित राहिला. पण पुन्हा त्याने हळूहळू व्यसन सुरू केले. त्याची हिंमत वाढली, तो घरातच दारू पिऊ लागला. आई बाबांसमोर तो सिगारेट ओढू लागला, आईला बाबांना नको त्या शिव्या देऊ लागला.

इतकेच नव्हे तर तो त्यांच्यावर हात देखील उचलायला लागला. आता हे त्याच अति होऊ लागलं होतं, म्हणून त्याच्या बाबांनी पुन्हा केंद्रात फोन केला. जेव्हा केंद्रातील सदस्य तिथे पोहचले तेव्हा तो घाबरला, पण त्याचे काहीही न ऐकून घेता त्याला उचलून आणले.

त्याला आणल्यावर लगेचच पुन्हा पाठीमागून बाबांचा फोन आला, ” तो कसा आहे.आम्ही त्याला भेटू शकतो का?” त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की तुम्ही आता त्याचे अजिबात लाड करू नका. मात्र त्याच्या आईने हट्ट केला आणि पुन्हा दहा दिवसांनी त्यांची भेट करवून दिली.

तेव्हा त्याने पुन्हा त्यांची माफी मागितली, आणि इंग्लंडला शिकायला जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या शब्दात अडकून पालकांनी त्याला परवानगी दिली. तिथे गेल्यावर मात्र त्याने आपल्या वागण्याची पातळीच ओलांडली.

तिथे देखील तो खूप दारू पिऊ लागला.गेली चार वर्षे तो तिथे होता. मात्र परवा बातमी कळली की त्याने ज्या बार मध्ये दारू पिली होती त्याच बार मध्ये एका वेटरला वॉशरूम मध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून सोळा वर्षाची त्याला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे कोर्टाने.

आता ही बातमी आसपास सुद्धा कळली असून, आई वडिलांना घराबाहेर जाणे कठीण झाले आहे. कोणाला तोंड दाखवणे अवघड झाले आहे. मुलाच्या या कृत्याने आई बाबांची मान खाली गेली होती, त्यांनी आपलं राहत घर सोडून दुसरीकडे राहायला गेले. त्यांची अवस्था खूपच बिकट झाली होती.

खरच मित्रहो आपल्या आई वडिलांना सुखी ठेवणे पुण्य मिळवल्या समान असते. म्हणून नेहमी त्यांची पूजा करा, त्यांच्या आयुष्याचे सारथी व्हा. तसेच आमचा आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *