मी स्वामींचे भक्ती भावे पूजा करतो तरी मला त्रास का ? तरी लोक मला का फसवतात ?

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो एका भक्ताला एक प्रश्न पडला. की मी आज सकाळी उठल्यावर देवांची पूजा केली. स्वामी समर्थांची पूजा केली. आणि स्वामी समर्थांना विचारले. स्वामी मी तुमची भक्तिभावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही.

कुणाला लुबाडत नाही. तरी लोक मला का टाळतात. मला का फसवतात. मला काल लुबाडतात. मला का धोका देतात. तुम्ही का मला या वेळी मदत करत नाही. तर स्वामी म्हणाले बाळा त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात. त्यामुळे त्यांचा तात्पुरता फायदा होतो.

पण तू निराश होऊ नकोस. तुला फसवल्याने त्यांना जे पुढे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांना कधीही मिळणार नाही. त्यांच्यापासून ते खूप लांब गेलेली असेल. आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागतील. वरवर ते सुखी दिसत असले तरी आतून त्यांना खूप दुःख असेल.

त्याची फेड त्यांना लगेच मिळणार नाही. आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल होऊन मिळून जाईल. म्हणून निष्ठा सोडू नकोस. प्रामाणिक रहा. भक्ती कर कोणाचे वाईट चिंतू नकोस. आणि चांगली कर्म करत राहा. दुसरे काय करत आहेत त्याकडे लक्ष देऊ नकोस.

दुसरे जे करत आहेत तशी तू करू नकोस. तुझे सत्याचे तुझे प्रामाणिकपणाचे तुझे चांगल्या कर्माचे फळ मी तुला नक्की देईन. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *