घरातील अडचणी वाढत आहेत..तर गोमती चक्राचा करा असा उपाय…जाणून घ्या याचे रहस्य..!!

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो नेहमी अनेकांच्या आयुष्यात खूपशा अडचणी तग धरून असतात, त्यांचा खूपदा आपणाला कंटाळा येतो आणि मग घरातील वातावरण तणावपूर्ण होते. शिवाय कोणाचे कोणाशी पटत नाही, भांडण, वादविवाद वाढत जातात. सकारात्मक शक्ती दूर होऊन सर्वत्र नकारात्मकता पसरते.

मात्र आता यावर एक उत्तम उपाय सापडला असून, आपण हा उपाय नक्कीच केला पाहिजे. त्यामुळे आयुष्य अगदी सुखमय आणि सोप्प होऊन जाईल. तर मित्रहो लेख पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला हा उपाय पूर्णपणे कळेल.

तर मित्रहो हे गोमती चक्र खूप मदत करते, हे सर्वसामान्य चक्र नसून याच्यामागे मोठा अर्थगर्भ लपला आहे. हे चक्र गोलाकार असून यामध्ये लहान गोल होल असतात. याला श्रीकृष्णाचे प्रतीक मानले जाते, शिवाय याला माता लक्ष्मीच्या मंदिरात ठेवल्याने संपत्तीची कमतरता भासत नाही.

हे आपल्या आयुष्यात खूप उपायकारक असते, त्याचा योग्य पध्दतीने उपयोग करता आले पाहिजे. चला तर आपण जाणून घेऊया हे चक्र व याचा उपयोग काय आहे. मित्रहो जर तुम्हाला व्यवसायात नुकसान होत असेल.

आर्थिक परिस्थिती बिकट होत असेल तर हे अकरा गोमती चक्र कोणत्याही महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेऊन त्यांना अभिमंत्रित करावे. नंतर त्यांना हळदीचा टिळा लावून भगवान महादेवाचे स्मरण करत त्यांना पिवळ्या कापडात गुंडाळावे. व ते संपूर्ण घरात फिरवावे. मनातल्या मनात महादेवाचे स्मरण करत हे पिवळ्या कापडातील गोमती चक्र पाण्यात वहावे.

तसेच जर आपले वैवाहिक जीवन खूप तणावपूर्ण असेल, पती पत्नीचे अजिबात पटत नसेल. हे वाढते मतभेद थांबवण्यासाठी अकरा गोमती चक्र घेऊन ते दक्षिणेला फेकून द्यावे. याचा नक्कीच आपणाला फायदा होतो. नात्यात गोडवा टिकून राहतो.

तसेच जेव्हा आपण कधी घराचे बांधकाम करणार असतो तेव्हा इमारतीच्या पायामध्ये हे अकरा गोमती चक्र अभिमंत्रित करून टाकावे. त्यामुळे घरातील वास्तुदोष नष्ट होऊन राहणाऱ्या सदस्यांना आरोग्य लाभते.

तसेच जर घरातील एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल तर हे गोमती चक्र घेऊन त्याच्या डोक्यावरून ओवाळावे. त्यामुळे त्याचा आजार कमी होऊन, तब्येत चांगली होते. हे सगळे गोमती चक्र त्याच्यावरून ओवाळून एका कापडात बांधून त्याच्या पलंगाला बांधावा.

तसेच जर कोणी बाहेर प्रवासाला जाणार असेल तर हे गोमती चक्र त्याच्या पर्स मध्ये ठेवावे, त्यामुळे प्रवास सुखमय होतो. तसेच आपण जर सात गोमती चक्र लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवले तर आपल्याला पैशाची चणचण भासत नाही.

तसेच घरातील एखादी व्यक्ती भित्री असेल, तर त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी या गोमती चक्राची माळ त्याच्या गळ्यात घालावी. त्यामुळे त्याचा भित्रेपणा कमी होण्यास मदत होते.

हे गोमती चक्र आपल्या घरात सुखसमृद्धी आणते, म्हणून मित्रहो याचा नक्की वापर करा. तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *