मृत्यूनंतरही या ५ गोष्टी येतात आपल्या सोबत. जाणून घ्या कोणत्या.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो माणूस जन्माला आला म्हणलं की त्याचा मृत्यू हा अटळ असतोच, कधी ना कधी त्याला मृत्यूला सामोरे जावे लागतेच. जन्म आणि मृत्यू हे कधीही न सुटणारे कोडे असून याच्या पाठीमागे खूप गंभीर अर्थ लपले आहेत. मात्र आपण याकडे नेहमी एक सामान्य बाब म्हणूनच पाहतो.

पण हे आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग असतात, ज्यांच्यामुळे आपले जगणे सुरू असते. आपला जन्म होण्यामागे सुद्धा खास कारण असते तसेच मृत्यू होण्यामागे देखील कारण असते. मृत्यू झाल्यावर अनेकजण म्हणतात की सगळं संपून जातं, आपल्या सोबत काहीच येत नाही.

फक्त आपलं शरीर एक राख बनून निपचित हवेत उडत असते. मात्र त्या राखेतून जो आत्मा निघून गेलेला असतो तो आपल्या सोबत जवळपास ५ गोष्टी घेऊन जातो. म्हणजेच माणूस मेल्यावर देखील या पाच गोष्टी आपल्या सोबत घेऊन जातो ज्या खूप महत्वाच्या आहेत. हा लेख तुम्ही पूर्ण वाचला तर तुम्हाला त्या ५ गोष्टी कोणत्या ते कळेल.

पहिली गोष्ट म्हणजे कामना होय. कामनाचा दुसरा अर्थ म्हणजे इच्छा. इच्छा ही प्रत्येकाला असते. अगदी निरनिराळी इच्छा सर्वजण बाळगतात. खरतर खूपशा लोकांना जास्त आयुष्य हवं असत, तर काही लोकांना जगण्याचा कंटाळा येतो.

त्यामुळे त्याप्रमाणेच प्रत्येकाची इच्छा असणार हे नक्की. मात्र जेव्हा आपला मृत्यू आपल्या डोळ्यासमोर असतो तेव्हा मित्रहो आपली जी इच्छा असते तिचे जर स्मरण केले तर ती आपल्या सोबत येते आणि येणाऱ्या पुढील जन्मात तिचे पूर्तीकरण होते.

तसेच दुसरी गोष्ट म्हणजे वासना. ही वासना म्हणजे सर्वाना वाटत की शरीरसुखच असते, पण त्याचा अर्थ तसा नसून वासना म्हणजे आपल्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या जोडीदाराशी भरभरून आयुष्य जगण्याची इच्छा असा त्याचा अर्थ होतो.

वासना ही कामनाची बहीणच असते, त्या दोघींचाही तोच अर्थ होतो. आपण मृत्य समयी ज्यांची आठवण करतो किंवा कामना करतो पुढील जन्मात आपला जन्म त्या योनीत होतो. म्हणून मृत्यू जवळ येता आपण कोणत्याही कामना किंवा वासनेचे अजिबात स्मरण करू नये.

तसेच आपले चांगले किंवा वाईट कर्म देखील आपल्या मृत्युला कारण असते, आपण आपले कर्म कसे करतो यावर आपला पुढील जन्म आणि त्या जन्मातील सुख अवलंबून असते. जर या जन्मात आपलं कर्म वाईट असेल तर आपणाला पुढे खूप वाईट दिवस येतात.

शिवाय आपली परिस्थिती खूप बिकट होते. मात्र जर आपले कर्म चांगले असतील तर आपलं पूढील जन्मात आयुष्य सुखमय होते. तसेच आपलं पुण्यकर्म सुद्धा मृत्यूनंतर आपल्या सोबत येते. आपल्या कर्माची फळे नंतर आपणाला आवर्जून दिली जातात.

त्यामुळे कर्म उत्तम असेल तर आपणाला पुढील जन्म चांगला मिळतो अन्यथा आपले कर्म वाईट असेल तर आपणाला यमलोकी सुद्धा यातना सोडून काही प्राप्त होत नाही. त्यामुळे आपण नेहमी आपले कर्म हे सत्कर्म ठेवावे.

तसेच आपण केलेली मदत किंवा घेतलेली मदत सुद्धा आठवणीने परत करावी. आपण कोणाकडून जर कर्ज वगैरे घेतले असेल तर ते वेळीच परत करावे, अन्यथा जेव्हा आपण कर्ज न फेडताच मृत्यूला कवटाळतो तेव्हा ज्याचे कर्ज घेतले आहे.

तो मृत्यूलोकी आल्यावर सुद्धा कर्ज मागतो आणि तेव्हा कर्ज न फेडल्याने जी आपणाला शिक्षा दिली जाते ती खूप भयानक असते. एवढे करूनही ते कर्ज तिथे अजिबात फिटत नाही ते आपणाला पूढील जन्मात सुद्धा झेलावे लागते.

या पाच गोष्टी नेहमी आपल्या सोबत असनार आहेत, त्यामुळे त्यांचा योग्यवेळी वापर करावा. कोणाला त्रास न देता आयुष्य जगावं, आणि जे आपल्याला त्रास देतात त्याची त्यांच्याकडून परत फेड करून घेतली जातेच. त्यामुळे आपण आपलं सत्कर्म करत राहायच.

तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *