जर असे घडले तर समजून घ्या काहीतरी शुभ घडणार आहे.. शुभ संकेत रहस्य..!

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व असते. कधीकधी व्यक्तींची वेळ चांगली असते. तर कधी कोणासाठी वाईट. कधी कधी आपण म्हणतो ना माझीही वेळ येईल. वेळेवर कोणाचेही बंधन नाही.

कितीही श्रीमंत व्यक्ती असले आणि त्यांच्यावर वाईट वेळ आल्यास त्या व्यक्तीलाही झुकावेच लागते. कितीतरी लोकांना श्रीमंतिकडून गरीब होताना बघितलेच असेल. मग आपण म्हणतो वेळे पुढे कोणाचीही काहीही चालत नाही.

काय परिस्थिती होती यांची व आज कशी वेळ आली. अशी कोणतीही व्यक्ती नसते. ज्याचे जीवन बालपण तरुणपण व म्हातारपण या तिन्ही वेळा सारखेच आहे. जी व्यक्ती बालपण खूप कष्टात काढते. त्यांचे प्रोड पण मजेत जाते. तर त्यांचे बालपण खूप आनंदात व मजेत गेले असेल.

ज्या वस्तूकडे बघितले ती वस्तू लगेच मिळाली असेल. त्यांचा उतार काळ हा कष्टाचा जातो. याला काही अपवादही असतात. पण ते क्वचितच. आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो. त्यांचे बालपण खूप कष्टात व दुःखात गेले असते. प्रत्येकाला कधी दुःख पचवावे लागते.

तुम्हाला नेहमी काही ना काही संकेत देत आहे. ज्याद्वारे आपल्याला आपल्या जीवनात येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळत राहतात. जर आपण लक्ष दिले तरी आयुष्यात त्यांना समजून घेऊन आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या घटनांविषयी जाणून घेऊ शकतो.

या संकेतांमुळे आपल्याला समजते. यापूर्वी जे काही वाईट झाले किंवा होते आहे. याचा आता अंत होणार आहे. दुःखाचा आता नाश होणार आहे. एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट पटकन आपल्यासमोर येऊन निघून जाते आपले त्याकडे फार लक्षही नसते. पण बऱ्याचदा या वस्तू जवळ दिसल्यामुळे येत्या काही काळात काही तरी चांगले घडणार असते.

त्याचे ते संकेत असतात. आता मानन्यातला भाग असला तरी पूर्वजांनी ते लिहून ठेवले. त्यानुसार काही वस्तू काही गोष्टी दिसल्या तर त्या शुभ माणल्या जातात.रस्त्यात पांढरी गाय दिसणे खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्मात गाईला आईचा दर्जा दिलेला आहे. गाय आर्थिक सुदृढ करण्याचे प्रतीक आहे. त्यामुळे कोठेही पांढरी गाय दिसली.

तर ते साक्षात देवी लक्ष्मीचे दर्शन झाल्यासारखे समजले जाते. सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळाचे दर्शन झाले. तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे. असे याचे संकेत असतात. कारण नारळाला भारतीय धर्मात शुभ मानले जाते.

प्रवास करतानाही काही शुभ संकेत असतात. पण ते आपल्या लक्षात येत नाही. आणि उजव्या बाजूने माकड कुत्रा किंवा साप दिसला तर तो आर्थिक फायदा होण्याचा संकेत मानला जातो. सोनेरी साप दिसनेही चांगले असते. रात्री झोपताना पांढरा किंवा सोनेरी साप दिसला तर ते खूप शुभ मानले जाते.

काही जणांना याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. हिरवा निसर्ग डोळे भरून पाहायला आवडतो. पण हा निसर्ग जर स्वप्नात दिसला म्हणजे स्वप्नात एखादे नैसर्गिक चित्र असले. तरीही ते शुभ मानले जाते. त्यातूनच हा हिरवा निसर्ग जर पाण्याजवळ दिसला तर खूपच शुभ मानले जाते.

घटनांचा आणि मनुष्याचा आपसात फार जवळचा संबंध असतो. हे वेळेनुसार व्यक्तीसोबत घडत असतात. यापैकी अनेक घटना जीवनामध्ये चुकून घडून येतात. तर अनेक घटना समस्यांची चाहूल करून देतात. आपण बहुतेक वेळा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना सामान्यपणे घेतो.

त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. यापैकी अनेक घटना आपल्याला भविष्यात घडणार्‍या घटना गोष्टींचा संकेत देत असतात. या घटना आपल्यासमोर कोणत्याही रूपाने समोर येऊ शकतात. पण वेळीच त्यांना ओळखणे महत्त्वाचे आहे. या घटना आपल्यासाठी कधी शुभ असतात.

तर कधी अशुभ असतात. या घटना आपल्या जीवनाला प्रभावित करतात. चिमणीचे आपल्या घरात घरटे बनवणे. चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे बनवणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधून तेथे आपली पिल्ले जन्माला घालते.

तर हे घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे. या संकेता नंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरवात होते. आणि घरापासून संकटे दूर राहतात.
चिमणीने आपल्या घरामध्ये घरटे करणे याचा चांगला संकेत मानला जातो. सकाळच्या वेळी मांजरीची पिल्ले दिसणे.

सकाळी उठल्यावर जर आपल्याला काही खुशखबर मिळाली. तर याचा आपला संपूर्ण दिवस आनंदात जातो. तर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर मांजरीची पिल्ले नजरेस पडली. तर हे त्याच्या आणि कुटुंबासाठी हा शुभसंकेत आहे. जर आपल्या सोबत असे घडले.

तर समजावे की आपला चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे. मुंग्यांचे समूहात दिसणे. मुंग्या एवढी मेहनत कदाचित कोणीही करीत नसेल. कारण त्यासोबत मुंग्या एकतेचे प्रतीक देखील मानले जातात. त्यांना अनेक वेळा समुहाने एका लाईन मध्ये चालताना आपण पाहिले असेल.

जर आपल्या घरामध्ये काळा मुंग्याचा समूह दिसला तर हे आपल्यासाठी शुभ काळाचे संकेत आहे. या संकेताचा अर्थ आपल्या आयुष्यात लवकरच खुशखबर येणार आहे. आणि यश मिळण्यास सोबत धनप्राप्ती देखील होणार आहे. खिशातून नाणे खाली पडणे.

कपडे घालताना खिशातून नाणे पडणे हा एक शुभ संकेत आहे. तुम्हाला भविष्यात यामुळे धन लाभाची संधी मिळू शकते. घरातील नारळ आपोआप तडकणे. घरात एखादा नारळ ठेवलेला असेल.

आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावे. की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे. यामुळे आता कोणतीही अडचण येणार नाही. घरामध्ये आपोआप तुळस उगवणे. तुमच्या घरातील बगेत तुळस उगवले तर हा एक शुभ संकेत समजावा.

घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी राहणार असल्याचे यामुळे समजते. आपोआप दुर्वा उगवणे. आपण श्रीगणेशांना अर्पण करतो त्या दुर्वा उगवल्यास समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत. घरामध्ये मध पडणे घरामध्ये मधाचे भांडे फरशीवर पडले.

तर घरातील सर्व अशुभ गोष्टी नष्ट होऊन घरात एक शुभ मंगल कार्य घडणार आहे. कधी कधी आपण सकाळी उठलो. की आपल्याला खूप फ्रेश व उत्साही वाटते. आपल्याला अचानक आनंदी असल्यासारखे वाटते. किंवा आरशात आपले तोंड पाहिल्यास चेहऱ्यावर एक वेगळीच चमक एक प्रकारची लाली पसरलेली दिसते.

हे या गोष्टीचे संकेत आहेत. की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे. व तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात तुम्हाला सफलता प्राप्त होणार आहे. काही व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाही. परंतु पशुपक्षी ही कधीकाळी आपल्याला शुभ संकेत देऊन जातात. जर आपल्या घरात मांजरीने पिल्ले दिल्यास ती चांगल्या वेळीचे निशाणी आहे.

आणि जर एखाद्या माकडाने आंबा खाऊन त्याची कोई जर आपल्या घरात टाकले तर आपले चांगली वेळ सुरू होत आहे. असा याचा अर्थ होतो. आणि घरात धनधान्याची बरकत कधीही होते. जर सकाळी आपल्या घरातील व्यक्तीने आपल्याला जर पैसे दिले तर तो दिवस आपल्याला खूप चांगला जातो.

जर तुम्ही सकाळी सकाळी काही कामानिमित्त बाहेर पडलात. व एखादे लहान बालक तुम्हाला खळखळ हसताना दिसले. तर हे सुद्धा भगवंताने द्वारे चांगल्या कामाची सुरुवात होण्याकरिता इशारा आहे. जर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल.

किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल. तर असे समजा की आजचा दिवस आपलाच आहे. आजच्या कामाला आपण हात टाकू ते नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि आपल्याला सफलता मिळेल. हे आहेत चांगली वेळ येण्याचे संकेत.

जर तुमच्या बरोबर आहे असेच काही होत असेल तर तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. स्वता भगवंता इशारा देत आहेत की तुमचे आता चांगलेच होईल. वजन च्या मागे भगवंत आहे त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकतो.

मित्रांनो माहिती तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. मित्रांनो काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार पण नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *