मार्गशीर्ष महिना या उपायांनी मिळेल पैसा, धन, सुख, संपत्ती..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे. मार्गशीर्ष महिना हा श्री हरी विष्णूंनचा आवडता महिना. या महिन्यात घरोघरी सवाष्ण स्त्रिया प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीचे पूजन करतात आणि देवीला प्रसन्न करतात.

या महिन्यात श्रीहरी विष्णू ची आणि देवी लक्ष्मीचे पूजन केल्यास त्याचे फळ आपल्याला कितीतरी अधिक पटीने मिळते. देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचे पूजन करून त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या मस्तकावर असावा.

यासाठी प्रार्थना केली जाते चला तर आता जाणून घेऊया की मार्गशीर्ष महिन्यात कोण कोणते उपाय करून देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूची कृपा पण प्राप्त करू शकतो. श्रीराम भगवंत श्रीकृष्ण भगवंत श्री हरी विठ्ठल हे सर्व श्रीहरी विष्णूचे अवतार मानले जातात.

म्हणून या देवतांपैकी कोणत्याही देवतांचे पूजन केल्यास. श्रीहरी विष्णू भगवान त्यांनाच प्राप्त होते. म्हणून मार्गशीष महिन्यातील महालक्ष्मी चे गुरुवार पूजना बरोबरच कोणत्याही दिवशी राम रक्षा स्तोत्र विष्णुसहस्त्रनाम भगवतगीता किंवा भागवत ग्रंथ यांचे पठण खूप फलदायी मानले जाते.

यामुळे श्रीहरी विष्णू भगवान तर लवकर प्रसन्न होऊन आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात. या महिन्यात महिनाभर तरी श्रीहरी विष्णूंना आवडता मंत्र ओम नमो वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे.

किंवा राम नामाचा अखंड जप करावा. नामस्मरण केल्याने भगवंतांची कृपा आपल्यावर होते. भगवंतांची सकारात्मक ऊर्जा आपल्याबरोबर आणि आपल्या कुटुंबावर कायम राहते. या महिन्यात देवी लक्ष्मीचे पूजन चंपाषष्ठी दत्त जयंती गीता जयंती हे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

या महिन्यात आपल्यातली सात्विकता वाढवण्यासाठी देवांचे पूजन तर करावेच. परंतु इतरांची निंदानालस्ती करणे इतरांचा द्वेष करणे खोटे वागणे राग राग करणे चिडचिड करणे या गोष्टी टाळाव्यात. धर्मशास्त्रात दिल आहे की या महिन्यात धर्माप्रमाणे आचरण करून आपल्या इष्ट देवाची आराधना करावी. वेगवेगळ्या तीर्थस्थानावर जाऊन भगवंतांचे दर्शन घ्यावे.

तीर्थयात्रा कराव्यात शक्य असेल तर एखाद्या तीर्थस्थळावर काही दिवस मुक्काम करून एखाद्या भगवत ग्रंथाचे वाचन करावे. जास्तीत जास्त मौन राहण्याचा प्रयत्न करावा. यामुळे आत्मचिंतन होते. त्याबरोबरच मनाचे सामर्थ्य वाढते. मानसिक शांती मिळते.

मनातील वाईट विचार निघून जातात. व आपल्या हातून वाईट कर्म ही नाही म्हणजेच ह्या महिन्यात आपले मन स्वच्छ करण्यासाठी जास्तीत जास्त भगवंतांचे नामस्मरण करा भगवंतांचे पूजन करावे ग्रंथांचे वाचन करावे यामुळे आपल्या सुख समाधान सुख आणि प्राप्त होईल. आणि आपल्या मनातील विकार ही नष्ट होतील.

या महिन्यात आपल्याला म्हणजे जे काही चांगले कार्य करणे शक्य आहे तेथे करा. आपल्यापेक्षा गरीब आणि गरजू व्यक्तींना शक्य होईल ते मदत करा मदत फक्त पैशांची असते असं नाही. एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला अन्न द्या एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडून द्या.

प्राणीमात्रांवर दया करा. गाईला चारा द्या. पक्ष्यांना दाणे द्या. कुत्र्याला पोळी द्या. एखाद्याला भगवंताची कथा ऐकवा हे ही एक प्रकारे भगवंतांची प्रति प्रेम चांगले कार्य आहे. प्रत्येकामध्ये भगवंत आहे असे माना. कारण प्रत्येकाच्या हृदयात भगवंत निवास करतात.

माणुसकीचा धर्म विसरू नका. असा आहे आपल्या मार्गशीर्ष महिन्याचे महत्व. तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *