४ नोव्हेंबर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी स्वस्तिक पुजा अवश्य करा. सुखी संसारासाठी अवश्य करा हे पूजन.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, म्हणजेच दिवाळीचा खास दिवस ४ नोव्हेंबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी पूजन करतांना स्वस्तिक पूजन सुद्धा केले जाते. सुख-समृद्धीसाठी, बिजनेस चांगला चालावा, धंदा चांगला चालावा, नोकरीमध्ये प्रगती व्हावी, घरात धनधान्याची कमी व्हायला नको. म्हणून लक्ष्मी पूजनासोबत सोबत स्वस्तिक पूजन सुद्धा केले जाते.

आता स्वस्तिक पूजन का करावे तर मित्रांनो स्वस्तिक हे सुखाचे, समृद्धीचे आणि शांतीचे प्रतिक आहे. म्हणून आपण घराच्या बाहेर किंवा घराच्या आत किंवा देवघरात स्वस्तिक काढत असतो व स्वस्तिक काढल्याने घरात शांतता येते. नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि व्यापारा ठिकाणी स्वस्तिक काढले तर तिथे प्रगती होते.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असच स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही पाटावर कुंकवाने स्वस्तिक काढू शकतात किंवा देव घरातच जमिनीवर सुद्धा स्वस्तिक काढू शकता किंवा सफेद कापड घेऊन त्यावर लाल कुंकवाने त्यावर काढू शकतात.

म्हणजेच कुंकवामध्ये थोडे पाणी टाकायचे त्याला ओल करायच आणि त्याने स्वस्तिक काढायच. स्वस्तिक काढून झाल्यावर त्यावर लाल कुंकू आणि हळद, फुले, अक्षता वाहून त्याची पूजा करावी. नंतर दिवा लावावा, अगरबत्ती ओवळावी. अशा रीतीने लक्ष्मी पुजना सोबत तुम्ही स्वस्तीक पूजन करू शकतात.

स्वस्तिक काढल्यावर त्या स्वस्तिकावर तुम्ही दाग-दागिने ठेवावे, पैसे ठेवावे. अन्य जेही तुम्ही लक्ष्मी पूजनाची पूजा करताना ठेवत असाल ते सगळ ठेवाव आणि त्याची पूजा करावी. कापडावर जर तुम्ही स्वस्तिक काढले असतील तर ते कापड तुमचे दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात ठेवावे.

घराच्या तिजोरीत तुम्ही ते ठेवू शकतात. तर मित्रांनो अशा पद्धतीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्वस्तीक पूजन अवश्य करावे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे विचारा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *