४ नोव्हेंबर गुरुवार लक्षमी पूजन, लक्ष्मी ला दाखवा हा नैवेद्य लक्ष्मी प्रसन्न होईल, भरपूर पैसा मिळेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

४ नोव्हेंबर गुरुवार च्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेला दाखवा हा नैवैद्य लक्ष्मी प्रसन्न होईल. भरपूर सुख समृद्धी, भरपूर पैसा घरात येईल. कारण माता प्रसन्न झाली तर मग कोणत्या गोष्टीची कमी आपल्या घरात राहत नाही.

म्हणून मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भरपूर उपाय करा. मंत्र जप करावा मातेची उपासना करा. त्यानंतर मातेला नैवैद्य दाखवा. नैवेद्य खास असतो, विशेष असतो. कारण लक्ष्मी पूजनाची मान्यता लक्ष्मीशी आहे. लक्ष्मीचे पूजन करायचे रात्रभर जागरण करायचे. खास करून १२ वाजेपर्यंत.

त्यानंतर घरात रोषणाई करायची आणि त्यासोबतच लक्ष्मीला एक विशेष नैवेद्य दाखवायचा. हा विशेष नैवैद्य बरेच लोक करतात. बऱ्याच लोकांना माहीत नसत की, लक्ष्मी मातेला खीरअत्यंत प्रिय आहे. मग ती तांदळाची असेल, शाबुदाण्याची असेल कसलीही असेल. पण खीर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अवश्य करा आणि तीच खीर तुम्ही लक्ष्मी मातेला नैवेद्य म्हणून दाखवा.

तुम्ही इतर स्वयंपाक करा, जेवण कराल त्यासोबत खीर अवश्य दाखवा. आता बरेच लोक विचारतील की खीर करणे जर जमत नसेल तर काय कराव. तर मित्रांनो अशा वेळेस तुम्ही दूध घ्या एका वाटीत. त्यामध्ये चिमूटभर साखर टाका, एकत्रित करा आणि दूध, साखर आणि भाजी चपाती जी केली असेल त्या ती मातेला दाखवा.

कारण मातेला सफेद रंगाचे पदार्थ खूप आवडतात. मग ती सफेद रंगाची मिठाई असेल किंवा मग ती सफेद रंगाची खीर असेल तर मित्रानो प्रयत्न करा. या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही खीर करा.

तो खिरेचा नैवेद्य लक्ष्मी मातेला तुम्ही दाखवाल. लक्षमी माता अत्यंत प्रसन्न होईल.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *