धनत्रयोदशीच्या दिवशी या ५ वस्तू खरेदी करण शुभ मानल जात. ज्योतिष शास्त्रानुसार धनलाभ होऊ शकतो.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो धनत्रयोदशीच्या दिवशी या पाच वस्तू खरेदी करण शुभ मानल जात. ज्योतिष शास्त्रानुसार त्या वस्तू खरेदी केल्याने आपल्याला धनलाभ होऊ शकतो. लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते. घरात सुख समृद्धी नांदू शकते.

मित्रांनो धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी ही दोन नोव्हेंबर मंगळवार या दिवशी आहे. आपण त्या दिवशी किंवा धनत्रयोदशी येण्याआधीच खरेदी करत असतो. तर आपण कोणतीही खरेदी करत असू किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी जर खरेदी करत असेल तर त्यामध्ये या पाच वस्तू नक्की घ्याव्यात. या पाच वस्तू शुभ मानल्या जातात.

आणि जर तुमच्या घरातल्या वस्तू आधीपासूनच असतील. तरी तुम्ही त्या वस्तू घ्यायच्या आहेत. त्यातली पहिली वस्तू आहे ती आहे कुंकू धनत्रयोदशीच्या दिवशी कुंकू नक्की खरेदी कराव. कुंकू खरेदी केल्यानंतर ते देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा. आणि नंतर ते स्वतःला लावा.

अस मानल जात की धनत्रयोदशीच्या दिवशी कुंकू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. आणि घरात कधीही पैशाची आणि अन्नाची कमतरता भासत नाही. आणि तुमच्या घरात आधीपासूनच कुंकू असेल तरी पाच दहा रुपयाचा कुंकू घ्या.

तो थोडासा लक्ष्मीचा चरणांकडे ठेवा. नंतर विवाहित स्त्रीने पूजा झाल्यानंतर तो आपल्या कपाळी किंवा सिंदूर म्हणून लावा. यानंतरची दुसरी वस्तू आहे ती आहे आई लक्ष्मीच्या पावलांचे ठसे. धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावणे खूप शुभ मानले जातात.

यामुळे लक्ष्मी खूप प्रसन्न होते. पण लक्षात ठेवा की लक्ष्मीच्या पाऊलखुणा ठेवण्यापूर्वी त्याची आरती करा. तसेच त्या पाउल खुणांची पूजा करा. आई लक्ष्मीला घरात वास करण्याची प्रार्थना सुद्धा करा.

मित्रांनो यानंतरची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे दीप म्हणजेच दिवे दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशी दिवे लावले जातात. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी दिवे खरेदी करण्याची परंपरा आहे. रात्री झोपण्यापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावल्याने अकाली मृत्यू पासून मुक्ती सुद्धा मिळते.

म्हणून तुम्ही जर दिवे खरेदी करणार असाल तर खास करून धनत्रयोदशीच्या दिवशी ते खरेदी करा. चौथी वस्तू आहे धने धनत्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण धने खरेदी करा. म्हणजे अखंडित कुठूनही खंडीत तुटलेले फुटलेले खरेदी करू नका.

देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर देवी लक्ष्मी भगवान धन्वंतरी समोर तुपाचा दिवा लावून आरती करावी. नंतर हे धन्य प्रसादाच्या रूपात सर्व लोकांमध्ये वाटून घ्यावे. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते.

मित्रांनो ते पूजेतील धने तुम्ही तिजोरी किंवा तुमच्या परत पाकीटा मध्ये सुद्धा ठेवू शकतात. मित्रांनो यानंतरची पाचवी वस्तू आहे ती म्हणजे बत्तासे. धनत्रयोदशीच्या दिवशी बत्तासे खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.

त्यानंतर ही बतासे देवी लक्ष्मीला अर्पण करा. हा उपाय केल्याने घरात कोणतीही आर्थिक समस्या होत नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी हे उपाय केल्याने आई लक्ष्मी प्रसन्न होते. आणि कुटुंबाला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.

मित्रांनो तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी कुंकू लक्ष्मीच्या पावलांचे ठसे दिवे, धने, आणि बत्तासे नक्की खरेदी करा. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *