१ नोव्हेंबर सोमवार वसुबारस महिलांनी आपल्या मुलांसाठी करावा या दिवशी उपवास. मुलांवर कोणतेही संकट येणार नाही.

Astrology

श्री स्वामी समर्थ.

१ नोव्हेंबर सोमवारच्या दिवशी वसुबारस आहे. वसुबारसच्या दिवशी महिलांनी आपल्या मुलांसाठी, आपल्या आपत्यासाठी या दिवशी करावा उपवास. या दिवशी करावे व्रत मुलांवर कोणते संकट येणार नाही. मुलांची प्रगती होईल, मुलांचे आरोग्य चांगले राहील.

महिलांनी आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत करावे. कारण १ तारखेला म्हणजे १ नोव्हेंबरला दिवाळी सुरू होत आहे. १ नोव्हेंबरपासून दिवाळी ची सुरुवात होईल. १ नोव्हेंबरला रमा एकादशी आहे. रमा एकादशी म्हणजे गोवत्स द्वादशी सुद्धा या दिवसाला म्हणतात.

वसुबारस फंदात गाय गोराची बारससुद्धा काही लोक या दिवसाला म्हणत असतात. वसुबारसचा दिवस हा आईसाठी असतो, आईच्या मुलांसाठी असतो. त्या नात्यासाठी असतो. म्हणून या दिवशी महिलांनी उपवास करावा.

ज्या महिलांचा एकादशीचा उपवास असेल त्यांनी तो उपवास वसुबारसचा उपवास केला तरी चालतो. एकादशीचा उपवास करत नसतील, तरी त्यांनी वसुबारसचा उपवास नक्की करायचा आहे. आपल्या मुलांसाठी करायचा खास करून महिलांनी आपल्या मुलांसाठी या दिवशी उपवास करावा.

सकाळी लवकर वसुबारसेच्या दिवशी उठायचे. आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी स्वामी महाराजांना नमस्कार करायचा. आपल्या उपवासाची सुरुवात करायची उपवासाच्या दिवशी तुम्ही कोणते मिठाचे पदार्थ खायचे नाही. तुम्ही फळ आहार करू शकता. तुम्ही जेवण फक्त संध्याकाळी करू शकतात.

त्या दिवशी तुम्ही मिठाचे पदार्थ खाऊ नका, फलहार करा किंवा तुम्ही चहा ज्यूस वगैरे पिऊ शकतात आणि संध्याकाळी तुम्ही जेवण करायचे आहे. स्वयंपाक करायचा आहे आणि
सगळ्यात आधी स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर गाईला नैवेद्य द्यायचा आणि मग आपण उपवास सोडायचा आहे.

कारण हा दिवस गाईचा दिवस असतो. मातेचा दिवस असतो. गाईला नैवेद्य देऊन बरेच लोक उपवास सोडतात. म्हणून तुम्ही सुद्धा गायीला नैवेद्य दाखवायचा आहे. बऱ्याच शहरांमध्ये गाय मिळत नसते गायला नैवैद्य देऊ शकत नाही.

त्यावेळेस तुम्ही नैवेद्य फक्त बाजूला काढुन ठेवायचा, देवाला दाखवायचा आणि तो नैवेद्य तुम्ही नंतर गाईला देऊ शकतात. तर अशा रीतीने महिलांनी आपल्या मुलांसाठी व्रत नक्की करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *