श्री स्वामी समर्थ म्हणतात स्वयंपाक घरात लिहा हा मंत्र पाच मिनिटात चमत्कार सर्व मनासारखं होईल..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या स्वयंपाक घराच्या भिंतीवर हा एक मंत्र हळदी कुंकूवाणे लिहा. घरामध्ये सुख शांती पैसा समृद्धी आरोग्य सर्वकाही नांदेल. मित्रांनो या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे. मित्रांनो आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे आपल्या घरातील स्वयंपाक घर आणि आपल्या घरातील देवघर

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत, की स्वयंपाक घरामध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. व कोणता मंत्र आहे. तो भिंतीवर लिहायचा आहे. जेणेकरून आपल्या घरातील कुटुंबातील सदस्य यांचे स्वास्थ्य आणि त्यांचे आरोग्य चांगले राहील. निरोगी राहील. तसेच त्यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध टिकून राहतील.

मित्रांनो पहिली गोष्ट आपल्या घरामध्ये जी भांडी आहेत. त्यांचा शक्यतो कमीत कमी आवाज होईल असा प्रयत्न करा. पण बऱ्याच आज घरामध्ये पाहतो की भांड्यांची अगदी आदळआपट चालू असते. मित्रांनो जितका भांड्याचा आवाज कमी होईल. जितका वेळ भांड्यांची कंपन कमी होतील. तितक्या जास्त तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश कमी होईल. व घरामध्ये सकारात्मक उर्जा वाढेल.

मित्रांनो भांड्याच्या आवाजातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे तुम्ही भांड्यांचा आवाज कमी करा. व मित्रांनो पुढची गोष्ट आपल्या घरामध्ये जी गृहिणी आहे तुम्ही स्वयंपाक करताना आपले तोंड हे पूर्व दिशेला केले पाहिजे. याची काळजी तूम्ही घ्यायला पाहिजे. थोडक्यात काय आपली जी शेगडी आहे अशाप्रकारे मांडून घ्या की आपलं तोंड हे पूर्वेकडे होईल.

जर तुमच्या घरात किचन कट्टा पूर्व दिशा सोडून दुसरीकडे असेल. तर आपण तिचं कट्ट्यावरून शेगडी जमिनीवर घ्या. व ती पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करा. मित्रांनो जर तुम्ही पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक केला. तर त्यामध्ये एक प्रकारची गोडी निर्माण होते. सूर्यनारायणाचे तेज त्या स्वयपाकामध्ये निर्माण होतं. असा स्वयंपाक करणाऱ्या व्यक्ती सुद्धा तेजवान होतात.

मित्रांनो शास्त्रामध्ये अस सांगितलं आहे की पूर्व दिशेला तोंड करून जो व्यक्ती जेवतो त्या व्यक्तीला बुद्धी आणि दीर्घायुष्य लाभो होते. म्हणजे अशी व्यक्ती बुद्धिमान बनते. तसंच तिचं आयुष्य सुद्धा वाढत. मित्रांनो अगदी पुराणांमध्ये याचा उल्लेख आपणास आढळतो. मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही जेवायला बसाल त्याच वेळेस जेवण करताना शक्यतो काहीही बोलू नका. मौन व्रत म्हणून धारण करा.

कारण जेवण करताना जो व्यक्ती मौन बाळगतो. त्याच्या सर्व इंद्रियांमध्ये प्रसन्नता आणि मन शांती लाभते. आणि जीवनाचा मुख्य उद्देश हाच असतो. आणि मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरामध्ये हा एक मंत्र भिंतीवर नक्की लिहा. मंत्र असा आहे ओम अन्नपूर्णा देवताय नमः मित्रांनो मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम अन्नपूर्णा देवताय नमः मित्रांनो हा मंत्र तुम्ही स्वयंपाक घरातील भिंतीवर नक्की लिहायचा आहे.

स्वयंपाक करताना घरात हा मंत्र तुम्ही जपत राहायचा आहे. मित्रांनो या मंत्राचा खूप मोठा महिमा आहे. ओम अन्नपूर्णा देवताय नमः या मंत्राचा लिखाण तुम्हाला हळदी-कुंकूवानी आपल्या स्वयंपाक घरातील भिंतीवर करायच आहे. अन्नपूर्णा देवीचा वरदहस्त या मंत्रामुळे आपल्यावर राहतो. जी गृहिणी असते तिच्या वरती अन्नपूर्णा देवीचा कृपादृष्टी सदैव राहते.

आणि यामुळे तुमच्या घरा मध्ये अचानक किती जरी पाहुणे आले तरी अन्नपूर्णा देवीच्या कृपेने घरामधील अन्न कधीही संपत नाही. ते अन्नच कधीही कमी पडत नाही. मित्रांनो पुढची गोष्ट आपल्या स्वयंपाक घरातील जी शेगडी आहे. किंवा जी चूल आहे. जो आपल्या घरातील स्वयंपाक घरातील पाण्याचा साठा आहे. जसे की माठ किंवा हंडा वाटर फिल्टर यामधील जे अंतर आहे.

जितकं जास्त ठेवता येईल तितके जास्त ठेवायचा आपण प्रयत्न करायचा आहे. कारण अग्नी आणि जल एकत्र येता कामा नये. जर आपल्या गॅसच्या शेगडी जवळ एखादा पाण्याने भरलेला हंडा असेल.

तर मित्रांनो यामुळे आपल्या कुटुंबामध्ये कलह निर्माण होतो. शक्यतो नवरा-बायकोमध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होतात. म्हणून आपण सुद्धा लक्षात ठेवा की कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा साठा अगदी जवळ ठेवू नका.

त्यामध्ये शक्य असेल तितका अंतर ठेवा. तर मित्रांनो अशा प्रकारची काळजी तुम्ही नक्की घ्या. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान, आरोग्य सर्वकाही नांदेल. ओम अन्नपूर्णा देवताय नमः तर मित्रांनो कशी वाटली माहिती हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा

आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद..

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *