अतिशय शुभ संयोग विजया दशमी पासून पुढील १० वर्ष अतिशय जोरात असेल या ५ राशींचे नशीब….

Astrology

नमस्कार मित्रांनो.

नशिबाचे खेळ फार निराळे असतात ते कधी राजाला रंक तर रंकाला राजा बनवू शकतात. जेव्हा ग्रह नक्षत्रांची अनुकुलता प्राप्त होते तेव्हा जीवनाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते.

जेव्हा ग्रहदशा शुभ आणि सकारात्मक पण ते तेव्हा सर्व काही चांगलं व्हायला सुरुवात होते. विजयादशमी पासून असाच काहीसा शुभ संयोग या पाच राशीच्या जीवनात येणार असून विजयादशमी पासून या राशीच्या लोकांची विजयाची सुरुवात होणार आहे. आता आपल्या जीवनातील अपयशाचे दिवस संपणार असून यशप्राप्ती च्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

कामात येणारे अपयश मानसिकता नाव व जीवनात असणारी समस्या आता समाप्त होणार आहे. करियर विषयी आपल्या मनात असलेली भीती दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासात वाढ होण्याचे संकेत आहे. मित्रांनो विजयादशमी म्हणजे दसरा हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

अश्विन महिन्यातील दशमी तिथीला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी हा सण साजरा होणार असून मान्यता आहे की, या दिवशी भगवान श्रीराम यांनी अहंकारी रावण याचा वध केला होता आणि असत्यावर सत्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

वाईट कर्माचे फळ हे नेहमी वाईटच असते असा याचा संदेश असतो. हा संदेश यातून प्राप्त होत असतो म्हणून व्यक्ती नेहमी चांगले कर्म केले पाहिजे. अश्विन शुक्ल पक्ष श्रावण नक्षत्र दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी विजयादशमी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे.

पंचांगानुसार या दिवशी चंद्र आणि गुरु अशी युती होत असून विजया दशमी पासून पुढे येणारा काळ या पाच राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे.

मेष राशी- विजया दशमी पासून मेष राशीच्या जीवनामध्ये विजयाचे दिवस येण्याची शक्यता आहे. इथून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ग्रह नक्षत्रांमध्ये होणारे बदल आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे.

हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार असून प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. नवीन व्यवसाय उभारण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त होणार असून धनलाभाच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत आता विजया दशमी पासून आपल्या जीवनात यश प्राप्ती ला सुरुवात होण्याचे दिवस आहेत. मागील काळामध्ये अडलेली कामे या काळामध्ये पूर्ण होतील नवीन सुरू केलेला व्यवसाय प्रगतीपथावर असणार आहे. व्यवहारिक सुख शांती ची प्राप्ती होणार असून आर्थिक चिंता समाप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील.

कन्या राशी- विजया दशमी पासून पुढे येणाऱ्या काळामध्ये कन्या राशीच्या जीवनामध्ये ग्रह नक्षत्रांची अनुकूलता बरसणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे सरकार दरबारी आणलेली कामे पूर्ण होणार असून राजकीय व्यक्तीचा पूर्ण संयोग आपल्याला प्राप्त होणार आहे.

या काळात आपल्याला धनलाभाचे योग जमून येणार असून व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये अडलेली कामे पूर्ण होणार आहे. कार्यक्षेत्रातून कमाईचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येणार आहेत.

तूळ राशी- तूळ राशीसाठी विजयादशमी पासून पुढे येणारा काळामध्ये आपल्यासाठी आनंदाचे दिवस येण्याचे संकेत आहेत. १७ ऑक्टोंबर रोजी आपल्या राशी मध्ये होणारे सूर्याचे आगमन आपले भाग्य चमकवणार आहे.

सूर्याच्या कृपेने या काळामध्ये आपल्या मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रातून धनलाभ होण्याचे संकेत आहेत. एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला आपल्या स्वतःमध्ये दिसून येणार आहे.

कुंभ राशी- विजया दशमी पासून पुढे येणाऱ्या काळामध्ये कुंभ राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. विशेष म्हणजे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होणार आहे.

उद्योग व्यवसायात सुरू केलेल्या योजना लाभदायक ठरणार आहे. व्यवसायात बदल करण्यासाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येतील.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *