श्री महालक्ष्मी घरात येण्याआधी आपल्याला देते हे संकेत कृपया या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

माता लक्ष्मी कोणाच्याही घरात प्रवेश करण्याआधी आपल्याला हे पास संकेत जरुर देते. जर तुमच्या बाबतीत असे घडत असेल तर समजून घ्या की माता लक्ष्मी लवकरच आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. मित्रांनो प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये चांगला व वाईट काळ येतच असतो. प्रत्येक सुखामागे एक दुःख व प्रत्येक दुःखा मागे एक सुख हे येत असतं. चांगला व वाईट कालावधी हा एक दुसऱ्यापासून विपरीत असतो.

मनुष्य वाईट परिस्थिती मधून चांगल्या परिस्थितीमध्ये जाण्यासाठी तेव्हाची नेहमी प्रार्थना करत असतो. तर यामध्ये फायदा त्याच व्यक्तीला होतो जो व्यक्ती नेहमी देव स्मरण करत असतो. मित्रांनो चांगला किंवा वाईट काळ येण्याआधी देव आपल्याला ही संकेत देतो. पण आपण मनुष्य आपल्या कामामध्ये इतके व्यस्त असतो की आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करतो.

मित्रांनो हिंदू शास्त्रामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवता मानली गेली आहे, माता लक्ष्मी खूप चंचल स्वभावाची असते. माता लक्ष्मी एका ठिकाणी जास्त वेळ राहत नाही. जर एखादा व्यक्ती खऱ्या मनाने व अंतकरणाने माता लक्ष्मीला पूजन असेल तर माता लक्ष्मी त्याच्यावर नक्की प्रसन्न होते व त्याला धन आणि सुख समृद्धी चा आशीर्वाद देते.

मित्रांनो जर तुम्हाला स्वप्नामध्ये झाडू दिसला किंवा झाडू मारत असताना भंगी दिसला. तर तुम्ही समजुन जा की तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. झाडू मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. मित्रांनो महालक्ष्मीचे वाहन घुबड आहे अशा मध्ये जर तुम्हाला तुमच्या जवळपास घुबड दिसले तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे व तुम्हाला माता लक्ष्मीची कृपादृष्टी लवकरच मिळणार आहे.

दर तुमच्यासोबत असे होत असेल तर माता लक्ष्मी चा जप करायला सुरुवात करा. असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज होईल व परत जाईल. जर तुमच्या घरातील एखादी वनस्पती सुखली असेल परंतु ती पुन्हा हिरवी होत असेल तर असे समजावे की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे.

जर अचानक तुम्हाला तुमच्या आजूबाजूला घुस दिसली तर असे समजावे की तुमचे दिवस बदलणार आहे. सकाळी उठल्या उठल्या जर तुम्हाला शंका चा आवाज ऐकायला आला तर लक्ष्मीचे आगमन हे संकेत मानले जातात. जर तुम्हाला स्वप्नांमध्ये कुंभार घडा बनवताना किंवा माठ बनवताना दिसला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता लवकरच प्रवेश करणार आहेत.

देवाण-घेवाण करताना पैसे तुमच्या हातातून पडले तर असे समजा की तुम्हाला धनलाभ होणार आहे. कुठेही जाताना तुम्हाला मुंगूस दिसला किंवा तुमच्या समोरून मुंगुसाने रस्ता ओलांडला तर हा माता लक्ष्मी येण्याचे संकेत आहे. मित्रांनो गुरुवारी जर कुवारी मुलगी पिवळ्या रंगाच्या वस्त्रांमध्ये दिसली तर हा शुभसंकेत मानला जातो.

जो व्यक्ती स्वप्नामध्ये मोती हार किंवा मुकुट बघतो त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होते. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये खूप मान्यता आहेत असे म्हणतात की मनुष्यावर जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर आणि स्वभावात बदल होतात.

अहंकार कमी होतो व परिवारात आणि पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते. भगवान विष्णू यांची अर्धांगिनी माता लक्ष्मी जेव्हा आपल्या घरामध्ये येणार असते. तेव्हा असे संकेत आपल्याला प्राप्त होतात. तर मित्रांनो तुम्हाला ही असे संकेत मिळत असतील तर तयार रहा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *