नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी मुठभर तांदूळ टाका इथे गरिबी निघून जाईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ७ ऑक्टोंबर ते १५ ऑक्टोंबर पर्यंत २०२१ या वर्षातील शारदीय नवरात्री शारदीय नवरात्र मध्ये कोणत्याही दिवशी हा एक तोटका नक्की करून बघा. मित्रांनो तुमच्या घरातील गरिबी निघून जाईल तुम्ही जितकी मेहनत करत आहात तितका पैसा तुमच्या घरांमध्ये येईल. यासाठी आपल्याला साधारणता पाव ते अर्धा किलो अक्षता म्हणजे तांदूळ आणायचे आहे.

तुम्हाला अखंड तांदुळ आणायचे आहे म्हणजे ते तांदूळ सुटलेले उठलेले नको. आणलेले तांदूळ तुम्हाला कुंकुवाच्या सहाय्याने रंगवायचे आहे त्याला रंग द्यायचा आहे. आणि त्यानंतर ते तांदूळ सावली मध्ये किंवा उन्हामध्ये सुकवायचे आहे. तर मित्रांनो आपण या लाल रंगाचे तांदूळ याचाच उपाय करणार आहोत.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्या घरातील उत्तर दिशेला असणाऱ्या भिंतीची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला सुंदर आसन घ्यायचे आहे ते आसन टाकायचे आहे व त्यावर बसायचे आहे. आपण उत्तरेकडे तोंड करून बसा. त्यानंतर कुंकवाने जमिनीवरती एक स्वस्तिक आपल्याला काढायचा आहे.

स्वस्तिका च्या दोन्ही बाजूला उभ्या रेषा घ्यायला विसरू नका. त्या उभ्या रेषांवर आपण जो लाल रंगाचे अक्षद रंगवलेले आहे त्या अक्षताचा ढीग करायचा आहे. त्यानंतर त्या तांदळाच्या ढिगावर एक श्री यंत्र आपल्याला ठेवायचे आहे. हे श्रीयंत्र आपल्याला कोणत्याही मंदिरात किंवा आपल्याला पूजेच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल.

मित्रांनो हे श्रीयंत्र तांब्याचे किंवा पितळाचे असावे. बरेच जण आपल्याकडे श्रीयंत्र नाही म्हणून हा उपाय करणार नाही परंतु मित्रांनो तुम्हाला एक सांगतो जर आपल्याला काहीतरी प्राप्त करायचे असेल तर आपण काहीतरी केले पाहिजे. थोडीशी आजूबाजूला चौकशी करा श्रीयंत्र आपल्याला अवश्य मिळेल.

तर मित्रांनो हे श्रीयंत्र आपल्याला तांदळाच्या ढिगावर ठेवायचे आहे आणि नऊ दिवस नऊ दिवे लावायचे आहे. तुम्हाला पूर्ण नऊ दिवस हा उपाय करणे जमत नसेल तर मित्रांनो तुम्हाला हा उपाय जेव्हापासून माहित पडलेला आहे तेव्हापासून तुम्ही हे करू शकता. मित्रांनो हे दिवे शक्यतो पिठाचे किंवा कणकीचे असायला पाहिजे आणि मातीचे दिवे असले तरी काहीही हरकत नाही.

त्या दिव्यांमध्ये आपण जे तेल वापरायचे आहे ते तेल तिळाचे शेंगदाण्याचे किंवा तूप असावे या तिघांपैकी कोणतीही एक गोष्ट त्यामध्ये असावी. तर मित्रांनो तुम्ही जे दिवे लावणार आहेत ते दिवे तुम्हाला त्या तांदळाच्या ढिगाच्या बाजूला प्रज्वलित करायचे आहे.

त्याच ठिकाणी बसून जय मातादी या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. किंवा तुम्ही दुर्गा चालीसेचा पाठ पाच वेळा केला तरीही चालेल. त्यानंतर आपण मातेची कपूरने आरती ओवाळायची आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाच ते दहा मिनिट बघायचे आहे व देवीचे नामस्मरण करायचे आहे.

मग सर्वात शेवटी आपली इच्छा मनोकामना आहे ते बोलून दाखवायची आहे. नाहीतर मग मान खाली करून आपली इच्छा देवीला सांगा. त्यानंतर ते श्रीयंत्र नवरात्री होईपर्यंत तेथेच राहुद्या व नवरात्रीनंतर ते यंत्र आपल्या देवघरात स्थापन करा. जे तांदूळ होते ते दुसऱ्या दिवशी झाडाखाली तुम्ही पक्ष्यांना खायला टाकू शकतात.

कणकेचे दिवे तुम्ही गाईला किंवा पशुपक्ष्यांना खायला घातले तरी चालेल. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरातील गरिबी निघून जाईल व तुमच्या घरामध्ये ऐश्वर्य येईल.

टिप- तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहितीसाठी तुम्ही पंडित किंवा ज्योतिषी यांना भेटू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *