नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये या ५ राशीच्या जीवनामध्ये या घटना होणार म्हणजे होणार…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

गुरुवार ७ ऑक्टोबर २०२१ पासून शारदीय नवरात्रीला पारंभ होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. काही लोक याला कलश स्थापना असे म्हणतात. ही स्तिथी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी सुरू होत आहे. आणि ७ ऑक्टोबर रोजी १ वाजून ४७ मिनिटांपर्यंत आहे.

शारदीय नवरात्र २०२१ कलश स्थापना किंवा घटस्थापना याचा शुभ मुहूर्त म्हणजे तुम्ही ७ ऑक्टोंबर रोजी सूर्योदय झाल्यानंतर ३ ते ४ तासांमध्ये तुमच्या शहरांमध्ये घटस्थापना करू शकता. ठीक घटस्थापना दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी ६:१७ पासून ते १०:१७ पर्यंत करता येईल.

जर तुम्हाला या वेळामध्ये घटस्थापना करणे शक्य नसेल तर अभिजीत मुहुर्तावर तुम्ही सकाळी ११:५२ ते १२:३७ मिनिटापर्यंत ही घटस्थापना करू शकतात. तर मित्रांनो चला आता आपण जाणून घेऊयात या ५ राशीन बद्दल त्यांच्यासाठी ही नवरात्र खूप खास ठरणार आहे.

वृषभ राशी- तुमचा प्रियकर किंवा तुमचा प्रिय व्यक्ती दिवसभर तुमच्या आठवण काढणार आहे. तुम्ही काहीतरी सरप्राईज आखा हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असणार आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात खरे प्रेम मिळाले की तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची उणीव राहणार नाही तुम्हाला या सत्याचा उलगडा आज होईल.

दिवसाच्या समाप्तीला तुम्हाला आपल्या घरातील सदस्यांना वेळ देण्याची इच्छा होईल. परंतु दिवसाच्या शेवटी तुमचा आपल्या घरातील कोणत्यातरी सदस्य सोबत वाद-विवाद होऊ शकतो. आणि तुमचा मूड देखील खराब होऊ शकतो. देवा तुमच्या जोडीदारासोबत तुमचं भावनिक नातं घट्ट होतो तेव्हा तुमचा शृंगार खुलून येतो.

मिथुन राशी- शारीरिक दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने नक्की करा. तुम्हाला अफलातुन नवीन संकल्पना सुचतील त्यामुळे तुमचा आर्थिक फायदा संभवतो. काही लोक तुमच्यासमोर गंभीर परिस्थिती निर्माण करतील परंतु तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. प्रेमामध्ये एकतर्फी वेळ दिल्याने तो व्यर्थ ठरेल.

महत्त्वाच्या व्यक्तीची चर्चा करताना तुम्हाला एक महत्त्वाची टीप मिळून जाईल. वेळ चुकीच्या कामांमध्ये खर्च होऊ शकतो. तुमचा जोडीदार किंवा तुमची प्रियसी तुमच्या महत्त्वाच्या गरजा भागवणे थांबवेल. त्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.

कन्या राशी- आजुबाजुला बघा वातावरण गुलाबी आहे. कामाच्या ठिकाणचे आणि आजूबाजूचा तनाव तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल. या राशीतील व्यक्ती खूप मनोरंजक स्वभावाचे असतात हे हे खूप साऱ्या लोकांमध्ये आनंदी

राहतात त्यांना एकटा वेळ घालवणे शक्य नाही. तरीही काळ आणि वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकता. आयुष्यातील अनेक चढ-उतारांसोबत हा दिवस तुमच्या आयुष्यातील सुवर्ण दिन होणार आहे.

तूळ राशी- मानसिक भीतीने तुम्ही घाबरून जाल पण तुम्ही सकारात्मक बाजू लक्षात घेतली तर तुम्ही तुमचा ताणतणाव दूर करू शकतात. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोईस्कर ठरतील. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत पार्टीसाठी जा.

कुंभ राशी- ठराविक कालांतराने येणारा शारीरिक आणि मानसिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. तुमची शारीरिक प्रक्रिया योग्य व सुरळीतपणे चालण्यासाठी तुमच्या संपूर्ण शरीराला विश्रांतीची गरज आहे. गुंतवणूक करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल कारण तुम्ही केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला आर्थिक नफा होऊ शकतो. जे लोक तुमच्यावर प्रेम करतात आणि ज्या लोकांना तुमची काळजी आहे त्या लोकांसोबत व्यवस्थितपणे वागा.

टिप- तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहितीसाठी तुम्ही पंडित किंवा ज्योतिषी यांना भेटू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *