नमस्कार मित्रांनो.
नवरात्रीमध्ये रोज नऊ दिवस देवीला दाखवा हा सोपा नैवैद्य माता प्रसन्न होईल. तुमचे घर सुख-समृद्धीने भरेल, तुमच्यावर कृपा करेल आणि तुम्हाला जे हव ते माता तुम्हाला देईल. नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत शुभ असतात. अशी मान्यता आहे की माता प्रत्येकाच्या घरोघरी येते.
नवरात्री मध्ये माता या पृथ्वीचे भ्रमण करते आणि ज्या घरामध्ये शांतता असते. ज्या घरामध्ये शांतता असते, सुख असते त्या घरामध्ये माता नक्की येते आणि ज्या घरामध्ये वाद-विवाद कटकटी असतात. कोणीही सुखी नसते तिथे माता आता कधीच येत नाही.
म्हणून आपल्या घरामध्ये कटकटी नको, वाद विवाद नको. स्वच्छता हवी, शांतता हवी याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. आता माता आपल्या घरोघरी विराजमान झालेली आहे. मग ते घट असू द्या किंवा अखंड दिवा असू द्या. जर तुमच्या घरात अखंड दिवा लागलेला आहे किंवा घटाची स्थापना केलेली आहे. तरी तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे
गटाची स्थापना झालेली नसेल, अखंड दिवा सुद्धा लावला नसेल तरी तुम्ही तुमच्या देवघरात नैवेद्य ठेवायचा आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या देव घरामध्ये लक्ष्मी माता असते, कुलदेवी असते, सरस्वती असते, दुर्गा असते. तर मित्रांनो आपण त्याच देवीला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नैवेद्य दाखवायचा आहे.
आता हा नैवेद्य कोणता आहे. तर मित्रांनो तुम्हाला रोज सकाळी फक्त सकाळी हा नैवैद्य दाखवायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला जे दाखवायचे पोळी-भाजी जे तुम्ही स्वयंपाक करत असाल ते तुम्ही दाखवू शकतात. पण रोज सकाळी जेव्हाही तुम्ही सकाळी उठून देवपूजा करतात. ७ ७:३० वाजेच्या दरम्यान किंवा लवकर किंवा उशिरा तुमचा जोही वेळ असेल.
त्या वेळेला तुम्ही सगळ्यात अगोदर अंघोळ करुन तुमच्या देवघरात जायचे आहे. देवांची पूजा करायची आहे, आरती करायची आहे. दिवा, अगरबत्ती लावून आणि त्यानंतर हा नैवेद्य दाखवायचा आहे. जर घट असेल किंवा अखंड दिवा असेल त्याच्या समोर हा नैवेद्य ठेवायचा आहे.
नैवैद्य आहे – दूध, साखरेचा मित्रांनो तुम्हाला एका वाटीत दूध घ्यायचे आहे. त्यामध्ये चिमूटभर साखर टाकायची आहे.
एकत्रित करून त्यामध्ये तुळशीचे एक पान टाकायचे आहे आणि तो नैवैद्य मातेसमोर ठेवायचा आहे. सोबत एक पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे. अशा रीतीने तुम्ही तो नैवेद्य मातेला रोज नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये रोज सकाळी दाखवायचा आहे.
कारण मातेला सफेद रंग अत्यंत प्रिय आहे आणि आपण रोज खिर करू शकत नाही, रोज मिठाई आणू शकत नाही. म्हणून दूध साखरेचा अत्यंत सोपा नैवेद्य असतो. जो मातेला अत्यंत प्रिय आहे म्हणून मित्रांनो तुम्हीही नवरात्रीत देवीला दध साखरेचा नैवेद्य दाखवावा.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद