नवरात्रीत घरी आणा यापैकी एक वस्तू.. पैसाच पैसा येईल. गरिबी दूर होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

७ ऑक्टोबर रोजी देवी आईचे आगमन होणार आहे. असे म्हणतात की, देवीचे आगमन होण्याच्या दिवशी ही एक वस्तू जर आपण घरी आणली तर आपल्या घरी साक्षात देवी लक्ष्मीचे आगमन होते. मित्रांनो ही अशी वस्तू आहे जी वस्तू प्रत्येकजण नवरात्रीत नक्कीच घरी आणतो.

कारण ही वस्तू आणल्याने देवी आई आपल्यावर खूप खुश होते. व्रत आणि उपासना करणाऱ्या व्यक्तींनी तर ही वस्तू आपल्या घरी अवश्य आणावी आणि जी व्यक्ती नवरात्रीत ९ दिवसांचे व्रत करत नसतील त्यांनी सुद्धा ही वस्तू घरी आणली तर त्यांना ९ दिवसांच्या व्रताचे फळ प्राप्त होते.

आपल्या हिंदुधर्मात नवरात्रीचे खूप महत्व आहे आणि याच उल्लेख शास्त्रात सुद्धा येतो. अशी मान्यता आहे की नवरात्रीच्या दिवसांत देवी जगदंबा अदृश्य रुपात पृथ्वीवर भ्रमन करते. तसेच आपल्या भक्तांच्या घरी जाऊन त्यांचे दुःख त्रास व अडचणी दूर करते. जे व्यक्ती नवरात्रीत ही एक वस्तू घरी आणतात त्या व्यक्तीच्या घरी देवी लक्ष्मी आकर्षित होते.

असे म्हणतात की, या वस्तूचा सुगंध देवी आईला आपल्याकडे आकर्षित करतो. तर मित्रांनो ती वस्तू आहे कमळाचे फुल. होय नवरात्रीत घरी कमळाचे फुल नक्की आणावे. आणि देवीसमोर एका पाण्याच्या भांड्यात त्या फुलांची दांडी टाकून ठेवावी.

नवरात्रीत देवघरात कमळाचे फुल ठेवल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कारण हा उत्सव सर्व देवी देवतांना समर्पित आहे म्हणून नवरात्रीमध्ये कमळाच्या फुलासोबत देवि आईचे पूजन केल्यास आपल्याला जास्त फळ प्राप्त होते. त्यासोबत आपण जर नवरात्रीमध्ये सौभाग्याचे अलंकार घरी आणले तर अशी महिला देवी आईच्या आशीर्वादाने सदा सौभाग्यवती राहते.

नवरात्रीत सौभाग्य अलंकार घरात स्थापन करणे म्हणजे घरात साक्षात सौभाग्य स्थापन करणे होय. अश्या घरामध्ये निरंतर प्रगती होत राहते. म्हणून नवरात्रीत सौभाग्य अलंकार घरात स्थापन करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नवरात्रीत सोन्याचे किंवा चांदीचे एक नाणे अवश्य ठेवावे.

विशेषतः असे नाणे ठेवावे ज्यावर देवी लक्ष्मी व गणपती बाप्पाची प्रतिमा आहे. अशी नाणे देवघरात ठेवणे खूप शुभ आहे. या नाण्यात देवी आई साक्षात नऊ दिवस वास्तव्य करते म्हणून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी हे नाणे आपल्या देवघरात ठेवावे व देवी आईचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा.

हिंदू धर्मात वडाच्या पानाला विशेष महत्व दिले गेले आहे. अशी मान्यता आहे की नवरात्रीच्या आधी वडाची पाने तोडून घरी आणावी त्यावर स्वस्तिक काढून ती पाने आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यावी. आणि त्या नऊ दिवस त्या पानांची ही पूजा करावी या उपायांमुळे देवी आईची कृपा आपल्यावर सदैव राहते.

यामुळे आपल्या घरातील धनधान्यात वृद्धी होते. देवी सरस्वतीचे वाहन मोर आहे म्हणून या दिवसात घरात मोरपंख आणणे खूप शुभ असते. असे मानले जाते की हे मोरपंख आपण घरातील ईशान्य भागात ठेवले तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा बनून राहते. आणि आपण हे मोरपंख जर देवघरात ठेवले तर आपल्याकडे विद्या आणि धनाची कमतरता कधीच राहत नाही.

तसेच मित्रांनो शास्त्रांमध्ये केळीच्या झाडाला अतिशय शुभ व पूजनीय मानले जाते नवरात्रीच्या दिवशी केळीचे झाड घरी आणावे व त्याला मातीमध्ये लावून ते आपल्या मागच्या धारांमध्ये ठेवावे. असे मानले जाते की रोज पूजन झाल्यानंतर या झाडाला पाणी अर्पण केल्यावर आपल्याला कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही.

देवी आईचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो. शंखपुष्पी म्हणजे गोकरणा गोकरणा चे झाड धार्मिक दृष्ट्या खूप शुभ मानले जाते. जर आपण नवरात्रीमध्ये शंखपुष्पी ची मुळे घरी आणले आणि शुभ मुहूर्तावर ती मुळे आपल्या एखाद्या डब्यात पॅक करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवली.

तर आपल्याला व आपल्या घरातील कोणत्याही सदस्याला कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. तर मित्रांनो आता तर तुम्हाला लक्षात आलेच असेल की नवरात्री काळामध्ये तुम्हाला कोणत्या वस्तू घरी आणायचे आहेत ते..

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *