नमस्कार मित्रांनो.
नवरात्रीचे नऊ दिवस हे अगदी महत्त्वाचे दिवस असतात हे नऊ दिवस माता दुर्गे चे दिवस मानले जातात. या दिवसात देवी आपल्या घरी येते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते व आपल्याला आशीर्वाद देऊन जाते. अशी मान्यता आहे तर मित्रांनो या वर्षी नवरात्री ७ ऑक्टोबर गुरुवार या रोजी सुरू होणार आहे आणि १५ ऑक्टोंबर रोजी समाप्त होणार आहे.
१५ ऑक्टोंबर रोजी दसरा आहे तर मित्रांनो तुम्ही सात ऑक्टोंबर पासून ते १५ ऑक्टोंबर पर्यंत रोज नऊ दिवस त्या गोष्टीचे वाचन करायचे आहे. मित्रांनो तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा या गोष्टीचे वाचन केले तरी चालेल आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमचा एकच वेळ ठरवून सकाळी किंवा संध्याकाळी वाचन करू शकतात.
मित्रांनो हा एक मंत्र आहे प्रार्थना आहे जी आपल्याला देवीला करायची आहे. तर मित्रांनो तुम्हाला ७ ऑक्टोंबर पासून रोज नऊ दिवस हा उपाय प्रार्थना करायची आहे. तुम्हाला आपल्या देवघरामध्ये बसायच आहे अखंड दिवा लावायचा आहे.
जर तुम्ही तुमच्या घरांमध्ये देवीची घटस्थापना केलेली असेल तर त्या देवी समोर बसून तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. त्यानंतर तुम्हाला हात जोडून व डोळे बंद करून फक्त एक वेळा या मंत्राचे वाचन करायचे आहे.
शरण्ये त्रंबके गौरी नारायणि नमोस्तूते
ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते.
अगदी सोपी आणि सुंदर अशी प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना सोपी असली तरी याचे परिणाम मात्र चमत्कारी आहेत. तर तुम्हाला फक्त दिवसातून एक वेळा या मंत्राचे वाचन करायचे आहे. हा मंत्र जर तुमच्याकडून पाठांतर होत नसेल तर तुम्ही हा मंत्र एका कागदावर लिहून घेऊ शकतात.
त्याचे वाचन सुद्धा देवघरासमोर बसून करू शकता. मित्रांनो असे केल्याने देवी माता तुमच्यावर प्रसन्न होईल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे तुम्हाला आशीर्वाद देणार. व तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करणार.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद