कुलदेवीच्या या ४ गोष्टी करा तुमचे कुटुंब सुखी समृद्ध होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या प्रत्येक घराची एक कुलदेवी असते. कुलदेवीच्या आराधना करणे व पूजा करणे अत्यन्त महत्वाचे असते. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला कुलदैवतेचा अशा चार गोष्टी सांगणार आहोत. त्या तुम्ही रोज केल्या तर तुमचे आयुष्य सुखी होईल व तुमच्या घरांमध्ये कसलीही कटकट व समस्या येणार नाहीत.

कोणत्याही गोष्टीची तुमच्या घरांमध्ये कमी राहणार नाही आणि जे तुम्हाला हवं असेल ते तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो आपल्या कुटुंबाची एक कुलदेवी असते त्या कुल देवीच्या चार गोष्टी केल्या तर तुम्हाला कसल्याही गोष्टीची कमी राहणार नाही. मित्रांनो खास करून आपल्या घरातील जी विवाहित महिला असते त्या स्त्रीने या गोष्टी केल्या तर याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होईल.

तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की, त्या कोणत्या चार गोष्टी आहेत. तर यातील पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या कुलदेवतेची मूर्ती होय मित्रांनो तुमची जी कुलदेवता असते. तिची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असायलाच हवी आणि त्या कुलदेवतेची पूजा रोज सकाळी संध्याकाळी झालीच पाहिजे. खास करून विवाहित महिलांनी व घरातील मुख्य महिलेने या मूर्तीचे स्थापना आपल्या देवघरामध्ये करावे व त्या मूर्तीची पूजा रोज करावी.

मित्रांनो यातील दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी कुलदेवता असेल त्या कुलदैवतेचा मंत्राचा एक माळ जप तुम्हाला ग्रुप करायचा आहे. मित्रांनो प्रत्येक कुलदैवतेचा एक स्वतंत्र मंत्र असतो किंवा त्या कुलदेवतेचे नावच त्यांचा मंत्र असतो तुम्हाला या मंत्राचा जप रोज एक माळ करायचा आहे. आणि जर तुम्हाला तुमची कुलदेवता कोण किंवा त्यांचा मंत्र माहिती नसेल तर तुम्ही फक्त ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे.

तिसरी गोष्ट म्हणजे ज्या दिवशी तुमच्या कुलदेवतेचा वार असतो. त्या दिवशी तुम्ही उपवास करावा खास करून घरातील मुख्य महिलेने किंवा विवाहित महिलेने उपवास करावा. दुसरे तुम्ही कोणतेही उपवास नाही केले आणि चतुर्थी एकादशी व कुलदैवतेचा वारी उपवास केला तर तुम्हाला हा लाभदायी ठरू शकतो.

तुम्हाला जर तुमच्या कुलदेवतेचा वार माहिती नसेल तर तुम्ही मंगळवारी उपवास किंवा मंत्रजप करू शकतात. कारण मंगळवार हा कुलदेवतेचा वार असतो. आणि मित्रांनो शेवटची गोष्ट म्हणजे प्रत्येक घरातील सदस्यांनी वर्षातून किमान एक वेळेस तरी आपल्या कुलदेवतेचे दर्शन करायला जावे व घरातील महिलेने किंवा मुख्य महिलेने कुलदेवतेची साडी देऊन ओटी भरावी.

मित्रांनो बरेच लोक हे करतात व बऱ्याच लोकांना हे माहीत नसते त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुलदेवतेची ओटी भरावी व प्रत्येक वर्षातून एक वेळेस दर्शन घेण्यासाठी जावे. तर मित्रांनो या चार गोष्टी कुलदेवतेचा नक्की करा तुमचे कुटुंब सुखी व समृद्ध होईल.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *