सुनेने व मुलाने वडिलांना घराबाहेर हाकलून दिले. वडील घाटावर बसून भीक मागू लागले पुढे काय घडले बघा….

Astrology

नमस्कार मित्रांनो.

नाशिकच्या जवळ असलेले गाव उपनगर. गाव तस ठीक ठाक होत. एका नामांकित कंपनीतुन वयोमानाने रिटायर्ड होऊन बाबा घरीच बसलेले होते. त्यामुळे सर्व भार सुनेवरच होता आधी किरकोळ वाद मग बाचाबाची मग त्यानंतर मोठे भांडण व्हायचे. सुनेच अस म्हणण होत की, घरी आयत बसून खाऊ नका थोडासा संसाराला हात भार लावा.

पण बाबा खूप थकलेले होते, त्यांनी घरी बसून सुनेच बोलण व टोमणे खाण्यापेक्षा घर सोडून जायचा निर्णय घेतला. मुलाने व सुनेने ही त्यांना जाताना अडवले नाही. त्यामुळे बाबा नाशिकला आले. बाबा म्हातारे असल्यामुळे कोणी काम देत नव्हत व त्यांना त्यांच्या पोटाची भूक जगुही देत नव्हती.

शेवटी बाबा सर्व लाज वैगरे सोडून त्यांच्या मुलाला फोन लावून विचारायचे येऊ कारे बाबा परत घरी राहायला. तेव्हा मुलगा म्हणायचा मला काहिही प्रॉब्लेम नाही पण इला विचारून सांगतो. पण बाबा तुम्ही परत घरी या असा निरोप मुलाकडून कधी आलाच नाही. बाबाने रिटायर्ड मेंट नंतर बांधलेलं घर म्हणजे बांगला व म्हातारपणाचा आधार होता.

आजी तर अचानकच गेली व तिला कोणतेही पेन्शन नव्हते. आता घरावर फक्त सुनेच आणि मुलाच राज्य होत. बाबा तर अट्टल भिखारी झालेले होते. असच एक वेळ माझ्या मित्राच्या आईच्या दहाव्याला गेलो असताना नाशिकला गंगा किनारी ते भिख मांगत असताना माझी आणि त्यांची भेट झाली. तेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांना ओळखले सुद्धा.

मी एक वेळा पंचायत समितीच्या निवडणुकीला उभे असताना याच बाबांनी मला आर्थिक मदत केली होती. व मी त्यावेळी निवडून सुध्दा आलो होतो. टाऊनशिप ला घरी बोलवून माझा सत्कार सुद्धा केल्याचे माझ्या लक्षात होते. मला अजूनही सर्वजण नेतेच म्हणतात. बाबाही नेतेच म्हणायचे.

ते म्हणायचे अहो नेते म्हातारपण म्हणजे नाजूक वेलच हो वेलेवरच्या नाजूक फुलांवर सर्वांचं लक्ष जात पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या वेलीकडे कोणाचेच लक्ष नसते. वेल बघा नेहमी कोणाचाच आधार नसल्याने ती झुकलेली व वाकलेली असते. तसच म्हातारपण असत नेहमी कोणाचा आधार नसलेले झुकलेले.

बाबाच हे वाक्य ऐकून अंगावर काटा यायचा. नाव व गाव टाकून पत्र पत्त्यावर पोहचत नाही. नेते त्यासाठी त्यावर तिकीट लागत. नाहीतर ते पत्र वर्षानुवर्षे पडुन राहते पोस्टातच. तसेच आमचे आयुष्य नाव गाव पत्ता सर्व बरोबर आहे पण देव आमच्यावर तिकीट लावायचे विसरला. म्हणून आम्ही इथे असे पडलेलो आहे. आणी अस बोलून ते हसू लागतात.

त्यांच ते हसू आपल्यालाच पिड पाडून जात. मग मी म्हणालो बाबा तुम्ही खोट हसत आहात तुमचे या हसण्यामागचे दुःख दिसत आहे. यावर बाबा म्हणाले मी आयुष्यभर खोट हसण्याच व आनंदी राहण्याच नाटक केले. पण आता म्हातारपणात खोट हसू कुठून उसन आणू? माझ आयुष्य सुखलेल्या पाला पाचोरा सारख झालय कोणीतरी येत आणि आम्हाला गोळा करत टोपलीत ठेवत अस वाटत.

चला कोणालातरी आपली दया आली पण नंतर समजत की, आपण सुखलेलो आहोत. म्हणून आपल्याला गोळा करून शेकोटी पेटवण्यासाठी टोपलीत ठेवल गेल आहे. सुखलेल्या पाल्याचा अजून काय वापर होणार म्हणा? बाबांचे असे बोलणे ऐकून मीच आतून तुटून जायचो. काहीतरी काम करून पैसे कमवा बाबा असे म्हणून मी त्यांना विनवायचो पण आता उमीद गेली होती.

बाबा म्हणाले आता गंगाच माझी आई आहे. इथे निवारा मिळतो जेवण मिळते व आता कमी आहे ती फक्त या मातीखाली जायची. आता जिवंत असताना कोणीच विचारत नाही परंतु उद्या मेल्यावर हेच लोक पाया पडायला येतील व इथेच माझ्या श्राद्धाचे जेवण करताना म्हणतील गेला पण चांगला होता हा माणूस.

नाटक असत हो हे आयुष्य सर्व आणि प्रत्येक जण इकडे आपापली भूमिका पार पाडत असत. शेवटी गंगेच्या किनारी एकेदिवशी मी बाबांना खूप समजावून काम करण्यासाठी तयार केल. माझ्या मित्राच्या दुकानात मी बॅटरी विकण्यासाठी बाबांना काम लावून दिल. आता बाबा दिवसाला ४०० ते ५०० रुपये कमवतात. भिख मांगत नाहीत ते. मागच्या महिन्यात अन्याय सहन करणाऱ्या बाबांना जागतिक क्रांतिकारी दिवसाच्या वेळी या बाबांना सत्कारही देण्यात आला.

आज हे आठवण्यामागचे कारण म्हणजे आज हेच बाबा बॅटरी विकत असताना एका रस्त्यावर भेटले व ते मला रोडाच्या बाजूला नेत म्हणाले एक गंमत सांगायची आहे. नेते माझ्या सुनेला समजल आहे की, मी आता महिन्याला १०००० ते १५००० कमवतोय म्हणून माझा मुलगा आला होता नाशिक मध्ये मला शोधत. व मला म्हणाला बाबा तुम्ही घरी चला तिने तुम्हाला घरी बोलावलय.

झाल गेल ते विसरून जा व ती पाया पडून माफी मागायला सुद्धा तयार आहे. बाबा मलाही तुमच्या धंद्यात घ्या एकत्र काम करून एकत्र कमवू. मी चकित झालो तीन वर्षे आपल्या स्वतःच्या सासऱ्याला व बापाला भिख मागायला लावली मात्र आता पैसे दिसताच सर्व नाती अचानक समोर येऊ लागली. नेते काय करू तुम्ही सल्ला घ्या.

मी म्हणालो ज्यांनी तुमच्यावर ही वाईट वेळ आली त्या लोकांना मान देण्याचा प्रश्नच नाही. त्यांना तुम्ही नाही पैसे पाहीजेय तुमचे आता त्यांना जवळ नका घेऊ. बाबा म्हणाले नेते जर आज मी माझ्या पोराला मदतीचा हात दिला नाही. तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसेल भिख मागताना हे चालेल तुम्हाला.

मी माझ्या माघारी त्याला भिखारी बनवून जाईल का. अहो चुकतात तीच पोर असतात आणि माफ करतो तोच बाप असतो. अहो त्याच्या लहानपणापासून त्याला प्रेम भक्ती दया माया म्हणजे काय हेच शिकवत आलोय. पण त्यातून तो किती शिकला हे माहीत नाही.

बहुतेक तो काहीच शिकला नाही नाहीतर माझ्यावर ही वेळ आलीच नसती. असुद्या पण आता आयुष्याच्या शेवटच्या वळणावर त्याला मला क्षमा म्हणजे काय हे तरी शिकवू द्या नेते. आता जर तो हे शिकला नाही तर कधीच शिकणार नाही व कोणालाच क्षमा करणार नाही.

मला त्याला हे शिकवू द्या नेते. असे म्हणत ते निघाले आणि मी तेथेच उभा राहिलो डोळ्यातील पाणी आवरण्याची कसरत करत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *