६ ऑक्टोंबर सर्वपित्री अमावास्या या दिवशी करा हे चमत्कारी उपाय.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या घरात जर भांडण होत असेल, वाद विवाद असेल, कटकटी असतील किंवा एकमेकांचे बनत नसेल, पती-पत्नी मध्ये बनत नसेल तर तुम्हीसुद्धा ६ ऑक्टोंबर सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी हा उपाय करू शकता. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व वाईट ऊर्जा व नकारात्मक गोष्टी निघून जातील.

तुम्हाला फक्त सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो सर्वपित्री अमावस्या म्हणजे सर्व पितरांचा हा दिवस असतो. यादिवशी पितरांना घास टाकला जातो. त्यांना अन्न अर्पण केले जाते आणि याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो सर्वपित्री अमावस्या ६ ऑक्टोंबर रोजी आहे.

तर ६ ऑक्टोंबर रोजी तुम्ही जेव्हा देवपूजा करतात ६ किंवा ७ वाजता तेव्हा तुम्हाला आपले एक नारळ देवघरामध्ये ठेवायचे आहे. मित्रांनो तुम्हाला सर्वपित्री अमावस्याच्या आदल्या दिवशी म्हणजे पाच तारखेला एक नारळ आपल्या घरामध्ये आणून ठेवायचा आहे व ६ ऑक्टोंबर रोजी सर्वपित्री अमावस्येला तो नारळ आपल्या देवघरामध्ये आपण जेव्हा देव पूजा करतो सकाळी तेव्हा ठेवायचा आहे.

त्या नारळाची हळद-कुंकू व अक्षता वाहून पूजा करायची आहे. तर मित्रांनो बस तुम्हाला एवढेच करायचे आहे अजून काही करायचे नाही. आणि तुम्हाला नंतर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशीच संध्याकाळी देवघरा समोर बसून काल भैरव अष्ट एक वेळेस वाचायचा आहे.

कालभैरव अष्टक हे स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पुस्तकांमध्ये दिलेले आहे. जर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर तुम्ही ऑनलाईन बघून वाचू शकतात. तर मित्रांनो तुम्हाला फक्त एक वेळा कालभैरव अष्टक वाचायच आहे आणि कालभैरव अष्टक वाचून झाल्यावर तुम्हाला ते नारळ देव घरासमोरच फोडायचे आहे.

एक गोष्ट लक्षात ठेवा नारळ फोडताना त्या नारळातील पाणी तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये जमा करायच आहे आणि आपल्या संपूर्ण घरांमध्ये त्या पाण्याला शिंपडायचे आहे ते पाणी तुम्हाला प्यायचे नाही आहे. तुम्हाला ते पाणी तुमच्या घरा मध्ये जेवढ्या रूम असतील त्या सर्व रूममध्ये शिंपडायचे आहे.

त्या नारळाचा प्रसाद तुम्हाला सर्व घरातील सदस्यांना देऊन स्वतः सुद्धा खायचा आहे. तर मित्रांनो असा उपाय तुम्हाला ६ ऑक्टोंबर रोजी सर्वपित्री अमावसेला करायचा आहे.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *