नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात एकूण चार ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. याचा परिणाम सामान्य जनतेवर, अर्थव्यवस्था वर तसेच पर्यावरणावर होणार आहे. ऑक्टोबर मध्ये ग्रहांचा राजा सूर्य त्याच्या कमकुवत राशीत प्रवेश करेल. शुक्र कन्या राशीत संक्रमण करेल, तर मंगल मीन राशीत वक्री होईल. तर बुध ग्रह कन्या राशीत वक्री होणार आहे. आणि १४ ऑक्टोबर २०२१ ते ४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत तूळ राशीत राहील.
तूळ राशींमध्ये सूर्याचे संक्रमण हे अनेक महत्वपूर्ण बदलांचे कारण ठरू शकते. तर अश्या परीस्तितीमध्ये कोणत्या राशींच्या लोकांना आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. हे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो अश्या ४ राशी आहेत, ज्यांच्या अडचनिमध्ये वाढ होईल.
मेष राशी- ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे दोन आठवडे मेष राशीसाठी खूप आव्हानात्मक ठरू शकतात. या काळात तुम्हाला कौटुंबिक जीवनात काही गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो. ज्यांचे लग्न झाले आहे त्यांनी आपल्या जोडीदाराशी संभाषण करताना जपून शब्द वापरावे. अन्यथा एखादा छोटासा शब्द ही मोठ्या भांडणाचे रूप घेऊ शकतो.
या काळात शुक्र तुमच्या सहाव्या स्थानात असणार आहे. भौतिक गोष्टींवर अति खर्च होऊ शकतो. त्यामुळे तुमचा आर्थिक बजेट खराब होऊ शकतो. खर्चाला आळा घालण्यासाठी महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही चांगली बजेट योजना बनवावी त्यामुळे तुम्ही नफ्यात असाल.
सिंह राशी- मित्रांनो सिंह राशीचा स्वामी कमकुवत राशीत आहे. आणि वाचनाचा स्वामी तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो. या काळात तुमचे धेर्य आणि शौर्य कमी होऊ शकते. तुम्ही तुमचे शब्द इतरांपुढे ठेवण्यात संकोच कराल. त्यामुळे तुम्हाला सामाजिक पातळीवर अधिकारी क्षेत्रात संघर्ष करावा लागू शकतो.
ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल रागाच्या भरात तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला असे काही बोलू शकतात ज्याचा त्याला राग येऊ शकतो व तुमचे संबंध बिघडू शकतात. या राशीतील व्यक्तींना त्यांच्या लहान भावाशी चांगले संबंध राखण्यासाठी त्यांच्या वागण्यात काही बदल करावे लागतील.
तूळ राशी- या महिन्यात तुम्हाला बुद्धी आणि विवेक वापरून पुढे जावे लागेल. अतिउत्साही स्वभाव तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. तुम्ही घाईत असा निर्णय घेऊ शकतात. ज्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत निर्णय घेताना मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तुमच्या स्वतःच्या राशीत दुर्बल स्स्थितीमध्ये बसलेला सूर्य तुमचा आत्मविश्वास कमजोर करू शकतो. या महिन्यात तूळ राशींच्या व्यक्तींनी योग्य ध्यानाने आपले मन नियंत्रित करावे.
मीन राशी- या महिन्यात मनामध्ये असंतोष व अहिंतेची भावना असू शकतात. तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही जेव्हढि मेहेनत घेत आहात. तेव्हढे यश तुम्हाला प्राप्त होत नाही आहे. त्यामुळे मनामध्ये निराशेची भावना येऊ शकते. या महिन्यात मंगल तुमच्या राशींमध्ये वक्री होईल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या उत्साहात कमतरता पाहायला मिळेल.
तर आठव्या स्थानी सूर्याची उपस्थिती तुम्हाला किरकोळ आजारांनी त्रस्त करू शकते. हरवलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी तूळ राशींच्या व्यक्तींनी या महिन्यात सुर्यदेवाची आराधना करावी व जल अर्पण करावे. या चारही राशींनी सकाळी लवकर उठून सुर्यदेवाला जल अर्पण करून सुर्यदेवाची आराधना करावी.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.