नमस्कार मित्रांनो.
शारदीय नवरात्र ज्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात ती नवरात्र या वर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच ७ ऑक्टोंबर या रोजी आहे. या दिवशी देवी पृथ्वीवर येते आणि नवरात्रीला सुरुवात होते. यावर्षी नवरात्री गुरुवार रोजी सुरू होत आहे आणि १५ ऑक्टोंबर रोजी याची समाप्त होत आहे.
अशाच वेळी नवरात्रीमध्ये आठ दिवस पूजा आणि नवव्या दिवशी विसर्जनाचा योग आहे. कारण चतुर्थी तिथीचा शय झालेला आहे. मित्रांनो नवरात्रीला देवीच्या वाहनाला सुद्धा खूप जास्त महत्त्व प्राप्त असते ज्योतिष शास्त्र यावरूनच पुढच्या वर्षाचे भविष्य कथन करत असतात.
आणि येणारे वर्ष कसे असेल त्या सोबतच आपल्या कुटुंबासोबत काय होईल काय नाही याचा अंदाज लावत असतात. तर मित्रांनो यावर्षी देवीचे वाहन पालखी आहे आणि देवी पालखी मधून येत आहे. मित्रांनो दरवेळी देवी चे वेगवेगळे वाहन असतात कधी कधी देवी चालते ते कधी प्राण्यांवर बसून येते तर यावर्षी देवी पालखी मधून येत आहे.
तर मित्रांनो देवीचे पालखीत येण्याचे आगमन आपल्यासाठी व देशभरातील लोकांसाठी मध्यम स्वरूपाचे असणार आहे. म्हणजेच मध्यम फलदायी मानले जाणार आहे शुभ महिनाही आणि अशुभहि नाही. आपल्या वरील किंवा आपल्या देशा वरील ज्या समस्या आहेत या समस्या या वर्षी अजून सुटणार नाहीत.
मित्रांनो या वर्षी देवीचे वाहन सुखी संदेश देत नाही तरी आपण इतर संकटांपासून व रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी देवीची मनोभावाने उपासना करा. दररोज कवच तिलक या स्तोत्राचे पाठांतर करून जमेल तशी सेवा करा.
मित्रांनो वाहन ही एक मान्यता आहे. पण आपण श्रद्धेने देवीची पूजा केली तर देवी आपल्याला सर्वकाही देऊन जाते मग ते सुख असू द्या किंवा समृद्धी.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद