अरे बापरे..! म्हणून रायगड किल्ला १२ दिवस जळत होता……

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

रायगड किल्ल्याच पहिल नाव होतं रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर चंद्रकांत मोरये च्या ताब्यात होता. हा डोंगर महाराजांनी १५ मे १६५६ ला जिंकून घेतला होता. १६५६ ते १६७० म्हणजे हा रायगड किल्ला बांधण्यासाठी लागलेला कालावधी होता. तब्बल १४ वर्षे कालावधी रायगड किल्ला बांधण्यासाठी लागला.

हा किल्ला हिरोजी इंदुलकर अश्या जगातील सर्वश्रेष्ठ अभियंताने आपले घर दार गहान ठेवून बांधला. या कातळामध्ये ११ तलाव खोदले ८४ पाण्याचा टाक्या बांधल्या. ३५० इमारती बांधल्या. तर रायगड किल्ल्यावर ३५०० लोकवस्ती होती. म्हणून असा किल्ला बांधल्यावर महाराज हिरोजींना म्हणाले हिरोजी तुम्हाला काय पाहिजे ते मांगा.

आम्ही काहीही द्यायला तयार आहोत म्हणून हिरोजींना गडाच्या एका पायरीवर स्वतःचे नाव लिहायची अनुमती मांगीतली. कारण राजाच्या चरणांची धूळ त्या नावावर नेहमीच अभिषेक करत राहील. आपल्या राजाचा राज्याभिषेक ६ जून १६७४ ला झाला.

आज जरी आपण राजस्थान ला गेलो तरी तेथील गडकिल्ले शाबूत पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील गडकिल्ले का नाही तर राजस्थानमधील राजे इंग्रजांना शरणी गेले होते. आपले मराठे कोणासमोर झुकले नव्हते की वाकले नव्हते. म्हणून इंग्रजांनी मराठ्यांच्या एकही किल्ला ठेवला नव्हता.

१० मे १८१८ मध्ये रायगड किल्यावर तोफेचा मारा केला. रायगड किल्ल्यावरील सागाची झाडे व मातीची कौल संपूर्ण जळून गेले. रायगड किल्ला हा तब्बल १२ दिवस जळत राहिला. महाराजांच्या ८ राण्या होत्या त्यातील ६ राण्या ह्या रायगड किल्ल्यावर राहायच्या.

राजांनी या ज्या ८ राण्यांसोबत विवाह केले होते ते राज्य विस्ताराच्या भूमिकेतून केले होते. कारण जर शत्रू समोरून चालून आला तर सर्व नातेवाईक मदतीसाठी धावून यावे व आपल्याला सर्व बाजूने विजय प्राप्त व्हावे यासाठी राजांनी दूरदृष्टीने विचार करून ८ विवाह केले होते.

आपल्या राजाचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला तर ३ अप्रिल १६८० मध्ये रायगड किल्यावर त्यांचे निधन झाले. राजांना ५० वर्षे आयुष्य लाभल. आजदेखील २० वर्षे आपले बालपणात निघून जातात उरले किती 30 वर्षे या तीस वर्षात आपण मनासारखं मोठ घर सुद्धा बांधू शकत नाही.

आणि आपल्या राजाने काय केल हे संपूर्ण जगाला माहीत आहे. म्हणून अंधार फार झाला की दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राला पुन्हा राजमाता जिजाऊंचा शिवबा पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *