नमस्कार मित्रांनो.
कावळ्यांना यमाचे प्रतीक मानले जाते कावळ्यापासुन आपल्याला शुभ व अशुभ संकेत मिळत असतात. म्हणूनच पितृपक्षात सर्वात आधी कावळ्यांना भोजन दिले जाते. पितृपक्षात कावळ्यांना विशेष महत्व प्राप्त आहे पितृपक्षात जर तुम्ही दिलेले भोजन कावळ्यांनी ग्रहण केले तर असे समजले जाते की तुमच्या पूर्वजांची तुमच्यावर कृपादृष्टी आहे. आणि तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न आहे.
जर कावळा तुम्ही दिलेले भोजन ग्रहण करण्यासाठी आला नाही तर तुमचे पित्र तुमच्यावर दुखी आणि नाराज असल्याचे समजले जाते. अशी मान्यता आहे की व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला सर्वात आधी कावळ्याचा जन्म प्राप्त होतो आणि कावळ्यांना भोजन दिले तर ते भोजन आपल्या पितरांना प्राप्त होते याचे कारण असे आहे की पुराणांनुसार कावळ्याला देव पुत्र मानले गेले आहे.
इंद्रपुत्र जयंत यांनी सर्वात आधी कावळ्याचे रूप धारण केले होते ही कथा प्रेता युगातील आहे. जेव्हा भगवान श्रीराम यांनी अवतार घेतला होता आणि जयंताने कावळ्याचे रूप धारण करून सीता मातेच्या पायाला चोच मारली हो आणि श्रीरामांनी जयंत चा डोळा फोडला होताती.
याबद्दल अशी आणखी एक कथा सांगितली जाते की एकदा सीतामाता वनवासात असताना व ती आंघोळ करत असताना कावळा डोळा तिरपा करून सीता मातेकडे आहात होता ही गोष्ट भगवान श्रीराम यांनी बघितली व आपल्या बाणाने कावळ्याचा डोळा फोडला होता.
तेव्हापासून कावळ्याला एकाक्ष असे नाव पडले तेव्हा तो कावळा भगवान श्रीराम यांच्याकडे दया मागू लागला त्यानंतर भगवान श्रीराम यांनी त्याला आशीर्वाद दिला की ज्या वेळी पितरांना भोजन दिले जाईल तेव्हाच तुला भोजन मिळेल व पितृपक्षात तुला सर्वात मोठा मान असेल.
पितृपक्षात तुला घरोघरी आगमन असेल व तू पितृपक्षात पिंडाला शिवल्या शिवाय मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तेव्हापासून पितृपक्षात आपल्या पितरांना भोजन मिळावे म्हणून कावळ्यांना भोजन दिले जाते. आणि सर्वात आधी त्यांना खाऊ घातले जाते.
पितृपक्ष म्हणजे आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्याचा उत्सव आहे या काळात आपण खीर मिठाई पुरी अशी वेगवेगळी पकवान बनवून आपल्या पितरांना अर्पण करतो यामुळे आपले पित्र आपल्यावर खुश होतात व आपल्याला आशीर्वाद देतात.
पितृपक्षाची निगडीत असा काही मान्यता व परंपरा आपल्या समाजामध्ये प्रचलित आहे यातील एक मुख्य परंपरा म्हणजे कावळ्याला आमंत्रण देऊन त्याला भोजन देणे होय. या काळात कावळा आपल्या पितरांच्या स्वरूपामध्ये भोजन करण्यासाठी येतात व या काळामध्ये कावळ्यांना भातापासून बनलेले पिंड जरूर खायला द्यावे.
या पिंडामध्ये खडीसाखर जरूर असावी व त्याच बरोबर एका छोट्या भांड्यामध्ये साखर टाकून गोड केलेले पाणी जरूर ठेवावे. पितृपक्षात असे केल्याने आपले पित्र आपल्यावर खुश होतात व त्यांना मुक्ती मिळते.
यामुळे आपल्यावरील मोठ्यात मोठी संकटे सुद्धा पळून जातात. आणि सर्व प्रकारचे पितृदोष व कालसर्प दोष सुद्धा निघून जातात. व आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येते.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद