पितृपक्ष विषयी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे. नक्की बघा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

१) सर्व भावांनी म्हणजेच सर्व भावंडांनी श्राद्ध घालणे आवश्यक आहे का?

तर हिंदू धर्मशास्त्रानुसार जर भावांची चूल वेगळी असेल म्हणजे तुमचे भाऊ वेगवेगळ्या चुलीवर जेवण बनवत असले तर प्रत्येक भावाने हे श्राद्ध घालायला हवे. एका भावाने घातलेल्या श्राद्धाचे फळ दुसऱ्या भावाला मिळू शकत नाही. त्यासोबतच तुमच्या जीवनामध्ये पितृदोष असेल किंवा काही समस्या असेल तर तुम्ही आवर्जून श्राद्ध घाला.

२) सुनेने आपल्या सासऱ्याचे श्राद्ध घालावे का? अस करणे आपल्या हिंदू शास्त्रानुसार मान्य होते का?
पतीच्या वतीने स्त्री अमान्य श्राद्ध करू शकते. आता अमान्य श्राद्ध म्हणजे काय तर बटाटे तूप, गुळ, तीळ, विळा ही सर्व सामग्री आपण एखाद्या देव घरांमध्ये अर्पण करावी. किंवा एखाद्या ब्राह्मणाला द्यावी याला अमान्य श्राद्ध असे म्हणतात.

३) शास्त्रशुद्ध पितृशांती करायची असेल तर ती कुठे करावी? शास्त्रशुद्ध पितृ शांती म्हणजे काय तर त्रिपिंडी शांती, कालसर्प दोष शांती, नारायण नागबली या सर्व ज्या विधी असतात या विधींनाच पितृ शांती म्हटले जाते. या विधी जर आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचा असेल.

तर वाराणसी महाराष्ट्रातील त्रंबकेश्वर आणि बिहारमधील गया या तिन्ही ठिकाणी भारतातील अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने पितृ शांती केली जाते. मात्र प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी जाऊन पितृ शांती करणे आवश्यक व शक्य नाही आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या भागातच पितृ शांती करून घेऊ शकता.

४) पितृपक्षात जर सुतक पडलं तर काय करावे…
पितृपक्षात जर सुतक पडलं तर मेलेल्या व्यक्तीची तिथी जर सुतक पडल्यानंतर येत असेल तर आपण त्या दिवशी पितृपक्षाचा विधी करू शकता. मात्र मेलेल्या व्यक्ती ची तिथी जर सूतक काळामध्ये येत असेल.

तर तुम्ही त्याचे श्राद्ध घालू नये मात्र सर्वपित्री अमावस्या ज्या दिवशी असते त्या दिवशी तुम्ही त्या व्यक्तीचे श्राद्ध करू शकता. आपल्या आई किंवा वडील यामधील कोणी वारलेले असेल तर त्यांचे श्राद्ध आपण या वर्षी न करता पुढच्या वर्षी करावे.

५) जीवनामध्ये पितृदोष आहे आणि पितृ दोष कमी करण्यासाठी पितृ शांती सुद्धा केली तरीही काहीही फरक पडला नाही काय करावे?

तर मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की पितृ शांती केल्यावर सुद्धा आपल्याला होणारा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढतो तर मित्रांनो काही ठिकाणी त्रास कमी न होता तो वाढणे हे सुद्धा एक त्रास कमी होण्याचे लक्षण असू शकते. तर मित्रांनो याचा अर्थ असा आहे की तुमच्या पीत्रांच्या त्रासाची तीव्रता जर अधिक असेल तर तुम्हाला एकच वेळा शांती करून त्याचा अपेक्षित असा लाभ मिळत नाही.

किंवा कधीकधी त्रास वाढतो आणि तो नंतर कायमचा दूर होतो. तर मित्रांनो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र या मंत्राचा जाप तुम्ही सातत्याने चालू ठेवा यामुळे पितृदोष काही अंशी कमी होतो. त्यासोबतच तुमची पितृदोष कमी होत नसेल तर त्या व्यक्तीची पत्रिका एखाद्या ब्राह्मण ला दाखवा आणि त्याच्या सांगण्यानुसार कोणता अन्य विधी करावा लागत असला तर तो करून घ्या.

६) आपल्या पूर्वजांचे टाक जर घरात ठेवलेले असेल तर ते योग्य आहे का?. तर मित्रांनो आपल्या पूर्वजांचे टाक घरात ठेवणे योग्य नाही ते लवकरात लवकर विसर्जित करावे.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *