नमस्कार मित्रांनो.
पो-र्नो-ग्रा-फी प्रकरणात अटकेत असलेला प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अखेर शेवटी आज कोर्टाने जामीन मंजूर केल्याचे दिसून येत आहे. राज कुंद्रा दोन महिन्यांपासून तुरुंगाची हवा खात होता. पो-र्न चित्रपटांची निर्मिती केल्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी १९ जुलै रोजी अटक केली होती.
आता या दरम्यान, राज कुंद्राच्या जामिनानंतर शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर भावना मांडणारी एक पोस्ट आता शेअर केली असून आता ही पोस्ट चांगलीच व्हायरल होऊ लागली आहे.
शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करून एक संदेश दिला आहे आणि त्या पोस्ट मधे शिल्पाने संध्याकाळच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या इंद्रधनुष्याचा फोटो शेअर केला आहे आणि त्याखाली तिने लिहिले आहे की, इंद्रधनुष्याचे अस्तित्व हे सांगण्यासाठी आहे की, एका वाईट वादळानंतर चांगल्या गोष्टी होऊ शकतात आणि शिल्पाने लिहिलेली ही पोस्ट थेट तिच्या परिस्थितीकडे इशारा करत आहे.
आजचा दिवस शिल्पासाठी खरोखरच खास ठरला असल्याच दिसून येत आहे. शिल्पाची तिची बहीण शमिता शेट्टी आणि पती राज कुंद्रा हे दोघेही घरी परतले आहेत. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील कोर्टाने राज कुंद्राला पो-र्नो-ग्रा-फी प्रकरणात ५० हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजुर केला.
असून तत्पूर्वी मुंबई पो-लि-सां-नी राज कुंद्राविरोधात चार्जशिट दाखल केली होती आणि त्यात १५०० पानांच्या चार्जशिटमध्ये ४३ साक्षीदारांची नावे देखील देण्यात आली आहेत आणि आता याबाबत चा शिल्पाचा पो-लि-सां-ना दिलेला जबाबही समोर आला होता.
मुंबई पो-लि-सां-नी अशी माहिती दिली होती की, आरोप पत्रामध्ये ४३ साक्षीदारांची नावे रेकॉर्ड करण्यात आली असून या ४३ साक्षीदारांमध्ये राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे देखील नाव आहे.
तसेच शर्लिन चोप्रा हिच्या नावाचा देखील यात समावेश होता. दरम्यान, मी माझ्या कामात व्यस्त होते. पती राज कुंद्रा काय करत होते. हे मला माहिती नाही, असा जबाब शिल्पा शेट्टी ने दिल्याच समोर आले होते.