नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो असे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. प्रत्येक पुरुषाला असे वाटते की, जी स्त्री आपल्या घरी लग्न करून येणार ती खूप भाग्यशाली असावी. तिच्यामुळे आपले घर स्वर्ग व्हावे व तिने आपली व आपल्या कुटुंबाची नीट काळजी घ्यावी. व आपल्या कुटुंबात आनंद आनंद आणावा.
काही पुरुषांच्या बाबतीत हे खरे सुद्धा होते त्यांच्या घरात येणारी स्त्री ही खरोखर आनंद घेऊन येते. संपूर्ण घरातील वातावरणात आनंद पसरवते ती म्हणजे घरातील स्त्री. तर मित्रांनो पुराणांमध्ये असे काही स्त्रियांमधील गुण सांगितलेले आहेत की, हे गुण जर एखाद्या स्त्री मध्ये असेल तर ती स्त्री चे लग्न झाल्यावर ती स्त्री आपल्या घराला स्वर्ग बनवते.
तर मित्रांनो पहिल लक्षण आहे ते लक्षण म्हणजे धर्माच्या मार्गावर चालणारी स्त्री म्हणजे धार्मिक स्त्री जी स्त्री रोज तुळशीसमोर व देवासमोर दिवा लावते व स्वयंपाक झाल्यावर अगोदर देवाला नैवेद्य दाखवते. मगच सर्व जण भोजन करतात. या सर्व कारणांमुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व घरातील वातावरण शुध्द व पवित्र होते व अशा वातावरणात राहणारे कुटुंब आनंदी राहते. दुसरा गुण म्हणजे समाधानी
वृत्ती- जी स्त्री छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानते जास्त गोष्टींचा अट्टाहास करत नाही त्या स्त्रीचा पती सुद्धा तिच्यावर आनंदित असतो. काही स्त्रिया शेजारच्या घरामध्ये जर काही वस्तू आली तर ती वस्तू आपल्याही घरात आलीच पाहिजे असा अट्टाहास करतात.
त्यांचा असा हा अट्टहास पूर्ण करता करता त्यांच्या पतीच्या नाकीनऊ येतात आणि कधी कधी तर त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला वाईट काम सुद्धा करावे लागतात. त्यामुळे कुटुंबाला सुद्धा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे घरातील स्त्री समाधानी वृत्तीची असेल आणि तिच्या गरजा लिमिटेड असतील तर तिच्या नवऱ्याला ह्या पूर्ण करता करता जास्त त्रास सहन करावा लागत नाही.
तिसरा गुण म्हणजे स्त्रीमध्ये धैर्य असावे, धाडस असावे कोणतीही परिस्थिती समोर आली तरी त्या परिस्थितीला सामोरे जायचं धैर्य धाडस त्या स्त्रीमध्ये असावे. जर कितीही वाईट परिस्थिती आली तरी ती स्त्री आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहायला हवी. जर अशी स्त्री आपल्या घरामध्ये असेल तर आपली वाईट परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही.
चौथा गुण म्हणजे राग येणारी स्त्री तर मित्रांनो राग न येणे ही गोष्ट तशी तर अशक्यच आहे. परंतु राग येणे हा स्त्रीचा जन्मसिद्ध हक्कच आहे. परंतु अती राग येणे, चिडचिड करणे व कर्कश बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नये. थोडाफार राग तर सर्व स्त्रियांना होतो आणि तो यायलाच हवा कारण हा राग जर आला नाही तर त्याचा मोठा स्पोट होतो म्हणून हा राग यायला हवा.
जर एखादी स्त्री खूप मोठ्या आवाजात बोलत असेल किंवा कर्कश आवाजात बोलत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते व त्या घरामध्ये नेहमी भांडण होतात. म्हणून मित्रांनो स्त्री ने संयमित व शांत असावे.
पाचवे लक्षण म्हणजे समजदार स्त्री अशी स्त्री जी प्रत्येक गोष्टी समजूतदारपणे घेते प्रत्येक गोष्टीला समजून घेते. जी परिस्थिती आहे त्यासोबत स्वतःला जुळवून घेते तसेच सर्वांशी चांगले व गोड वागते असे घर सुखी व समृद्ध असते. ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते ती स्त्री इतरांशी गोड बोलून संबंध चांगले बनवते व इतरांना समजून घेते.
यामुळे जेव्हा ती स्त्री किंवा त्या स्त्रीचे कुटुंब संकटात असतात तेव्हा असेच लोक मदतीसाठी धावून येतात. तर मित्रांनो ही पाच लक्षणे ज्या स्त्री मध्ये असतात त्या घरातील भिकारी सुद्धा राजा बनतो.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद