पितृपक्षात चुकूनही करू नका ह्या गोष्टी, नाहीतर पितर होतील नाराज कायमची येईल गरिबी

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपत पौर्णिमेपासून पितृ पक्षाला सुरवात होते ह्या वर्षी २० सेप्टेंबर २०२१ पासून ६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पितृपक्ष असणार आहे. मित्रांनो ह्या पितृपक्षामध्ये आपल्या घरात ज्या काही मृत व्यक्ती आहेत ज्यांना आपण पितर म्हणतो त्यांचे दर्पण केले जाते. जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील सर्व संकटे व सर्व परेशानी निघून जाईल.

या पितृपक्षात त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना खाऊ घातले जातात तसेच अनेक उपाय देखील केले जातात पण अशी काही कामे आहेत जी ह्या पितृपक्षात अजिबात करू नये ज्यामुळे पित्र आपल्यावरती अप्रसन्न होतात व आपल्या कुंडलीत देखील पितृदोष निर्माण होतो म्हणून हि कामे आपण चुकूनही करू नयेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या त्या चुका आहेत.

मित्रांनो अप ह्या पितृपक्षाच्या काळात आपण काही गोष्टींचे भान ठेवले पाहिजे जेणेकरून आपल्यावरती पितृ अप्रसन्न होणार नाहीत. त्यातील पहिले काम म्हणजे आपल्या दरवरती कोणतीही गरजू व्यक्ती अली तर त्या व्यक्तीचा अपमान करू नका कारण पितर हे आपल्या घरात कोणतेही रूप धारण करून येऊ शकतात.

म्हणून प्रेत्येकाचा आदर करा. कोणतेही पशु पक्ष्यांना त्रास देऊ नये विशेष करून गाईचा अपमान करू नका, गाईला आपल्या हिंदुधर्मात मातेचं स्थान दिले आहे म्हणून गाईचा अपमान चुकूनही करू नका.

ह्या पित्रपक्षात पशुपक्ष्याना खायला अन्न द्या त्याचबरोबर आपण ह्या महिन्यात मद्यपान तसेच मांसाहार टाळावा त्याचबरोबर आपण ह्या पितृपक्षात झाडांची छाटणी देखील करू नका. काही छोटी छोटी झाडे लावली असतील तर त्या झाडांची छाटणी किंवा कापणी ह्या काळात करू नका कारण ह्यामुळे पितर नाराज होऊ नका.

तसेच ह्या पितृपक्षात नवीन कामाची सुरवात करू नका. कारण ह्या काळात कोणतेही नवीन काम करणे निषिद्ध मानले आहे. म्हणून चुकूनही ह्या काळात कोणतेही नवीन वस्तू खरेदी करणे किंवा दुसरे काही महत्वाची कामे असतील तर ती आपण करू नयेत.

तसेच खूप लोक ह्या काळात वर्षश्राद्ध घालतात काहि लोक स्वतःच्या घरात काही अडचण असेल तर ते श्राद्ध दुसऱ्यांच्या घरी घालतात तर मित्रांनो असे ना करता ते आपण प्रयाग, भद्रिनाथ ठिकाणी घाला परंतु दुसऱ्यांच्या घरी हे घालू नये.

ह्याचबरोबर खोट बोलणे किंवा कोणाबद्दल वाईट विचार करणे हे सुद्धा चुकीचे आहे. जर तुम्हाला पितरांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *