नमस्कार मित्रांनो.
आपल्या हिंदू धर्मात दान करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. विशेष म्हणजे पितृपक्षात आपल्या पूर्वजांना खुश करण्यासाठी आपण ज्या वस्तू दान करतो असे केल्याने आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. पितृपक्षात केलेल्या दानामुळे फक्त आपला कालसर्प दोषच नाही तर पितृ दोषही निघून जातो.
त्याबरोबरच आपल्या जीवनातील सर्व दुःख व बाधा दूर होईल आपल्याला सुखसमृद्धी,पैसा, सुख या सर्वांची प्राप्ती होते. असे म्हणतात की पित्रांचे नाव घेऊन आपण जी वस्तू दान करतो ती वस्तू त्यांना त्यांच्या योनीनुसार म्हणजे जन्मानुसार भेटते.
आपले पित्र पित्र रुपात असलात द्रवरूपात, देव योनीत असल्यास अमृत रुपात, गंधर्व रूपात असल्यास भोग रूपात, पशु योनीत असल्यास धन रूपात, सर्प योनीत असल्यास वायुरूपात, मानव युनी माणसाच्या नुसार, प्रेत योनीत रक्ताच्या स्वरूपात आणि जर आपले पूर्वज मनुष्य योनीमध्ये असली तर त्यांना अन्नधान्य या रूपामध्ये आपले ज्ञान प्राप्त होते.
म्हणजे आपण केलेले दान कधीही निष्फळ होत नाही. पितृपक्षात तसे तर आपण कोणतीही वस्तू श्रद्धा व भावनेने दान करू शकतो परंतु हिंदू धर्मामध्ये विशेष काही वस्तू सांगितले आहे ज्या आपण पितृपक्षात नक्की दान कराव्या.
संपूर्ण श्राध्यमध्ये तिळाचे भरपूर महत्व सांगितले गेले आहे. काळे तीळ श्रीहरी विष्णू यांना प्रिय आहे म्हणून श्राद्ध पक्षात कोणत्याही वस्तूचे दान करताना हातामध्ये थोडेसे काळे तीळ जरूर घ्यावे व त्या दानासोबत तेही दान करावे.
असे केल्याने आपल्या दानाचे संपूर्ण फळ आपल्या पूर्वजांनी मिळते. पितृपक्षात केलेल्या दानामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे प्रत्येक संकट व बाधांपासून रक्षण होते. श्राद्धपक्षात शुद्ध गाईच्या तुपाची वाटी भरून ती वाटी पत्र ब्राम्हणाला दान करावी. हे खूप मंगलमय कार्य मानले जाते. यामुळे घरातील वादविवाद, कलह व भांडण दूर होऊन घरात प्रेमाचे व स्नेहाचे वातावरण तयार होते.
पितृपक्षात सोन्याचे दानही खूप महत्वपूर्ण असते पण आजच्या काळात हे दान करणे शक्य नसल्याने थोडेसे द्रव्य व धन दान केले तरी चालेल. पितृपक्षात तुम्ही कोणत्याही प्रकारचे अन्न दान करू शकतात फ़क्त करताना पूर्ण श्रद्धेने व मनोभावे केल्यास आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात.
शास्त्रानुसार आपल्या मित्रांना सुद्धा थंडीची व उष्णतेची जाणीव होते त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी पित्र आपल्यापासून अपेक्षा करतात. म्हणून आपण आपल्या पितरांचे नाव घेऊन कोणालाही वस्त्र दान केल्याने ते आपल्याला पितरांना मिळतात व आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात.
विशेषता धोतर व ओढणीचे दान वस्त्रदान मध्ये महत्त्वाचे मानले गेले आहे. तसे तर तुम्ही तुमच्या पितरांच्या पेहनाव्यानुसार शर्ट-पॅंट ओढणी काहीही दान करू शकतात. परंतु हे वस्त्र नवीन कोरे व स्वच्छ असावे त्याशिवाय पितृपक्षामध्ये चांदीच्या वस्तूचे दान खूप महत्त्वाचे सांगितले जाते. पुराणानुसार आपल्या पूर्वजांचा वास चंद्राच्या वरच्या भागात आहे.
इतरांना चांदीच्या वस्तू खूप प्रिय आहे चांदी दूध व तांदूळ अशा पांढऱ्या शुभ्र वस्तूच्या दानाने पित्र अतिशय खूप जास्त खुश होतात. अशाप्रकारे दान केल्याने फक्त आपल्या वंशाची वृद्धी होत नाही तर आपले सर्व दुःख दूर होतात. श्राद्ध पक्षात एखाद्या गरीब व्यक्तीला भूमी दान केल्याने आपल्याला मालमत्ता प्राप्त होते.
महाभारतात सांगितले गेले आहे की नकळत घडलेल्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी भूमिदान हे सर्वात फायद्याचे दान आहे. कृष्ण पक्षात आपण भूमी दान केल्याने आपल्या पितरांना त्यांच्या भूमी वर योग्य जागा मिळते. भूमी दान शक्य नसेल तर मातीचे काही खडे घेऊन ते एका पात्रात टाकून त्यावर थोडीशी दक्षणा देऊन ते ब्राह्मणाला द्यावे श्रद्धापूर्वक केलेल्या मातीच्या ताणामुळे सुद्धा आपले पूर्वज संतुष्ट होतात.
भूमी दानामुळे यश सन्मान तसेच अक्षय धनाची प्राप्ती होते. ज्यांच्या घरामध्ये नेहमी वादविवाद व भांडण-तंटे होत असतील त्यांनी पितृपक्षामध्ये गुळाचे दान करावे गुळाचे दान केल्याने आपले पित्र लवकर खुश होतात व आपल्याला सुख समृद्धी धन व यशाची प्राप्ती होते.
गोदान तर प्रत्येक गोष्टी मध्ये फायदेशीर मानले गेलेले आहे परंतु पितृपक्षात केलेले गोदान आपल्याला सर्व प्रकारच्या सुख सुविधा फायदे मिळवून देते. शास्त्रानुसार ज्या व्यक्तीचा मृत्यू होणार असतो आणि त्या व्यक्तीने जर गाईची शेपूट धरून गोदान केले तर त्या व्यक्तीला मेल्यानंतर नदी पार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडथळे येत नाही. वैतरणा नदी यम लोकांच्या रस्त्याने येते.
त्यात भयानक जीवजंतू असतात ते पापी लोकांना घोर पीडा देतात. म्हणून पितृपक्षामध्ये गोदान केल्यास आपले पूर्वज आपल्यावर अति प्रसन्न होतात व आपल्याला हृदयापासून आशीर्वाद देतात. जर तुम्ही गोदान करण्यासाठी सक्षम नसाल तर तुम्ही यथाशक्ती चे दान करू शकतात. पीत्रांना प्रसन्न करण्यासाठी मीठाचे दान हे खूप महत्त्वाचे आहे.
मिठाचे दान करण्यापूर्वी ब्राह्मणांमध्ये आपल्या पूर्वजांचा समावेश आहे असे समजून ब्राह्मणांना भोजन कळवावे त्यानंतर मिठाचे दान करून त्यांच्या संतुष्टीची इच्छा मनात धरून व आपल्या कडून कळत-नकळत घडलेल्या अपराधाची क्षमा मागावी त्यांच्या घरामध्ये नेहमी वाद विभाग व भांडण-तंटे होत असतात त्यांनी मिठाचे दान अवश्य करावे.
गरुड पुराणानुसार मिठाचे दान केल्याने यमाची भीती मनातून निघून जाते. पितृपक्षात पितरांच्या खुशीसाठी चपला बुटांचे दानही महत्वाचे असते. म्हणून पितृपक्षामध्ये एखाद्या गरीब व गरजू व्यक्तीला चपला बुटांचे दान करणे अतिशय शुभ समजले जाते. पितरांचे नाव घेऊन छत्रीचे दान केल्याने ही सुख शांती येते.
पितृपक्षात छत्रीचे दान केल्याने आपले पूर्वज आपल्यावर अति प्रसन्न होतात त्याशिवाय आपली परिस्थिती असल्यास आपल्या पितरांची आवडती वस्तू साधन किंवा कपडे दान केल्यास पित्र अतिशय खुश होतात.
आपल्या पीत्राच्या श्राद्ध तिथीला म्हणजेच अमावस्येला ब्राह्मण भोजन जरूर करवावे यामुळे आपल्या पीत्रांचे आपल्यावरती नेहमी आशीर्वाद राहतात.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.