पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी घरात करून घ्या, ही कामे नाहीतर अडचणी वाढतील.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

गणपती विसर्जन नंतर सुरू होत ते पितृपक्ष पंधरवडा. हे पंधरा दिवस अतिशय महत्त्वाचे असतात. ज्या प्रकारे इतर सणवार येत असतात त्याच प्रकारे दरवर्षी पितृपक्ष येत असतो. गेलेल्या लोकांसाठी व आपल्या पितरांसाठी. जी लोक आज आपल्या सोबत नाही त्या लोकांचे श्राद्ध करण्यासाठी हा दिवस असतो. तर मित्रांनो पितृपक्ष २१ सप्टेंबर रोजी मंगळवारी सुरू होणार आहे.

२१ सप्टेंबर पासून ते १५ दिवस हा पंधरवाडा असतो म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसांपर्यंत हे दिवस असतात. तर मित्रांनो हात पितृपक्ष सुरू होण्याआधी तुम्ही घरामध्ये हे कामे करून घ्या जेणेकरून तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. मित्रांनो जसे आपले मोठे मोठे सण येतात जसे की दिवाळी-दसरा तेव्हा आपण ज्या प्रकारे आपल्या घराची साफसफाई करून देतो तसेच पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी आपण आपल्या घराची व्यवस्थित साफसफाई करून घ्यावी.

घरामध्ये जे जाळे असेल तर ते जाळे काढून घ्यावे. घरात जो भंगार सामान असतो तो बाहेर काढून टाकावा घरात कोणत्याही प्रकारची घाण ठेवावी नाही. मित्रांनो असे समजले जाते की आपले चे मित्र असतात ते आपल्या घरी या दिवशी येत असतात म्हणून त्यांना आपण श्राद्ध टाकत असतो. तर मित्रांनो हा दिवस येण्यापूर्वी आपण घराची व्यवस्थित साफसफाई केली पाहिजे त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडले पाहिजे हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते.

भांडी घासून घ्यावी त्यानंतर सर्व घर स्वच्छ करावे. तर मित्रांनो हे काम तुम्हाला पितृपक्ष सुरू होण्याआधी करायचे आहे आणि त्यानंतर जेव्हा पितृपक्ष सुरू होते त्यानंतर चे पंधरा दिवस खूप महत्त्वाचे असतात. या दिवसांमध्ये तुम्ही घरामध्ये कटकटी व भांडण होणार नाही याची काळजी घ्यावी. व्यसने करणाऱ्या माणसांनी या दिवशी व्यसन करू नये.

नाहीतर खूप संकटांना आपल्याला सामोरे जावे लागते आपल्याला पितृदोष लागतो. तर मित्रांनो पितृपक्ष सुरू झाल्यापासून पूर्ण पंधरा दिवस तुम्ही कावळ्याला किंवा गाईला एखादी चपाती खायला द्या. सकाळी तुम्ही जेव्हा केव्हा दुपारी जेव्हा स्वयंपाक करतात तेव्हा एक चपाती कावळ्यासाठी व गाईसाठी काढून घ्यायची अर्धी अर्धी टाकली तरी चालेल.

कुत्र्याला तुम्ही दिसला तर त्याला चपाती खाऊ घालू शकतात किंवा कावळ्या साठी तुम्ही तुमच्या छतावर चपाती टाकू शकतात. तर मित्रांनो पितृपक्ष सुरू होण्यासाठी ही सर्व कामे करून घ्या यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *