नमस्कार मित्रांनो.
आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण हे विसरून जातो की आपले आई वडील म्हातारे होत चालले आहे. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत ते कायम आपल्या सोबत असतात परंतु त्यांच्या म्हातारपणात आपण हे विसरून जातो की आता त्यांना आपली गरज आहे.
अधून मधून त्यांची प्रेमाने विचारपूस करून देत जा त्यांना हे जाणीव करून देत जा कि, तुम्ही त्यांच्यासोबत आहात. कोणत्याही वयामध्ये असणाऱ्या माणसाला तीन गोष्टींची जरूरत असते प्रेम आदर आणि कोणी तरी काळजी करणारा व्यक्ती. आता तुझ्या आईची आणि मुलाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ती तुमच्या हृदयाला भीडल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडतो आणि अधून मधून तिला भेटायला जात असतो. एक वेळेस वृद्धाश्रम आतून त्या मुलाला कॉल येतो की तुझी आई खूप सिरीयस आहे कृपया तुम्ही तिकडे येऊन जा तेव्हा मुलगा धावतच वृद्धाश्रमात जातो आणि बघतो तर काय त्याची आई शेवटचा श्वास मोजत असते.
तेव्हा मुलगा आईला विचारतो आई मी तुझ्यासाठी काय करू ज्यामुळे तुला आनंद होईल तर आई म्हणते बाळा या वृद्धाश्रमात पंखे खराब झालेले आहे. कृपया येथे नवीन पंखे बसवून दे आणि या वृद्धाश्रमातील फ्रीज सुद्धा खराब आहे. त्यामुळे इकडे नवीन फ्रीज आणून दे फ्रिज खराब असल्यामुळे अन्न जास्त वेळ टिकत नाही. त्यामुळे मला अनेक वेळा उपाशी सुद्धा झोपावे लागले.
आईचे असे बोलणे ऐकून मुलाला धक्काच बसला. मुलगा म्हणाला तू इथे खूप वर्ष झाले राहत आहे. तू मला हे आधीच का नाही सांगितले आणि आता तुझे शेवटचे श्वास मोजत असताना तू मला ही गोष्ट का सांगत आहे? तर आई म्हणते बाळा मी गर्मी सहन केली भूक सहन केली कारण मला सवय लागली होती.
परंतु जेव्हा तू म्हातारा होणार तेव्हा तुझी मुले तुला इकडे सोडणार आणि तेव्हा तू इकडे राहू शकणार नाही याची मला भीती वाटत होती. आईचे हे बोलणे ऐकून मुलगा निशब्द होतो आणि रडू लागतो. मित्रांनो जेव्हा आजचे तरुण आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकतात. त्यांची काळजी घेत नाहीत. तेव्हा ते हे विसरून जातात की, ते ही कधीतरी वृद्ध होणार आहे.
तरुण मुल हे विसरून जातात की, आपण सुद्धा एका दिवशी म्हातारे होऊन जाणार आहोत. आणि एक गोष्ट आहे क्रिया तशी प्रतिक्रिया. तर मित्रांनो तुम्ही आज आपल्या आई-वडिलांना जी वागणूक देत आहात तशीच वागणूक तुमची मुल तुम्ही म्हातारे झाल्यावर तुम्हाला देणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा.
आपल्या स्वतःला एक प्रश्न विचारा जर तुमची मुले तुमच्या सोबत खराब वागत असतील तर तुम्ही आपल्या आई-वडिलांसोबत कसे वागले होते हा प्रश्न स्वतःला विचारा. तुम्हाला उत्तर मिळून जाईल.
लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.