गोष्ट लालबागच्या राजाची, स्थापना आणि इतिहास पहिलाच नवस पूर्ण झाला होता.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की लालबागच्या राजाची स्थापना कोणी आणि का केली तसेच कशाप्रकारे या गणपतीला केलेला पहिलाच नवस पूर्ण झाला व नवसाला पावणारा गणपती असा नावलौकिक प्राप्त झाला.
ही गोष्ट आहे इसवी सन १९३२ मधील मुंबईतील लालबाग परळ परिसरातील तेव्हा मुंबईला लालबाग परळ म्हणून ओळखले जात होते.

हे शहर इंग्रजांच्या दृष्टीने खूप महत्वाचे होते. सर्वात जास्त व्यापार आणि घडामोडी याच शहरात होत होत्या. मुंबई ही राजधानी दिल्ली पेक्षाही वरचढ होती असे आपण म्हणू शकतो. शिवाय समुद्र किनारा जवळच असल्यामुळे या शहराचा ब्रिटिशांना चांगलाच फायदा झाला.

या दिवसांत मुंबईत मोठमोठे उद्योग धंदे उदयास आले व मोठेमोठे कारखाने बांधले गेले संपूर्ण मुंबईच चित्रच बदलत होत आणि यामध्ये एक क्षेत्र पुढे आल ते म्हणजे टेक्सटाईल मिल्स. टेक्सटाईल मिल्स म्हणजे कापड गिरण्या लालबाग परळ या भागात अनेक कापड गिरण्या बांधल्या गेल्या होत्या. या गिरण्यांतून अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला व या गिरण्यांमध्ये काम करणारे लोक लालबाग या परिसरातच स्थायिक झाले.

त्यामुळे या भागात लोकांच्या वस्त्या मोठ्या प्रमाणात वाढल्या. मुंबईचा विकास होत असल्यामुळे येथे जागेची कमतरता भासू लागली त्यामुळे ब्रिटिश सरकारने मुंबई येथील पेरू चाळ व तेथील बाजूची वस्ती हटवून तेथे नवीन कारखाना उभारण्याची योजना बनवली. पेरु चाळ मधील मासे विक्री करणाऱ्या लोकांसमोर जागेचा प्रश्न निर्माण झाला.

त्यावेळी या लोकांना काय करावे ते सुचत नव्हते. त्यावेळी लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला सार्वजनिक उत्सव गणपती बसवणे हे मुंबईतही पसरला होता. लोकांच्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण झाला होता आणि या सार्वजनिक उत्सवामुळे लोकांनाही एकत्र येण्याची संधी मिळत होती. मुंबईतही अनेक सार्वजनिक मंडळ स्थापन झाली होती.

तेव्हा त्या मासेविक्री करणाऱ्या लोकांनी लालबागच्या राजाला साकळ घातल की, आम्हाला मासेविक्री साठी आमच्या हक्काची जागा मिळु दे आणि या लोकांनी त्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू केले. त्यांना तेथील व्यापारी आणि प्रतिष्ठित लोकांनी मदत केली आणि पाहता पाहता त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले.

तेव्हा या लोकांना मासेविक्री साठी आपली हक्काची जागा मिळावी व इसवीसण १९३४ साली येथील लोकांनी गणपतीची मूर्ती आणून गणेशोत्सव चालू केला. स्थापनेच्या पहिल्या वर्षापासूनच या गणपतीची नवसाला पावणारा गणपती अशी कीर्ती प्रस्थापित झाली.

या गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढत गेली तेव्हापासून येथील लोक या गणपतीला वेगवेगळे नवस करत होते आणि ते नवस पुर्ण सुद्धा होत होते. अशी त्यांची श्रद्धा होती. पाहता पाहता हा गणपती मुंबईतील गणेश मंडळातील प्रमुख घटक बनला. लालबागच्या मार्केट मध्ये हा गणपती बसत होता म्हणून या गणपतीला लोक लालबागचा राजा म्हणून ओळखू लागले.

सुरुवातीपासून या गणपतीची मूर्ती विविध स्वरूपात साकारली जायची. एकवर्षी हा गणपती मासेमारांच्या बोट मध्ये विराजमान दाखवण्यात आला तर एकावर्षी श्रीकृष्णाच्या रुपात रथावर दाखवण्यात आला. १९४६ साली गणपतीची मूर्ती नेताजी सुभाषचंद्रबोस यांच्या प्रतिमेत साकारली गेली होती. लालबाग मधील गणपती आणि गणपती च्या बाजूला असणारा देखावा हे आकर्षणाचे केंद्र झाले होते.

या गणपतीही उंची हळूहळू वाढवण्यात सुद्धा आली. सध्या स्थापन करण्यात येणारी मूर्ती २० फूट उंच असते. या दिवसात लाखो लोक लालबागच्या राजाच दर्शन घेण्यासाठी येतात. मूर्ती बनवण्याची सुरुवात पायापासून केली जाते आणि त्या दिवशी पाथ्य पूजन सोहळा आयोजित केला जातो. गणपतीच्या अकरा दिवसांमध्ये अनेक मोठे खेळाडू सेलिब्रिटी व हिरो या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येतात.

या काळात विशिष्ट पोलीस पथक आणि सुरक्षा समितीही येथे कार्यरत असते. दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागलेली असते. नवसाच्या रांगेत तर लोक पंधरा सोळा तास उभी असलेली पाहायला मिळतात. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही एखाद्या राजाला शोभेल अशीच असते.

दुपारी निघालेली राजाची मिरवणूक दिडगाव चौपाटीला पोहचायला दुसरा दिवस उजळतो. लालबागच्या राजाच विसर्जन पाहण्यासाठी सुद्धा लोक हजारोच्या संख्येने येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *