गणपती विसर्जन केल्यानंतर नारळ सुपारी व इतर वस्तूंचे काय करावे??

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये श्रद्धेने गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे आपण श्रद्धेने आणि आनंदाने गणपती बाप्पांची पूजा करतो. व दुसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी सातव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करतो.

आपण विसर्जनाच्या दिवशी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करतो पण कलश जा कापडावर बाप्पाला बसवलेले असते तो कापड नारळ कलश सर्व जसे असतात तसेच राहतात. म्हणून या वस्तूंचे काय करावे हे आपल्याला नेमके कळत नाही म्हणून या वस्तूंचे विसर्जन कसे करावे किंवा या वस्तूंचा वापर का करावा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे.

आपण ज्या वस्त्रांचा वापर बाप्पाला बसवण्यासाठी करतो ते वस्त्र नवीनच असते म्हणून त्या वस्त्रांचा वापर आपण आपल्या देवघरामध्ये करू शकतो. देवघरातील देवाला स्थानावर ठेवण्यासाठी आपण हे कापड अंथरू शकतो. किंवा देवांना हा कापड ठेवण्यासाठी तुमची इच्छा नसेल तर हात पुसण्यासाठी किंवा देव घरातील कलश पूसण्यासाठी तुम्ही या कापडाचा उपयोग करू शकता.

जेव्हा गणपती बाप्पाला विसर्जित करण्यासाठी आपण नदीवर किंवा कोणत्या तलावावर जातो तेव्हा जेथे आपण गणपतीबाप्पाला ठेवतो त्या ठिकाणची थोडीशी माती घरी आणावी आणि ज्या ठिकाणी आपण बाप्पाला बसवलेले होते त्या पाठावर जेथे स्वस्तिक काढलेले होते तेथे ती माती ठेवावी आणि बाप्पाची आरती करावी.

कारण आपण बाप्पा चे मूर्ती म्हणून जेथे विसर्जन केलेले असो तरीही सुष्म रुपाने गणपती बाप्पा आपल्या घरातच असतात. समई किंवा दिवा चालू असेल तर तो तसाच चालू ठेवावा. दुसर्या दिवशी ती माती तेथून उचलून आपल्या कुंडीमध्ये टाकून द्यावी आणि त्यावर थोडे पाणी टाकावे त्यामुळे गणपती बाप्पांचा वास आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात राहिल.

त्यानंतर जे तांदूळ गणपती बाप्पा बसवण्यासाठी आपण घेतले होते त्यात तांदळाची खीर बनवावी व प्रसाद म्हणून खाऊन घ्यावी त्याशिवाय उरलेले सर्व तांदूळ आपल्या धान्या मध्ये टाकून द्यावे. यामुळे आपल्या अन्न आणि धान्यामध्ये बरकत येते त्या शिवाय तुमची ते तांदुळ जर तुमच्या धान्यांमध्ये टाकण्याची इच्छा नसेल तर पक्षांना किंवा गाईला ते तांदूळ खाऊ घालावे.

सर्व सुपार्‍या आणि हळदीचे तुकडे कुंडीमध्ये किंवा एखादा खड्डा खणून त्यामध्ये टाकून द्यावे. म्हणजे त्याची झाडे उगवतील सुपारीचे झाड घरात सजावटीसाठी खूप छान दिसते कलशातील दक्षिणा घरातील कुवारी कन्या ला द्यावे जर आपल्या घरामध्ये कुवारी कन्या नसेल तर इतर कुवारी कन्येला दिली तरी चालेल.

कलशातील पाणी घेऊन ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडावे जर आपल्या घरामध्ये टॉयलेट असेल तर ते टॉयलेट कडून दोन हात सोडून उरलेले पाणी आपल्या घरातील कुंडीमध्ये टाकून द्यावे. हे पाणी तुळसाबाई ला अर्पण करू नये इतर कोणत्याही झाडाला हे आणि तुम्ही अर्पण करू शकता.

नारळाला फोडून त्याचा प्रसाद घरातील सर्वांनी खावा त्याशिवाय असे नारळ खाणे आपल्यासाठी शक्य नसल्यास आपण त्या नारळाची बर्फी मिठाई किंवा खीर बनवून ते नारळ खावे. परंतु चटणी किंवा भाजी अशा तिखट पदार्थांमध्ये ते खोबरे वापरू नये.

पूजेची फुले पाने पत्रे इत्यादी नदीवर निर्माल्य कलश असतात त्यात अर्पण करावी. अशाप्रकारे गणपती बाप्पाच्या आगमनात वापरण्यात आलेल्या सर्व वस्तूंचा योग्य वापर करावा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *