नमस्कार मित्रांनो.
आपल्याला कधीतरी हा प्रश्न पडतो की आपण कधीही कोणाचे वाईट करत नाही कधीही कोणाचे काही नुकसान करत नाही तरीही आपल्या सोबत वाईट का होते. असे भरपूर विचार तुमच्या आमच्या किंवा भरपूर लोकांच्या मनात येतच असतात.
अश्या सर्व प्रश्नाचे उत्तर स्वामींनी विचारलेले आहे. एकदा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतात की हे वसुदेवा नेहमी खऱ्या आणि चांगल्या लोकांसोबत वाईट का होते? यावर श्रीकृष्णाने एक गोष्ट सांगितली या गोष्टीत सर्व मनुष्याच्या प्रश्नाचे उत्तर आहेत. कृष्ण म्हणतात की एक नगरमध्ये दोन पुरुष राहत होते.
पहिला व्यापारी होता आणि चांगला माणूस होता नेहमी धर्म आणि नीतीचे पालन करायचा. चांगले कर्म करायचा देवाची भक्ती व मंदिरात जाऊन देवाची सेवा करत होता. सर्व चुकीच्या कमांपासून दूर राहत होता. आणि जो दुसरा माणूस होता तो वाईट प्रवृत्तीचा होता व नेहमी वाईट कामे करत असायचा.
तो नेहमी खोट बोलायचा व अनीती आणि अधर्माचे पालन करत असायचा. तो नेहमी मंदिरातून पैसे आणि चप्पल चोरायचा. तो वाईट संगतीत होता आणि व्यसनी होता. एका दिवशी त्या गावात जोरदार पाऊस सुरू झाला त्यामुळे मंदिरात एकही माणूस नव्हता या गोष्टीचा फायदा घेऊन त्या व्यक्तीने मंदिरातील सर्व पैसे चोरले. व ठेथुन पळून गेला.
थोड्या वेळात तो चांगला व्यापारी त्या मंदिरात दर्शन करण्याच्या हेतूने गेला तर त्याच्यावर लोकांनी चोरीचा आरोप केला. तेथे असलेले सर्व लोक त्याला खूप वाईट बोलू लागले, चोर बोलू लागले, त्याचा खूप अपमान केला. तो व्यापारी कसतरी त्या मंदिरातून बाहेर पडला. त्यानंतर मंदिराच्या बाहेर एका बैलाने त्या व्यापाराला पायाने मारले.
तो व्यापारी गंभीर जखमी होऊन खाली पडला. आणि तिकडे त्या वाईट व्यक्तीला रस्त्यावर परत एकदा पैशाने भरलेली पोतळी मिळाली तो व्यक्ती विचार करू लागला आजचा दिवस किती चांगला आहे. मंदिरातून पैसे मिळाले आणि आता रस्त्यावर एव्हढे पैसे सापडले म्हणून तो खुश झाला. दुसरीकडे तो चांगला व्यापारी घरी आला त्याने आपल्या घरातील देवांचे फोटो व मुर्त्या काढून फेकून दिल्या आणि देवाच्या व्यतिरिक्त जीवन जगू लागला.
खूप दिवसानंतर त्या वाईट आणि चांगल्या माणसाची मृत्यू झाली आणि ते दोघी व्यक्ती यमराज समोर आले. तेव्हा चांगल्या व्यक्तीने यमराज ला प्रश्न केला की मी कधीही कोणाचे वाईट केले नाही तरीही मला यातना आणि अपमान का मिळाला?आणि याने अधर्म केला तरीही याला धनाची पोटली मिळाली हे असे का??
यमराजने उत्तर दिले की ज्या दिवशी तुझ्यासोबत जी दुर्घटना झाली बैलाने तुला पायाखाली चिरडले तो तुझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस होता परंतु तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझी मृत्यू जीवनात बदलली तुला जास्तीचे जीवन जगायला भेटले. आणि या वाईट माणसाला राजयोग मिळणार होता परंतु या माणसाच्या वाईट कर्मामुळे तो राजयोग एका धनाच्या छोट्याश्या पोटलीत परिवर्तित झाला.
स्वामी म्हणतात की भगवान तुमची साथ कोणत्या स्वरूपात देतो हे सांगणे कठीण असते परंतु तुम्ही जर चांगले कर्म करत असाल तर तुम्ही ज्या देवाला पूजत असतात त्या देवाची कृपा तुमच्यावर नक्कीच होते. जीवनात येणाऱ्या समस्या,दुःख,कष्ट व अपयश याच्या मुले असे कधीही समजू नका की देव तुमच्यासोबत नाही.
असे सुद्धा असू शकते की तुमच्या जीवनात यापेक्षाही अधिक वाईट होणार होते. अधिक संकटे येणार होती पण तुमच्या देवावरील विश्वासाने व तुमचया सेवेने ते सर्व कमी झाले. म्हणून मित्रांनो तुम्हालाही असे वाटत असेल की, माझ्यासोबतच का एव्हढे वाईट होते. तर मित्रांनो असे समजावे की तुमच्यासोबत या पेक्षाही वाईट होणार होते. पण तुमच्या चांगल्या कर्मामुळे व तुमच्या सेवेमुळे ते तुमच्यापर्यंत कमी प्रमाणात आले अस समजून आनंदात आपले जीवन जगा.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.