नमस्कार मित्रांनो.
श्रावण महिना संपला पोळा झाला की सर्वांना वेळ लागते ते म्हणजे गणपती बाप्पाचे. भाद्रपद महिन्याच्या कृष्णपशात येणाऱ्या चतुर्थीला बाप्पाचे घरोघरी आगमन होते. एका मान्यतेनुसार भाद्रपद महिन्याच्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांचा जन्म झाला होता. देवांचे देव महादेव यांनी भाद्रपद महिन्यात शुक्ल चतुर्थीच्या दिवशीच श्री गणेशांचा जन्मोत्सव कैलास पर्वतावर साजरा केला होता.
यावर्षी १० सप्टेंबर रोजी शुक्रवारी घरोघरी बाप्पाचे आगमन होणार आहे. सर्वजण आतुरतेने बाप्पाची वाट पाहत आहेत. बाप्पा सर्वांचेच लाडके आहेत. बाप्पा आले की घर कसे बहरून जाते. बाप्पाचे पूजन, प्रसाद, रांगोळी, आरती काय करू आणि काय नाही असे होऊन जाते.
हे दहा दिवस कसे निघून जातात हे आपल्या लक्षातही येत नाही पण घरोघरी बाप्पाची मूर्ती कधीपासून बसवण्यात येत आहे किंवा १० दिवस बाप्पांचा घरात बसवून १० व्या दिवशी बाप्पाचे का विसर्जन केले जाते याबद्दल एक कथा सांगितली गेली आहे.
महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली हे सर्वांनाच माहिती आहे मात्र महर्षी व्यासांनी शिव आणि पार्वती यांचे पुत्र भगवान श्रीगणेश यांच्याकडून महाभारत लिहून घेतले. घराघरात पार्थिव पूजनाची सुरुवात तेव्हापासून झाली असे सांगितले जाते. महाभारताची रचना करताना महर्षी व्यास आणि बाप्पांनी एकमेकांना काही अटी घातल्या होत्या.
गणपती बाप्पाला आपल्या लिहायच्या गतीवर विश्वास होता म्हणून बाप्पा महर्षीला म्हणाले जर तुम्ही कथा हळूहळू सांगणार असाल तर मला लिहायला कंटाळा येईल त्यामुळे तुम्ही न थांबता पटापट कथा सांगावी. ही अट आपल्याला मान्य असेल तरच मी लेखनाची जबाबदारी मान्य करेल.
बाप्पांच्या या अटीवर महर्षी वाल्मिक यांनी एक स्मिथ हास्य दिले आणि बाप्पांना म्हणाले मला ही अट मान्य आहे परंतु मी सांगितलेला शब्द आणि वाक्य याचा तुम्हाला अर्थ समजला तरच तुम्ही ते शब्द किंवा वाक्य लिहावे अथवा पूर्ण करावे. अन्यथा अर्थ समजेपर्यंत थांबावे अशी अट महर्षी वाल्मिक यांनी केली. गणपती बाप्पा तयार झाले आणि मग त्यांनी महाभारत लेखनाचा श्रीगणेश केला.
महर्षी वाल्मिक काय सांगत आहे हे समजून लिहायला बाप्पांना अनेक वेळा विलंब व समजून घावे लागले त्यामुळे महाभारत पूर्ण लिहायला पूर्ण ३ वर्षांचा कालावधी लागला. महाभारत पूर्ण लिहायला ३ वर्षे लागले म्हणून एव्हढे दिवस एकाच ठिकाणी बसून राहिल्याने गणपती बाप्पाचे शरीर आखळून गेले. गणपती बाप्पांच्या शरीरातील उष्णताही वाढत गेली यावर उपाय म्हणून गणपती बाप्पांच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला.
हा लेप लावून लावून तो जाडसर लेप झाला व या लेपाने सुखल्यावर गणपती बाप्पांच्या मूर्तीचा आकार घेतला. महाभारत पूर्ण लिहून झाल्यावर बाप्पांचा पाण्यात माती काढण्यासाठी बुडवले गेले तेव्हापासून गणपती बाप्पांनी लिहिलेल्या महाभारताच्या सन्मानासाठी घरोघरी बाप्पाची मातीची मूर्ती आणून तिची पूजा करणे व १० व्या दिवशी तिला पाण्यात विसर्जित करणे अशी प्रथा सुरू झाली. अशी एक कथा सांगितली जाते.
म्हणूनच आपण गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची पार्थिव मूर्तीची आपल्या घरात स्थापना करतो व अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे पाण्यात विसर्जन करतो. मित्रांनो आता तुम्हाला समजलेच असेल की बाप्पा आपल्या घरात १० दिवस पाहुणे म्हणून का येतात व १० दिवसांनंतर आपल्याला त्यांना विसर्जित का करावे लागते ते.