नमस्कार मित्रांनो.
सप्टेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात ग्रह नक्षत्रात अनेक प्रकारचे बदल घडून येणार आहेत. सप्टेंबर महिन्यात बनत असलेल्या ग्रहनक्षत्रांचा संपूर्ण १२ राशीवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडणार असून काही राशीसाठी ही ग्रहदशा अतिशय लाभदायी ठरणार आहे. तर काही राशींवर याचा नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण ५ ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे.
महिन्याच्या सुरुवातीला शुक्राचे होणारे राशी परिवर्तन आणि त्या पाठोपाठ शुक्र ,गुरू राहूचे परिवर्तन याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडणार आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये बनत असलेली ग्रहदशा ४ राशीसाठी अतिशय सकारात्मक ठरत असून इतर ४ राशींच्या जीवनात राजयोग आहे व बाकीच्या ४ राशींना नकारात्मक परिणाम देऊ शकतो. एकूण ८ राशीसाठी सप्टेंबर महिना लाभदायी ठरणार आहे.
यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्य संपणार असून मांगल्याचे दिवस यांच्या वाट्याला येणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. आता कार्यक्षेत्राला प्रगतीची एक नवीन चालना प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातिल कामाला गती प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. अचानक धनलाभच्या संधी चालून आपल्याकडे येतील. जीवनात प्रगतीचे दिवस येणार आहेत.
कुटुंबात सुखसमृद्धी आणि ऐशवऱ्यात वाढ होणार आहे. अनेक दिवसांपासून आपली अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील. नोकरीच्या क्षेत्रात यश प्राप्त होणार असून करियरमध्ये अनुकूल घडामोडी घडून येण्याचे योग आहेत. मात्र इतर ४ राशीसाठी मात्र हा महिना अडचणींचा ठरू शकतो. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून ग्रहनशत्र आपल्यासाठी प्रतिकूल बनत आहे. कामाच्या ठिकाणी अडचणी किंवा आर्थिक नुकसान होण्याची संभावना आहे.
मेष राशी- सप्टेंबर महिना मेष राशीसाठी अत्यन्त सकारात्मक ठरणार आहे. सूर्य, मंगल ,शनी हे आपल्याला शुभफल देणार आहे नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश असतील. जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार जमून येऊ शकतात. व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. तरी उद्योगात एखादी चिंता आपल्या मनाला सतावण्याची संकेत आहेत.
व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. या काळात व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. व्यवसाय निमित्त काही प्रवास देखील घडू शकतात. करियर विषयी एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. घर परिवारात सुखाचे दिवस येणार आहे. कौटुंबिक कलह आता मिटणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.
वृषभ राशी- वृषभ राशीसाठी सप्टेंबर महिना सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. व्यवसायात निर्माण झालेले अडथळे आता दूर होणार आहे. या काळात बुध आणि गुरू हे आपल्याला शुभफल देणार आहेत. गुरुचे पाठबळ असल्याने प्रत्येक अडचणीत मार्ग काढण्यासाठी तुम्ही सफल ठरणार आहेत. नोकरी सुखाची असेल. काही यात्रा किंवा प्रवास घडू शकतात.
उद्योग व्यापारात यश प्राप्त होणार असून व्यवसायाचा विस्तार होणार आहे घरातील मोठ्या लोकांची मदत आपल्याला लाभणार आहे. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमात वाढ दिसून येईल. हा काळ आपल्या राशीसाठी अनुकूल असला तरी शत्रू पासून सावध राहायची गरज आहे. वाहन चालवताना प्रवास करताना सावध राहणे गरजेचे आहे.
मिथुन राशी- सप्टेंबर महिना मिथुन राशीसाठी नकारात्मक ठरू शकतो त्या मुळे आपल्या कामात अडचणी निर्माण होणार आहे. या काळात शुक्र,केतू,हर्षल हे शुभ फळ देणार असले तरी बुध गुरू आणि शनी हे त्रासदायक ठरणार आहे म्हणून योजलेल्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. पारिवारिक कलहामुळे या काळात मानसिक तणाव वाढणार आहे. या काळात मन शांत ठेवून व रागावर नियंत्रण ठेवून बुद्धी आणि विवेकाने कामे घेण्याची आवश्यकता आहे. आर्थिक प्राप्ती बर्यापैकी होणार आहे.
कर्क राशी- कर्क राशीसाठी सप्टेंबर महिना लाभदायक ठरण्याचे संकेत आहे. सूर्य मंगल गुरू आणि राहू हे आपल्यासाठी शुभ फळ देणार आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने आपल्याला फायदा होणार आहे. व्यवसायात भरभराट पाहायला मिळेल, आर्थिक प्राप्ती चांगली होईल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल.
सिंह राशी- सिंह राशीसाठी सप्टेंबर नवीन नकारात्मक ठरणार आहे नोकरीमध्ये अधिकारी वर्गाशी वाद होऊ शकतात. हाती घेतलेल्या कामात अडचणी येऊ शकतात सोबतच नोकरीत ही अडचणी येतील. हा काळ आपल्या जीवनातील थोडा नकारात्मक काळ ठरू शकतो. या काळात डोकं शांत ठेवून कामे करण्याची आवशक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.
कन्या राशी- कन्या राशीसाठी सप्टेंबर महिना शुभ फलदायी ठरणार आहे. गुरू,केतू आणि शुक्र या काळात शुभफल देणार आहेत. या काळात आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार आहे. कौटुंबिक सुखात वाढ होणार असून यश आणि किर्तीमध्ये वाढ होईल. संयमाने काम करणे व नोकरीत अधिकारी वर्गाशी नम्रतेने वागणे आपल्या हिताचे ठरेल. कोर्ट कचेरच्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात.
तूळ राशी- तूळ राशीसाठी सप्टेंबर महिना थोडा प्रतिकूल ठरण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसाय बऱ्यापैकी राहणार असून आर्थिक प्राप्तीसाठी धावपळ करावी लागू शकते. व्यवसाय निमित्त प्रवास घडणार आहे. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. या काळात सांसारिक सुखात वाढ होणार आहे. मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटीमुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी सप्टेंबर महिना विशेष लाभदायी ठरणार आहे. सूर्य,मंगल,बुध शनी हे आपल्या राशीला शुभफल देणार आहे. उद्योग व्यवसायात हा काळ सकारात्मक ठरणार आहे. जाणकार व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय व्यवसायात विस्तार घडवून आणू नका. या काळात आपल्या ओळखीमध्ये वाढ होणार आहे याचा लाभ आपल्याला कार्यक्षेत्रात दिसून येईल. भाऊ मध्ये चालू असणारा वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा लागेल. नोकरीमध्ये आपली प्रतिमा सुधारणार असून यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. जे काम हातात घेणार त्यामध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. न्यायालयीन कामे मार्गी लागतील.
धनू राशी- धनू राशीसाठी सप्टेंबर महिना विशेष लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. मागील काळात अडलेली कामे या काळात पूर्ण होतील. सूर्य,मंगल,गुरू,शुक्र,आणि राहू हे आपल्याला शुभफल देणार आहे. या काळात आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आरोग्यात सुधारणा घडून येईल. नोकरीच्या कामात यश मिळणार आहे. भरतीचे योग येणार आहे. आर्थिक गुंतवणूक करताना मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. महिन्याच्या शेवटी परिस्थिती अत्यन्त अनुकूल बनणार आहे. महिलांचा सामाजिक कार्यात सहभाग वाढणार असून धार्मिक काम घडून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे.
मकर राशी- मकर राशीसाठी सप्टेंबर महिना नकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आरोग्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी जाणकारांचा सल्ला घ्या. या काळात पैसे फार जपून वापरावे लागतील.
कुंभ राशी- कुंभ राशीसाठी सप्टेंबर महिना अडचणींचा ठरू शकतो. हाती घेतलेल्या कामात अडचणी येऊ शकतात. या काळात आरोग्यासाठी विशेश काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवसायात थोडी मंदि जाणवणार आहे त्यामुळे पैसे थोडे जपून खर्च करा. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. व्यसनापासून दूर राहणे आपले हिताचे ठरेल.
मीन राशी- मिन राशीसाठी सप्टेंबर महिना विशेष लाभदायी ठरणार आहे. बुध, गुरू,शनी हे आपल्याला शुभ फळ देणार आहे. उद्योगातून आर्थिक प्राप्तीत वाढ होणार आहे. या काळात मित्रांची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. नोकरीत बढती किंवा भरतीचे योग येतील. कौटुंबिक जीवनातील समस्या समाप्त होणार असून दुःखाचे आणि दारिद्र्याचे दिवस समाप्त होणार आहे. नव्या आर्थिक योजनेला चालना प्राप्त होणार आहे.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.