श्री गणेशाची मूर्ती घरी कशी आणावी? घरात गणपती आणण्यापूर्वी नक्की बघा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

श्रावण महिना संपलेला आहे. आणि पोळा आला आहे आणि पोळ्यानंतर सर्व सणांची लगबग सुरू होते. पोळा संपला हरितालिका, गणेश चतुर्थी, ऋषी चतुर्थी असे एकामागे एक सण येतात. म्हणूनच म्हणतात पोळा करी सण गोळा. तर मित्रांनो आता श्रावण महिना संपलेला आहे सर्वांना वेड लागलेले आहे ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे. सर्व जण अधीरतेने गणपती बाप्पाची वाट पाहत आहे.

कोणाची तयारी झाली आहे तर कोणाची बाकी आहे. बाप्पाच्या आगमनाला इतरांपेक्षा काय वेगळे डेकोरेशन करावे. बाप्पाला काय नैवेद्य करायचा, फुले, तोरणे कुठून आणावी या सर्व गोष्टींचा विचार सर्वजण करत असतात. तर या सर्वांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती. आपण घरी गणपती बाप्पा बसवत असताना घरातील दोन तीन सदस्य जाऊन मूर्ती पसंत करतात.

जी मूर्ती सर्व मूर्तींमध्ये आकर्षक आणि सुंदर दिसेल ती मूर्ती आपण निवडतो. इतक्या सुंदर सुंदर मुर्त्या विकायला आलेल्या असतात तर त्या पैकी कोणती मूर्ती विकत घ्यावी हे कळत नाही. सर्वच मुर्त्या आकर्षक असतात परंतु एक मूर्ती आपण घेतली की आपल्याला इतर मूर्त्यांपेक्षा आपली घेतलेलीच मूर्ती आकर्षक वाटू लागते. बाप्पाची मूर्ती आणताना मूर्तींमध्ये नेमके काय पाहावे, कशाप्रकारे मूर्ती घरात आणावी?

तर बाप्पाची मूर्ती घेताना शक्यतो १० इंचापासून ते एक फुटापर्यंत असावी. आता तुम्ही म्हणाल की हे काय नवीन अस तर कुठेही लिहिले नाही आहे. पण जर आपण लहान मूर्ती घेतली तर तिचे वजनही कमी असते. म्हणून ती मूर्ती घरात उचलायला ही सोपी जाते व आपण केलेल्या डेकोरेशन मध्ये ती मूर्ती नीट बसते. म्हणून शक्यतो १० इंच ते १ फुटापर्यंत बाप्पाची मूर्ती असावी.

दुसरी गोष्ट म्हणजे बाप्पाची मूर्ती नेहमी शाडू मातीचीच घ्यावी. यात आपल्या पर्यावरणाचा ही भाग येतो. जर शाडू मातीची मूर्ती असेल तर ती मूर्ती पाण्यात लवकर विरघळते आणि अन्य कोणत्या मातीच्या मुर्त्या पाण्यात लवकर विरघळत नाही. जर गणपती विसर्जन झाल्यावर आपण दोन ते तीन दिवसांनी नदीत जाऊन बघितले तर अक्षरशः आपल्याला बाप्पाचे हाल झालेले दिसतात. खंडित व तुटलेल्या मुर्त्या आपल्याला दिसतात.

म्हणून जर आपल्याला वाटत असेल की, आपल्या बाप्पाचे चांगल्याप्रकारेच विसर्जन व्हावे तर शाडू मातीचीच मूर्ती घ्यावी. त्याशिवाय प्लास्टर आणि अन्य मातीच्या मूर्त्यांनी नदीचे पाणी सुद्धा दूषित होते. त्यामुळे शाडू मातीच्या मूर्ती घेऊन आपण आपल्या पर्यावरणाचे सुद्धा रक्षण करत असतो. त्याशिवाय मूर्ती आणताना ती शांत, सुंदर डोळ्यांची व चेहऱ्याची तसेच नीट बसणारी आणावी. आजकाल बाजारात अनेक विविध प्रकारच्या मुर्त्या पाहायला मिळतात.

गरुडावर बसलेले बाप्पा किंवा मोदकवर बसलेले बाप्पा अशा विविध मुर्त्या असतात. पण अश्या प्रकारच्या मुर्त्या कधीही आणू नये. आपल्या घरात गणपती बाप्पा पाहुणे म्हणून येत आहेत तर त्यांना आरामात आणावे. मस्तपैकी टेकलेले किंवा छान सिंहासनावर बसलेले गणपती बाप्पा आणावे. मूर्ती बसलेल्या स्स्थितीतच आणावी. कारण आपण गणपती बाप्पा बसवत असतो उगाच नाचणारा, उभा बाप्पाची मूर्ती आणून अपमान करू नये.

मूर्ती आणताना ती सर्व बाजूंनी नीट बघून आणावी. हात, पाय, दात, सोंड, डोळे, कांन या सर्वांची घडण व्यवस्थित आहे का सोबतच मूर्तीचे रंगकाम व्यवस्थित झाले आहे ना हे सर्व बघूनच मूर्ती घरात आणावी. नाहीतर मूर्ती घरी आणल्या वर जर मूर्ती आपल्याला कुठे खंडित झालेली दिसली तर आपले मन निराश होते व आपण त्याचे वेगवेगळे अर्थ लावत बसतो. म्हणून मूर्ती नीट बघूनच आणावी. आजकाल मूर्तींमध्ये खूप वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. आजूबाजूला भगवान शिव आणि देवी पार्वती बसलेली असते आणि मध्ये बाप्पा बसलेले असता.

खर तर ती मूर्ती दिसायला खूप सुंदर असते पण अशाही प्रकारची मूर्ती आणू नये. कारण आपण शिव आणि पार्वतीचे पूजन लिंग स्वरूपातच करतो आणि बाप्पाचे पूजन मूर्ती स्वरूपात करतो. त्याशिवाय १० किंवा ११ दिवसात आपण बाप्पाचे विसर्जन करतो. त्यांच्यासोबत महादेव व पार्वतीचे सुद्धा विसर्जन करावे लागते. म्हणून बाप्पाची मूर्ती आणताना ती फक्त बाप्पाचीच असावी इतर देवी देवतांची मूर्ती आणू नये.

त्याशिवाय मुकुट नसलेली मूर्ती सुद्धा आणू नये. कारण मुकुट हा बाप्पांचा दागिना आहे आणि त्याशिवाय बाप्पा अपूर्ण आहे म्हणून अशी अपूर्ण मूर्ती आणू नये आणि जर आपल्याला विना मुकुटाची मूर्ती जरी आवडली तरी आपण ती मूर्ती आणू शकतात. पण विकत छान छान असे मुकुट मिळतात ते आपण आणू शकतात व बाप्पाला घालू शकतात.

आता शेवटची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांच्या वाहना शिवाय म्हणजे उंदीर नसलेले बाप्पाही घरी आणू नये. कारण वाहन नसेल तर बाप्पा कसे येतील म्हणून मूर्ती आणताना छोटासा नाजूक उंदीर बाप्पाच्या पायाशी जरूर असावा.

आता आपण मूर्ती घरी आणताना ती कशी आणावी- आपण मूर्ती आधीच बुक करून आलेलो असतो. त्यामुळे आपल्याला मूर्तीची साईझ माहिती असते तर त्याच हिशोबाने एक मोठे ताट सोबत न्यावे त्यावर लाल आसन टाकावे. त्या लाल आसनावर तांदूळ टाकावे, त्या ताटात बाप्पाला ठेवून बाप्पाचे तोंड दुसऱ्या लाल कापडाने झाकावे व त्यानंतर ते बाप्पा घरी आणावे.

घरी आणताना बाप्पाचा चेहरा आपल्या बाजूने असावा समोरून नसावा. बाप्पा घ्यायला जाताना सोबत घंटी किंवा ताट घेऊन जावे व ते वाजवत गाजवत मोठ्या उत्साहाने बाप्पाची स्वारी घरी आणावी. बाप्पा घरी आल्यावर त्यांचे तोंड दाराकडे करावे. ज्या व्यक्तीने मूर्ती धरलेली आहे त्या व्यक्तीचे दूध व पाण्याने पाय धुवावे. त्यांना गंध लावावा मग बाप्पाचे पूजन करावे.

पाणी ओवाळावे व त्यानंतर बाप्पाला घरात आणावे. बाप्पा घरी येण्यापूर्वी पाटावर लाल कापड टाकून त्यावर चारही बाजूने तांदळाने स्वस्तिक काढावे आणि त्यावर मधोमध एक रुपया ठेवावा व त्यावर बाप्पाची स्थापना करावी. त्यानंतर बाप्पाचे पूजन करावे, त्यांना समोर धूप लावावी त्यांना नैवेद्य दाखवावा. अश्याप्रकारे शांत चित्ताने व शुद्ध अंतकरणाने मनात काहीही पाप न ठेवता बाप्पाची पूजा व स्वागत करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *