नमस्कार मित्रांनो.
हिंदु धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या ला वेगळे महत्व प्राप्त आहे. ही पिठोरी अमावस्या विशेष महत्त्वाची मानली जात आहे कारण ही सोमवारच्या दिवशी येत आहे आणि हा श्रावणातला सोमवार आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणून साजरी केली जाते. या दिवशी पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या वर्षी पिठोरी सोमवती अमावस्या ही ६ सप्टेंबर २०२१ रोजी येत आहे.
सोमवती अमावस्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करणे हे देखील विशेष फायदेशीर मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडा मध्ये सर्व देवता सोबत पितरांचा सुद्धा वास असतो. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पूजन करून पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करून त्याचे पूजन केल्याने आपल्याला पितृदोष यापासून मुक्ती मिळते. असे केल्याने मित्र आपल्यावर खुश होतात.
या दिवशी पवित्र नदी किंवा कुंडामध्ये स्नान करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. असे केल्याने मनुष्याला सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते. ही अमावस्या श्रावण महिन्यात येणारी अमावस्या असल्याने या दिवशी भगवान भोलेनाथ यांच्यासोबत पार्वती आणि गणपती बाप्पा यांची पूजा करणे देखील शुभ फलदायी मानले जाते. शुद्ध मनाने आणि विश्वासाने जर आपण यांची पूजा केली तर मनुष्याला जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात व आपल्याला मनोवांचीत फळ प्राप्त होते.
श्रावण कृष्ण पक्ष मेघा नक्षत्र दिनांक सहा सप्टेंबर रोज सोमवार सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून उत्तर रात्री ६ वाजून २० मिनिटांनी अमावश्या समाप्त होणार आहे. अमावस्येच्या समाप्तीनंतर श्रावण महिना समाप्त होणार असून भाद्रपद महिन्याची सुरुवात होणार आहे. पिठोरी राशीचा प्रभाव या काही खास राशींचा भाग्यदय घडवून आणणार आहे.
अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये राज योग घेऊन येण्याचे संकेत आहेत. भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून हा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. अमावस्या पासून पुढे येणारा काळामध्ये ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अत्यंत शुभफलदायी आणि सकारात्मक ठरणार आहे.
आपल्या जीवनातील वाईट काळ आता संपणार आहे अचानक जीवनाला कलाटणी प्राप्त होईल. प्रगती आणि उन्नती च्या नवीन काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार असून नव्या उत्साहाने प्रगती होणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये याचा अत्यंत सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आर्थिक प्राप्तीच्या आणि धनलाभाच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. व्यवहारिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार असून जीवन जगण्यामध्ये गोडवा निर्माण होणार आहे.
आपण ज्या राशींविषयी बोलत आहोत त्या आहेत- कुंभ, मिथुन, सिंह, कर्क, धनु.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.