१४४ वर्षांनंतर बनत आहे अदभुत संयोग २६ ऑगस्टपासून पुढचे ७ वर्षे या राशींच्या जीवनात असेल राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ग्रह नक्षत्रानुसार ग्रहांची स्तिथी मनुष्याच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकत असते. मित्रांनो मनुष्य जीवन हे अस्थिर असून बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नवा आकार देत असते. त्यामुळे काळानुसार मनुष्याच्या जीवनामध्ये वेळोवेळी परिवर्तन घडून येण्यास सुरुवात होते. जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात तेव्हा मनुष्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तेव्हा अनेक अपयश आणि अपमान पचवावे लागतात.

पण हेच ग्रह नक्षत्र व हीच ग्रहदशा जेव्हा अनुकूल बनते तेव्हा मनुष्याचे जीवन बदलायला सुरुवात होते नकारात्मक परिस्थिती चे सकारात्मक परिस्थिती मध्ये रूपांतर होते आणि पाहता पाहता मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते. २६ ऑगस्ट पासून असाच काही शुभ सकाळ या राशींच्या जीवनात येणार असून हा काळ या राशींचे भाग्योदय घडवून आणणार आहे. ग्रह नक्षत्रांची शुभ स्थिती आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घडामोडी घडवून आणणार आहे.

आपल्या जीवनातील दुखा चा काळ आता संपणार असून सुख-समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. मित्रांनो मागील काळ आपल्या राशी साठी अनुकूल नसल्यामुळे अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागला. असणार परंतु आता परिस्थिती बदलत आहे जीवनातील दुःखाचे दिवस संपणार असून सुखाचा सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल मागील अनेक काळापासून बंद पडलेली कामे आता पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत.

जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये आता पुन्हा बदल घडून येणार असून जीवनाला प्रगतीची एक नवीन दिशा प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या यश प्राप्तीचा काळ ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रह नक्षत्राला विशेष महत्व प्राप्त आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये बुध ग्रहाला विशेष महत्व प्राप्त असून दिनांक २६ ऑगस्ट रोजी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार असून २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी बुध कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आणि या आधीच शुक्र कन्या राशीमध्ये विराजमान आहे.

मित्रांनो सूर्य आणि शुक्र हे बुधाचे मित्रग्रह मानले जातात. हे मिथुन आणि कन्या राशींचे स्वामी आहेत. बुधाचे स्वतःच्या राशीत होणारे गौचर या काही खास राशींचा भाग्योदय घडवून आणणार आहे. बुध हे बुद्धी वाणी आणि चतुर्याचे कारक ग्रह मानले जातात. बुधाचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनामध्ये सकारात्मक आणि आनंदाचे दिवस घेऊन येत असतो.

जेव्हा बुध शुभ फळ देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होते. दिनांक 26 ऑगस्तपासून असाच काही सुंदर अनुभव या भाग्यवान राशींना येणार असून हा काळ आपल्या राशीसाठी विशेष लाभदायक थफणार आहे.

मेष राशी- बुधाचे कन्या राशि मध्ये होणारे राशी परिवर्तन मेष राशि साठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. आता आपला भाग्योदय घडवून येण्याचे संकेत आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हे राशि परिवर्तन विशेष लाभदायी ठरणार असून कार्यक्षेत्रात आणि करिअरमध्ये याचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येईल.

भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहे. पारिवारिक जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार असून सुख-समृद्धी आणि वैभवा मध्ये वाढ होणार आहे.

कौटुंबिक जीवनामध्ये चालू असलेल्या समस्या आता संपणार आहे आपल्या मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. या काळात आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक चालना प्राप्त होईल. बुद्धीचा योग्य वापर करून खूप मोठे यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात.

नोकरी करण्यासाठी करत असलेले प्रयत्न फळाला येणार आहे सरकारी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये मित्रांची मोठी मदत आपल्याला प्राप्त होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये सहकारी वर्गाच्या मदतीने खूप मोठे अशा प्राप्त करून दाखवणार आहात.

मिथुन राशी- मिथुन राशि साठी बुधाचे राशी परिवर्तन लाभदायक ठरणार आहे. व्यवहारी जीवनावर याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. व्यवहारी जीवनामध्ये चालू असलेल्या समस्या आता समाप्त होणार आहे आपल्या जोडीदारासोबत बिघडलेले आपले संबंध आता परत सुधारणार आहे.

नोकरीच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून मनाप्रमाणे नोकरी मिळण्याचे योग आहेत. ज्या कामासाठी आपण प्रयत्न करत आहात ती आम्ही आता या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. आर्थिक प्रगतीसाठी संधी चालून आपल्यासाठी येणार असून हा काळ आपल्या जीवनाला एक नवीन कलाटणी देणारा काळ ठरणार आहे.

सिंह राशी- बुध्दाचे हे राशि परिवर्तन सिंह राशि साठी विशेष लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत कार्य क्षेत्राचा विस्तार घडवून येण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये आपल्या वाणीमध्ये नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे वाणीमध्ये मधूरता निर्माण होणार असली तरी रागाच्या भरात मध्ये तोंडातून काही अपशब्द निघण्याचे संकेत आहे त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा.

हा काळ सर्वोत्कृष्ट आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. स्वतः मध्ये असणाऱ्या नेतृत्व गुणांचा वापर करून खूप मोठे यश संपादन करणार आहात. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ लाभदायक ठरणार आहे.

कन्या राशी- कन्या राशीत होणारे बुधाचे आगमन आपल्या भविष्याला नवी दिशा प्राप्त करून देणार आहे. बुध आपल्या राशीचे स्वामी आहे त्यामुळे या काळात आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला मान प्राप्त होणार असून आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार असून आलेल्या प्रत्येक संधी पासून तुम्ही लाभ प्राप्त करून घेणार आहात. हा काळ आपल्या सुख-समृद्धी च्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.

तूळ राशी- बुधाचे कन्या राशि मध्ये होणारे राशीपरिवर्तन तूळ राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार असून सुखाची सोनेरी सकाळ आपल्या वाटेला येणार आहेत. कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे घडामोडी घडून येण्याचे संकेत आहे. अडलेली कामे पूर्ण होतील नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. जीवनामध्ये जे ध्येय आपण निश्चित केलेले आहे ते प्राप्त होण्याची संकेत आहे.

आपल्या मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे आता भाग्योदय घडून यायला वेळ लागणार नाही. हाती घेतलेल्या कामांना आपल्याला यश प्राप्त होणार आहे कौटुंबिक जीवनातील समस्या आता संपणार असून व्यवहारी जीवनामध्ये सुख समाधानाचे दिवस येणार आहेत. सुख आणि समाधानाने जीवन फुलून येणार आहे. आता प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्यासाठी वेळ लागणार नाही.

वृश्चिक राशी- बुधाचे हे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून या काळामध्ये मांगल्याची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर राहणार आहे नवीन चालू केलेल्या कामांना यश प्राप्त होईल. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार असून नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.

आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणारा आहे. मागील काळात आपण जे ध्येय निश्चित केलेले आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवहारी जीवनामध्ये पती-पत्नीमधील प्रेमामध्ये वाढ होईल. संसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

धनू राशी- बुधाचे कन्या राशि मध्ये होणारे राशी परिवर्तन धनु राशीचा भाग्यदय घडवून आणणार आहे. या काळामध्ये आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभदायक ठरणार आहे. कार्य क्षेत्रातुन आर्थिक आवक वाढणार असून धनप्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. याकाळात नशिबाची साथ आपल्याला लागणार आहे जीवनातील दुःखाचे दिवस संपणार असून सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. प्रगतीच्या मार्गावर अकराशे होणारा आहात. काळ सर्व दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी- कुंभ राशी व ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार असून हे राशीपरिवर्तन आपल्या राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. या काळात आर्थिक प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहे. धनप्राप्ती मध्ये वाढ होणार आहे.

नोकरीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून खाजगी किंवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. कोर्टाच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *