श्रावण संपण्या अगोदर घराच्या दरवाजावर नक्की टाका ही १ वस्तू गरिबी विसरेल घराचा रस्ता.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

श्रावण महिना चालू आहे . सर्व महिन्या मध्ये महादेवांचा सर्वात आवडता महिना म्हणजे श्रावण. महादेवांना प्रसन्न करण्या साठी श्रावण महिन्यात विविध उपाय केले जातात महादेवांना विविध वस्तू अर्पण करून महादेवांचा आशीर्वाद मिळवला जातो. महादेवांना पाणी, दूध, बेलाचे पान, भांग, धोत्र्याचे फुल इत्यादी वस्तू अर्पण केल्या जातात .

महादेव हे ‘भेळे सांब’ आहेत भक्तांच्या थोड्याश्या पूजनाने ही महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात व त्यांच्या कृपेचा वर्षाव करतात. त्यातल्या त्यात श्रावण महिन्यात महदेवांचे पूजन केल्यास महादेव आपल्या भक्तांवर लगेचच प्रसन्न होतात. ज्या वेळेस समुद्र मंथन झाले त्या वेळेस समुद्र मंथनातून जे हलाहल, विष बाहेर पडले ते विष देवाधी देवानी प्राशन केले होते. त्या मुळे त्यांचा कंठ निळा झाला होता म्हणून महादेवांना निळकंठ ही म्हटले जाते. म्हणूनच श्रावण महिन्यात महादेवांना जलाचा आणि दुधाचा अभिषेक केला जातो.

महादेवांना श्रावण महिन्यात अभिषेक केल्यास आपल्या सर्व इच्छा व मनोकमनांची पूर्तता होते. एखाद्या व्यक्ती चा विवाह जमत नसेल काहींना काही अडचणी येत असतील तर श्रावणाच्या पवित्र महिन्यात दररोज नित्य नियमाने महादेवांना दूध, बेलाचे पान, धोत्र्याचे फुल, शमी चे पान आणि गुलाबाचे फुल अर्पण करावा आणि महादेवांना आपली इच्छा सांगावी. यामुळे लवकरात लवकर आपला विवाह जुळून येईल.

असे म्हणतात की, महादेवांना फक्त एक तांब्या पाणी अर्पण केले तरीही महादेव प्रसन्न होतात. महादेवांना जलाभिषेक केल्यास आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते. जर एखादी व्यक्ती तापाने फणफणली असेल तर त्या व्यक्तीच्या हाताने महादेवांना एक तांब्या पाण्याचा जलाभिषेक करावा. या उपायांमुळे ताप लगेचच उतरतो आणि तब्येतीत सुधारणा होते.

घरात जर नेहमी काहीना काही आडी अडचणी येत असतील घरात नेहमी वाद विवाद भांडण तंटे व कलह होत असतील, आपल्या कुटुंबावर एखादे संकट ओढवले असेल तर महादेवांना दुधाचा अभिषेक करा. या उपायांमुळे आपल्या सर्व दुःख व त्रासाचा नाश होऊन घरातील भांडण तंटे व वाद विवाद मिटतील.

लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल तर महादेवांना उसाच्या रसाचा अभिषेक करावा. तसेच मनासारखा जोडीदार हवा असेल तरीही महादेवांना उसाचा रस अर्पण करावा. आपल्याला जर शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर महादेवांना राईच्या तेलाचा अभिषेक करावा. यामुळे सर्व शत्रूंचा नाश होईल व आपण शत्रूंवर विजय मिळवू शकाल. महादेवांना तुपाचा अभिषेक केल्यास आपले जीवन निरोगी बनते त्याशिवाय आपल्या वंशात वाढ होण्यासाठी ही तुपाचा अभिषेक खूप फायदेशीर ठरतो.

शिवलिंगावर फक्त पाणी अर्पण करूनही आपण पितृदोष यापासून मुक्तता मिळवू शकतो. आपल्या कुंडलीत शनी देव किंवा पितृदोष असेल आणि यापासून आपल्याला सुटका मिळावयाची असेल तर श्रावण महिन्यात दररोज नित्य नियमितपणे महादेवांना शुद्ध पाणी अर्पण करावे. यामुळे या दोषापासून आपली सुटका होते. त्याचा चॉकलेट अशुभ प्रभाव आपल्याला जाणवत नाही.

चला तर आता जाणून घेऊया घरात सुख-समृद्धी येण्यासाठी एक खास उपाय श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी आपल्या उजव्या हातात थोडीशी काळी तीळ घ्यावी. मुख्य दारात उभे राहून ती तीळ आपल्या डोक्यावरून ३ वेळा उतरवावे व दाराबाहेर टाकून द्यावी. या उपायांमुळे आपल्या घरातील किंवा आपल्या वरील जी काही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती असेल ती घराबाहेर निघून जाईल.

घरातील सर्व दुःख त्रास अडचणी घराबाहेर निघून जातील व घरात सकारात्मकता व सुख-समृद्धी येईल श्रावण महिन्यात दररोज संध्याकाळी मुख्य दाराच्या बाहेर एक शुद्ध तुपाचा दिवा लावावा व त्यात दोन लवंगा टाकाव्यात यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते व कोणत्याही प्रकारची वाईट व नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *