या मंदिरावर १२ वर्षातून एकदा वीज पडते, जाणून घ्या शिवमंदिरा विषयी अजब गजब गोष्टी.

Daily News

नमस्कार मित्रांनो.

संपूर्ण देशामध्ये भगवान शिव यांचे अनेक मंदिरे आहेत त्यापैकी काही मंदिरांबद्दल आपल्याला माहिती सुद्धा आहे. तर मित्रांनो आज मी तुम्हाला भगवान महादेव यांच्या पाच रहस्यमय मंदिराबद्दल माहिती सांगणार आहे.

१) बिजली महादेव मंदिर- हिमाचल मधील कुल्लू येथे स्तित बिजली महादेव मंदिर हे महादेव शिवच्या अनेक रहस्यमय मंदिरांपैकी एक आहे. कुल्लू चा संपूर्ण इतिहास विजयशी जुडलेला आहे. कुल्लू शहराजवळ व्यास आणि पार्वती नदी जवळ एक उंच पर्वतावर बिजली महादेव मंदिर स्थित आहे. सम्पूर्ण कुल्लू घाटीत असा विश्वास आहे की, ही दरी सम्पूर्ण साप आहे आणि भगवान शिव यांनी या सापाचा वध केला होता.

असे मानले जाते की, या मंदिराच्या शिवलिंगावर दर १२ वर्षातून आकाशातून एक वीज पडते त्यामुळे वीज पडल्याने या शिवलिंगाचे तुकडे होतात. त्यानंतर या मंदिरातील पंडित या शिवलिंगाचे तुकडे जमा करून त्याला एका लोणी मध्ये मिसळतात व त्यापासून ते परत तसेच मोठ्या रुपात त्या तुकड्यांना जोडून शिवलिंग तयार करतात. दर १२ वर्षांनी या शिवलिंगावर वीज का पडते अजून तरी या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही.

२) स्तंबेश्वर महादेव मंदिर- हे मंदिर अरबी समुद्राच्या मध्यभागी आहे. १५० वर्षांपूर्वी सापडलेल्या या मंदिराचा उल्लेख महापुराणात रुद्रसहींतेत केला आहे. या मंदिरातील शिवलिंगाचा आकार चार फूट उंच आणि २ फूट व्यासाचा आहे. हे मंदिर सकाळी व संध्याकाळी दिवसातून दोन वेळा अदृश्य होते. आणि काही वेळाने ते परत आपल्या स्थानी येते. याचे कारण अरबी समुद्रातील उंच उडणाऱ्या लाटांना सांगितले जाते. कारण लाटा जेव्हा पूर्णपणे शांत होतात तेव्हाच भक्त या मंदिराचे शिवलिंग पाहू शकतात.

प्राचीन काळापासून ही प्रक्रिया चालत आहे. येथे येणार्‍या प्रत्येक भक्ताला एक विशेष पत्रिका वाटली जाते त्यात भरतीची वेळ लिहिलेली असते. त्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना फारसा त्रास होत नाही. आणि एक पौराणिक कथा देखिल या मंदिराशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार द्वारकासुर राक्षसाने भगवान शिवची तीव्र तपस्या केली व शिव त्याच्या तपस्येने प्रसन्न झाले आणि मग त्यांनी त्याला वरदान मागण्यास सांगितले तेव्हा वरदान म्हणून द्वारकसुर याने मांगीतले की या जगात मला फक्त शिवपुत्रच मारू शकेल त्याशिवाय कोणीही मला हरवू शकणार नाही.

यावर भगवान शिव यांनी द्वारकासूर याला तथास्तु म्हणून वरदान दिले. इकडे वरदान मिळताच द्वारकसुर ने तिन्ही जगात हाहाकार करायला सुरुवात केली. त्यामुळे सर्व देवी देवता घाबरून भगवान शिव यांच्याकडे गेले. त्याच वेळी भगवान शिव यांनी चार डोके, बारा हात असलेला एक मूलगा उत्पन्न केला आणि त्याचे नाव कार्तिक ठेवले. तेव्हा कार्तिकने वयाच्या सहाव्या वर्षी द्वारकासूरचा वध केला.

परंतु जेव्हा कार्तिकला कळले की, द्वारकसुर भगवान शंकर यांचा भक्त होता. तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला आणि भगवान विष्णूंनी कार्तिकला त्या ठिकाणी शिवालय पाडण्यास सांगितले. त्यामुळे त्यांचे मन शांत झाले. मग सर्व देवतांनी मिळून त्या सागर संगम मंदिरात एका स्तंभाची स्थापना केली ज्याला आज स्तंभेस्वर तीर्थ म्हणून ओळखले जाते.

३) लक्षमेश्वर महादेव मंदिर- असे मानले जाते की, भगवान रामने रावण आणि कुंभकर्णाचा वध केल्यानंतर त्यांचा भाउ लक्ष्मणच्या म्हणण्यावर या मंदिराची स्थापना केली होती.
लक्षमेश्वर महादेव मंदिराच्या गर्भात शिवलिंग आहे ज्याची स्थापना लक्ष्मण ने स्वतः केली होती. या शिवलिंगावर एक लाख चित्र आहेत म्हणून त्याला लक्ष लिंग असेही म्हणतात.

या एक लाख चित्रांमध्ये एक चित्र आहे ते पाटाळमध्ये जाते कारण त्यात कितीही पाणी टाकले तरी ते आत जातच राहते. परंतु एक चित्र अक्षयकुंड आहे कारण त्यात पाणी भरलेलेच राहते. लक्षमेश्वर लिंगला अर्पण केलेले पाणी मंदिराच्या मागच्या तलावात जाते अशी मान्यता आहे. कारण तलाव कधीच सुखत नाही.

४) निष्कलंक महादेव मंदिर- हे मंदिर गुजरातच्या भावनगर मधील कोल्ह्यात किनाऱ्यापासून ३ किलोमीटर दूर अरबी समुद्रात स्थित आहे. दररोज अरबी समुद्राच्या लाटा या शिव मंदिराचा अभिषेक करतात. लोक या मंदिराला भेट देण्यासाठी चालत जातात. यासाठी त्यांना भरती खाली येण्याची वाट पाहावी लागते. भरतीच्या वेळी फक्त मंदिराचा ध्वज आणि स्तंभच दिसतो. त्यामुळे त्याला पाहून असे वाटत सुद्धा नाही की, पाण्याच्या खाली भगवान महादेव यांचे प्राचीन मंदिर देखील आहे. हे मंदिर महाभारत काळातील असल्याचे सांगितले जाते.

असे मानले जाते की, महाभारतात कौरवांचा वध करून पांडवांनी युद्ध जिंकले त्यामुळे युद्ध संपल्यावर पांडवांना समजले की त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना मारून पाप केले आहे. तर या पापातून मुक्त होण्यासाठी पांडव भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे गेले. मग भगवान श्रीकृष्ण यांनी पांडवांचे पापापासून मुक्तता होण्यासाठी काळी गाय आणि काळा झेंडा त्यांना दिला. हा गाईचे पालन करायला त्यांनी सांगितले आणि म्हणाले या काळ्या ध्वजाचा आणि गाईचा रंग जेव्हा पांढरा होणार तेव्हा तुम्ही समजून जावे कि तुमची सर्वांची पापातून मुक्तता झालेली आहे. आणि त्यांनी असेही सांगितले होते की ज्या ठिकाणी हे सर्व चमत्कार घडेल त्या ठिकाणी तुम्ही भगवान शिव यांची पूजा करा.

म्हणून पांडव काळा झेंडा घेऊन गाईच्या मागे चालु लागले आणि यासाठी ते खूप दूर चालत सुद्धा होते. परंतु गाईचा कलर आणि झेंड्याचा कलर काही बदलला नाही. परंतु ते जेव्हा गुजरात मध्ये स्थित कोल्ह्यात मंदिराजवळ पोहोचले तेव्हा गायीचा आणि ध्वजाचा रंग पांढरा झाला आणि त्या ठिकामी पांडव खूप खुश झाले आणि त्याठिकाणी त्यांनी भगवान शिव यांची तपस्या करायला सुरुवात केली. त्यांच्या तपस्येने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पाच पांडवांना वेगवेगळ्या रुपात शिवलिंगाच्या रूपात दर्शन दिले. ते पाच शिवलिंग अजूनही तेथे स्थित आहे. पाच शिवलिंगासमोर नंदीची मूर्ती आहे. पाची शिवलिंग चौकोनी व्यासपीठावर बांधलेली आहेत.

५) अचलेश्वर महादेव- भारतात अचलेश्वर नावाने महादेवाची खूप मंदिरे आहेत. परंतु राजस्थान मध्ये स्टीत
अचलेश्वर मंदिर हे सर्व मंदिरांपैकी वेगळे आहे. हे मंदिर राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर आहे. हे नदी आणि दऱ्यांसाठी प्रसिध्द आहे. भगवान अचलेश्वर यांचे मंदिर या दुर्गम दर्यांच्या मध्ये आहे. या मंदिरातील शिवलिंग दिवसातून तीन वेळा रंग बदलते या मंदिरातील शिवलिंगाचा रंग सकाळी लाल दुपारी केशरी आणि संध्याकाळी याचा होऊन जातो.

या शिवलिंगाचे रंग बदलण्याचे रहस्य अजून तरी कोणालाही माहीत नाही. हे अचलेश्वर मंदिर खूप प्राचीन आहे मंदिरातील हा परिसर डाकू साठी खूप प्रसिद्ध होता. त्यामुळे येथे भक्त कमी संख्येत यायचे. या मंदिरात जाण्यासाठी वाट आणि रस्ते देखील खूप खडतर होते परंतु जशी जशी या मंदिराची माहिती भक्तांना मिळू लागली तेव्हापासून या मंदिरात आणखीन बघतो जमा होत गेले.

या मंदिराबद्दल आणखीन एक अशी कहाणी प्रचलित आहे की शिवलिंगाच्या खोलीचा शेवट आजपर्यंत कोणालाच कळला नाही. असे म्हटले जाते की, खूप वर्षांपूर्वी भक्तांनी शिवलिंगाची खोली जाणून घेण्यासाठी खोदले होते. परंतु खूप खोल खोदल्यावर देखील त्याचा शेवट सापडला नाही, शेवटी भाविकांनी देवाचा चमत्कार म्हणून खोदणे बंद केले. महादेव अचलेश्वर हे भक्तांच्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण करतात अशी भक्तांची श्रद्धा आहे.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *