जेजुरी गडाचे एक रहस्य, जुन्या जेजुरी गडावरन खंडोबा देव नवीन गडावर कसे आले.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आम्ही आज तुम्हाला महाराष्ट्र येथील पुणे जिल्ह्यातील पुरंदर मध्ये असलेल्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी खंडोबाची गोष्ट सांगणार आहे. महाराष्ट्रामध्ये पंढरपूर चा विठ्ठल, कोल्हापूरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबा याला मानणारे लाखो भक्त आहेत. परंतु सर्वांना माहिती आहे का की जुनी जेजुरी आणि नवी जेजुरी हे दोन वेगवेगळी स्थाने आहेत. जुनी जेजुरी ही कडेपठारावरती आहे आणि या पठारावरून देव नव्या स्थानावर कसे आले याविषयी सत्य गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे.

मित्रांनो कित्येक वर्षांपूर्वी सुखेपार मध्ये एक खेरे नावाचे भक्त राहत होते. आणि ते खंडोबा देवाची खूप मनाने आणि श्रद्धेने भक्ती करत होते ते रोज न चुकता आपल्या घागर मध्ये पाणी घेऊन ते रोज कडेपठारावर चढायचे. असा त्यांचा रोजचा नित्यक्रम होता. अस करता करता खूप वर्षांनी त्यांच भरपूर वय झालेल होत. त्यामुळे वाढत्या वयामुळे त्यांना असे करणे रोज शक्य होत नव्हते.

तेव्हा त्यांना खूप त्रास होत होता आणि असच मग एके दिवशी ते आपल्या घागर मध्ये पाणी घेऊन देवाकडे कडेपठार सोडून गेले आणि देवाला प्रार्थना करुन सांगू लागले की, देवा आता मला तिकडे येणे शक्य होत नाही आता तूच माझी मदत कर आणि माझ्या घरी चल आणि देवाने ते मान्यही केले आणि देव साक्षात म्हणाले हे बघ मी तुझ्या घरी येईल पण तू आता इथून चालत जाणार तेव्हा मागे बघायच नाही ज्या क्षणी तू मागे बघणार त्या क्षणी मी तेथे थांबून जाणार.

खैरे यांनी ते मान्य देखील केले त्यानंतर खैरे चालू लागले व खूप चालता-चालता जेव्हा खेडे यांना वाटल की, अरे काय देवाने आपल्याला फसवल तर नाही ना. त्यामुळे त्यांनी मागे वळून बघितले तर काय साक्षात देव त्यांच्या मागे होते आणि आता तिकडे नवीन जेजुरी मंदिर आहे तेथे खेरे यांनी मागे वळून बघितले होते. म्हणून देव तेथेंच लुप्त झाले व त्यानंतर त्या ठिकाणी त्यांच मंदिर बांधल गेल. म्हणून आज त्या ठिकाणी नवीन गड आहे.

परंतु मित्रांनो मी याबद्दलच अजून एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की, खंडोबा देव हे जेजुरी मध्ये का आले? त्याची कहाणी याप्रकारे आहे की खंडोबा हा अवतार देवांचे देव महादेव यांचा आहे. भरपूर वर्षापुर्वी लवथळेश्वर या डोंगरावर एक ऋषी मुनी राहत होते. आणि त्या ऋषी मुनी यांना दोन राक्षसांनी त्रास द्यायला सुरुवात केला होता. त्या राक्षसांना रामाच वरदान होत, त्या राक्षसांना आपल्या ताकदिचा गर्व झाला होता त्यामुळे त्यांनी त्या ऋषीमुनींना मारायला चालू केल.

त्यांच्या यज्ञाचा नाश केला. त्यावेळी ऋषी मुनी आपल्या बायका आणि मुलांना घेऊन लपून बसले. आणि त्यानंतर त्यांनी भगवान भोलेनाथ यांची उपासना आणि व्रत केले म्हणून भगवान भोलेनाथ यांनी साक्षात रूप घेतल आणि जुन्या कडेपठार वरती त्या दोघी राक्षसांचा वध केला. त्या राक्षसाचा मधील एकाच नाव मल्ल्या होते. त्यामुळे मल्हारी हे नाव प्रचलित झाले. अशी ही कहाणी आहे.

मित्रांनो कालभैरव हे भगवान भोलेनाथ यांचच रूप आहे. यांच्या दोन बायका आहेत. पहिली म्हणजे देवी म्हाळसाई. तर ही देवी लिंगायत समाजातील आहे. देवीच्या वडिलांच्या स्वप्नात आले की, त्यांच्या पुत्रीच लग्न खंडोबा सोबत होणार अस म्हणून ते खंडोबाकडे गेले आणि त्या दोघांच लग्न ठरले. हे लग्न पोर्णिमेला पाली या ठिकाणी पार पडले. त्यानंतर लग्न झाल्यावर काही दिवसांनी धनगर समाजाची मुलगी बाणाई ही खंडोबाला आली होती त्यानंतर दोघांनी एकमेकांना बघितले त्यानंतर खंडोबाला बाणाई सोबत लग्न करायचं होत. पण खंडोबाच्या मनात प्रश्न आला की, आता करायच कस तेव्हा देवाने काय केलं साडीपाठाचा डाव म्हाळसाई बरोबर ठरला.

तेव्हा देवाने वचन दिले की, जर मी साडी पाठाचा डाव हरला तर तुम्हाला बारा वर्षे वनवास करावा लागेल आणि तसच झाल. मित्रांनो देव सारीपाटाचा डाव हरले आणि १२ वर्ष साठी वनवासात निघून गेले. पण ते वनवासात बानाईला भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर बानाईच्या घरी खूप मेंढक होती तर देव वेगळ रूप घेऊन मेंढक सांभाळू लागली.

त्यानंतर बापाने सर्व मेंढक मारून टाकली पण देव बापाला म्हणाला माझ लग्न बाणाई बरोबर झाल पाहिजे. त्यानंतर बाणाईचे वडील म्हणाले की, तुझ लग्न बाणाई सोबत लावतो. पण त्याआधी माझी सर्वे मेंढक जिवंत करून दे. आता तिच्या वडिलांना कुठे माहिती होत की, हे शंकर भगवान यांचे रूप आहे. तर तेव्हा त्यांनी आपल्या हातातील भाला फेकला आणि सर्व मेंढक परत चालू लागली. मग त्यानंतर बाणाईच लग्न खंडोबा सोबत झाल.

खर बघितल तर महाराष्ट्रातील कोळी धनगर आणि अन्य समाज खंडोबा वरती जिवापार प्रेम करतो आणि त्यात धनगर समाजाचा तर खंडोबा वरती फार मोठा विश्वास आहे. धनगर समाज हा प्रामुख्याने मेंढक चारायला जातो आणि ज्या दिवशी अमावस्या असते. त्यादिवशी कितीही समस्या असल्या तरी खरा धनगर जवळ असतो तो खंडोबा जवळ येतोच. जेव्हा धनगर समाजातील लोक बकरी आणि मेंढक चारायला जातात तेव्हा त्यांना माहिती आहे की, आपले मेंढक कुठेही जाणार नाही.

कारण ते फक्त काय करतात भंडारा उधळतात आणि त्यांचा खंडोबा वरती अपार विश्वास आहे म्हणून त्यांचे मेंढक कुठेही जात नाही. धनगर समाजावर कोणतेही संकट यायच्या आधी खंडोबा त्याला आवडतो. त्याच कारण फक्त एकच आहे मित्रांनो एकनिष्ठता. कारण धनगर समाज हा एकनिष्ठ समाज आहे एकदा दिलेला शब्द पाळणारा समाज आहे. प्राण गेला तरी चालेल मग तो शब्द हा समाज मोडू देत नाही. त्यामुळे या धनगर जातीचे ही खंडोबा वरती अपार विश्वास आणि श्रद्धा आहे.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *